वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • मार्च १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २० ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ३/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मार्च १ आणि सावध राहा! जानेवारी-मार्च अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

१५ मि:“खंडणीचा लाभ करून घेण्यास इतरांना मदत करणे.”a यानंतरच्या भागात, स्मारकविधीचे निमंत्रण देताना बायबल काय शिकवते या पुस्तकातील पृष्ठे २०६-८ वरील माहितीचा आपण कसा उपयोग करू शकतो याविषयी सांगितले जाईल.

२० मि:प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण. बायबल काय शिकवते या पुस्तकातील पृष्ठे २०६-८ वरील माहितीची प्रश्‍नोत्तर पद्धतीने चर्चा. प्रस्तावनेत, सुरुवातीचा परिच्छेद वाचून घरमालकासोबत या विषयावर चर्चा कशी सुरू केली जाऊ शकते हे सांगा. ही प्रस्तावना जास्तीतजास्त एक मिनिटाची असावी. यानंतर श्रोत्यांना पुढील प्रश्‍नांवर टिपणी करण्याचे निवेदन करावे. परिच्छेद वाचण्याची गरज नाही. (परि. २) येशूने आपल्या मृत्यूचा स्मारकविधी केव्हा स्थापन केला? (परि. ३) प्रभूच्या सांज भोजनाचा विधी किती वेळा पाळला जावा? (परि. ४) बायबल स्मारकविधीचे कशाप्रकारे वर्णन करते? (परि. ५) येशूने भाकरीचे व द्राक्षारसाचे रूपांतर त्याच्या शरीरात व रक्‍तात केले नाही असे आपण खात्रीने का म्हणू शकतो? (परि. ६) बेखमीरी भाकरी कशास सूचित करते? (परि. ७) लाल द्राक्षारस कशास सूचित करतो? (परि. ८) भाकरी व द्राक्षारस केवळ कोण सेवन करू शकते? (परि. ९) दर वर्षी स्मारकविधी केव्हा साजरा केला जातो आणि आपण या प्रसंगी का उपस्थित राहिले पाहिजे? उपलब्ध वेळेनुसार मुख्य शास्त्रवचनांकडे लक्ष वेधावे. आपल्या बायबल विद्यार्थ्यांसोबत व ज्यांना आपण स्मारकविधीकरता निमंत्रित करणार आहोत त्यांच्यासोबत या माहितीची उजळणी करण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्यावे. परिच्छेद वाचून, मुख्य मुद्द्‌यांची चर्चा करून व या भागात सुचवल्याप्रमाणे साधे प्रश्‍न विचारून ही उजळणी केली जाऊ शकते.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १५ (१२७)

१० मि:स्थानीय घोषणा. “स्मारकविधीकरता सूचना” या चौकोनातून मुख्य मुद्द्‌यांची उजळणी करावी.

२३ मि:देवाच्या व्यवस्थेत ख्रिस्ताची भूमिका. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संघटित (इंग्रजी) पृष्ठे १०-१३ वरील माहितीच्या आधारावर भाषण. “ख्रिस्ताची भूमिका” या उपशीर्षकाखालील पहिल्या दोन परिच्छेदांची चर्चा करताना, स्मारकविधीच्या निमंत्रणपत्रिकेचा कशाप्रकारे वापर करता येईल यावर सूचना देण्याकरता व प्रात्यक्षिके दाखवण्याकरता तीन-चार मिनिटे घ्यावीत. फेब्रुवारी २००६, पृष्ठ ३, परिच्छेद ३ यातील सूचनांची उजळणी करावी.

१२ मि:शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण केल्यामुळे मिळणारे आध्यात्मिक बळ. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००६ पुस्तिकेतील प्रस्तावनेवर आधारित भाषण व प्रात्यक्षिक. एक कुटुंब आजच्या शास्त्रवचनावर कशाप्रकारे एकत्र मिळून चर्चा करतात हे एका प्रात्यक्षिकात दाखवावे.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१५ मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांना मार्च महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज एप्रिल १ अंक व सावध राहा! एप्रिल-जून अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक दाखवावे. दोन्ही प्रात्यक्षिकांनंतर, प्रचारक नियतकालिकाच्या शेवटल्या पृष्ठाचा वापर करून घरमालकाला स्मारकविधीचे निमंत्रण कसे देतो हे दाखवावे. तसेच खास स्मारकविधीकरता छापण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकांचा वापर करून आस्थेवाईक लोकांना स्मारकविधीकरता कसे आमंत्रित करता येईल हेही दाखवावे.

१० मि:अजूनही देवाचा ताबा आहे का? टेहळणी बुरूज एप्रिल १, २००६ अंकाच्या पृष्ठ ३१ वरील माहितीवर आधारित भाषण व प्रात्यक्षिक. या खास जाहीर भाषणाकरता जास्तीतजास्त लोकांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही, ते अभ्यासाला बसत नसतील तरीसुद्धा, या खास जाहीर भाषणाकरता निमंत्रित करावे. आपल्या संदेशाविषयी आस्था दाखवणाऱ्‍या तुमच्या ओळखीच्या सर्व लोकांना, व घरोघरच्या सेवाकार्यात भेटणाऱ्‍या आस्थेवाईक लोकांना या खास जाहीर भाषणाचे निमंत्रण द्यावे. अक्रियाशील झालेल्या एखाद्या व्यक्‍तीला किंवा जिने सभांना यायचे सोडून दिले आहे अशा व्यक्‍तीला टेहळणी बुरूज एप्रिल १ अंकातील माहितीचा उपयोग करून निमंत्रण कसे देता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवावे.

२० मि:स्थानिक अनुभव. मार्च महिन्यात बायबल काय शिकवते पुस्तक सादर करताना कोणते चांगले अनुभव आले हे सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करावे. बायबल अभ्यास सुरू करण्यात आले असल्यास त्यांचा खासकरून उल्लेख करावा. एक किंवा दोन वैशिष्ट्यपूर्ण अनुभव प्रात्यक्षिकाच्या रूपात सादर केले जाऊ शकतात.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

१५ मि:स्थानीय घोषणा. “बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकाच्या अभ्यासाचा आस्वाद घ्या.” आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००६ अंकातील पृष्ठ ६ वरील या शीर्षकाच्या लेखाची थोडक्यात उजळणी करावी. बायबल काय शिकवते पुस्तकाच्या अभ्यासाकरता दिलेल्या आराखड्याकडे लक्ष वेधावे. तसेच आस्थेवाईक लोकांना स्मारकविधीकरता निमंत्रित करण्याकरता छापील निमंत्रणपत्रिकांचा कशाप्रकारे वापर केला जावा हे ही दाखवावे.

१० मि:स्थानिक गरजा.

२० मि:“नम्र लोकांना देवाच्या मार्गात चालण्यास शिकवा.”b टेहळणी बुरूज जुलै १, २००४ अंकातील पृष्ठ १६, परिच्छेद ९ मधील माहितीचा समावेश करावा.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा