घोषणा
▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). आपल्याला मुले नाहीत असे घरमालकाने सांगितल्यास, ज्ञान पुस्तक किंवा तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याऐवजी, मंडळीकडे साठा असल्यास, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. घरमालक पुस्तक घेत नसतील तर जागृत राहा! माहितीपत्रक सादर करा. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. ज्या मंडळ्यांकडे हे पुस्तक नाही त्यांनी प्रकटीकरण कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे.
▪ एप्रिल १७, २००६ या आठवड्यापासून आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासात बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. त्यावेळेला मंडळ्यांजवळ, या पुस्तकाच्या प्रतींचा पुरेसा साठा असला पाहिजे.
▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. दुरुस्ती किंवा बांधकाम यासाठी एक वेगळा जमाखर्च असेल तर या अहवालाची हिशेब तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. हिशेब तपासणी पूर्ण झाल्यानंतर, मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ जगभराच्या कार्यासाठी व राज्य सभागृह फंडसाठी चेकने किंवा बँक ड्राफ्टने थेट शाखा दफ्तराला पाठवल्या जाणाऱ्या सर्व वर्गण्या “वॉच टावर सोसायटी”ला देय केल्या पाहिजे.
▪ ट्रान्सफ्युजन ऑल्टरनेटिव्ह हेल्थ केअर—मीटिंग पेशंट नीड्स अँड राइट्स या व्हिडिओपटाची चर्चा जानेवारी महिन्यातील एका सेवा सभेत केली जाईल. गरज असेल तर मंडळीद्वारे या व्हिडिओपटाच्या प्रती होता होईल तितक्या लवकर मागवाव्यात.
▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल नेमके काय शिकवते? —इंग्रजी, कन्नड, तामीळ, तेलगू, नेपाळी, मराठी, मल्याळम, हिंदी
सर्व दुःखांचा लवकरच अंत होणार! (पत्रिका क्र. २७) —इंग्रजी, उर्दू, कन्नड, कोंकणी (रोमन लिपी), खासी, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी