सेवा सभा आराखडा
ऑक्टोबर १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून ऑक्टोबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर त्या विशिष्ट सादरतेतील काही उपयोगी मुद्द्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधावे. शिवाय, स्थानीय लोकांना लागू होऊ शकणाऱ्या मासिकातील इतर लेखांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करा.
१५ मि: तुम्हाला वाचनाच्या चांगल्या सवयी आहेत का? सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे २१-६ वरील निवडक माहितीच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा. आपल्या वाचनात आपण कशाचा समावेश करू शकतो? (पृ. २१ वरील चौकोन) आपल्याला दिल्या जात असलेल्या प्रकाशनांचे वाचन करणे महत्त्वाचे का आहे? (पृ. २३, परि. २) उत्तम वाचन कार्यक्रम टिकवून ठेवण्यामागचे मुख्य कारण कोणते आहे? (पृ. २६, परि. ३-४) टेहळणी बुरूज आणि सावध राहा! वाचण्यासाठी तुम्ही वेळ कसा काढता? यामुळे तुम्हाला फायदा कसा झाला आहे?
२० मि: “देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा.”a कोणकोणत्या परिस्थितीत आपल्याला, साक्ष देण्याकरता धैर्य एकवटणे कठीण वाटू शकते, यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना सांगा. कोणत्या गोष्टीने त्यांना साहाय्य केले आहे?
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १३ (१२४)
१० मि: स्थानीय घोषणा. सप्टेंबर २००५ आमची राज्य सेवा यातील पुरवणीतील तिसऱ्या भागाचा उपयोग करून बायबल अभ्यास चालवताना शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग कसा करता येईल याविषयी एक किंवा दोन मुद्द्यांची उजळणी करा.
१५ मि: इंटरनेटचे धोके टाळा. सावध राहा! फेब्रुवारी ८, २०००, पृष्ठे १९-२१ वरील लेखावर आधारीत वडिलांचे भाषण.
२० मि: “परोपकार दाखवून लोकांमध्ये रस घ्या.”b क्षेत्र सेवा करताना आपण इतरांना परोपकार कसे दाखवू शकतो यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना सांगा. आपण ज्यांना प्रचार करतो त्यांच्यामध्ये इतर कोणकोणत्या बाबतीत आपण रस घेऊ शकतो याची चर्चा आमची राज्य सेवा याच्या पुढील अंकात केली जाईल.
गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. आमची राज्य सेवा जानेवारी २००५ अंकाच्या पुरवणीत सुचवलेल्या सादरतांपैकी एका सादरतेचा किंवा तुमच्या क्षेत्रात लागू होणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही सादरतेचा उपयोग करून नोव्हेंबर महिन्यासाठी असलेले प्रकाशन कसे सादर करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.—पाहा आमची राज्य सेवा जानेवारी २००५, पृ. ८ परि. ५.
१५ मि: स्थानीय गरजा.
२० मि: आपल्या पेहरावावरून व शृंगारावरून देवावर असलेला विश्वास प्रतिबिंबित करणे. टेहळणी बुरूज ऑगस्ट १, २००२, पृष्ठे १७-१९ वरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. आपल्या सभ्य पेहरावामुळे साक्ष देण्याची संधी कशी निर्माण होऊ शकते, यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना सांगा.
गीत क्र. १२ (११३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर ३१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना ऑक्टोबर महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून नोव्हेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. एका प्रात्यक्षिकात, घरमालकाला “आमच्या पुढील अंकात” हा चौकोन दाखवून त्यांना पुढच्या भेटीसाठी तयार करा.—आमची राज्य सेवा ऑक्टोबर १९९८, पृ. ८, परि. ७-८ पाहा.
१५ मि: घरमालकाची आस्था वाढवण्यासाठी नियतकालिक मार्गाचा उपयोग करा. आमची राज्य सेवा मे २००५ अंकाच्या पृष्ठ ८ वर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. नियतकालिक मार्ग कसा सुरू करायचा? (परि. १) एक-शास्त्रवचन चर्चा कशी तयार करता येईल? (परि. ३) केवळ एखादे शास्त्रवचन निवडून ते वाचणे पुरेसे का नाही? (परि. ४) नियतकालिक मार्गाचे रुपांतर बायबल अभ्यासात कसे होऊ शकते? (परि. ५) एक प्रचारक आपल्या नियतकालिक मार्गावर एक-शास्त्रवचन चर्चा करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: ठामनिश्चयी परंतु आदरपूर्वक असलेले तरुण. टेहळणी बुरुज सप्टेंबर १५, २००२, पृष्ठे २३-४ वरील “सहभाग घेण्यास आदरपूर्वक नकार” या मथळ्या खालील माहितीवर आधारित वडिलांचे भाषण. शाळेत कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आणि कोणत्या गोष्टीमुळे त्यांना या समस्या यशस्वीरीत्या हाताळण्यास मदत मिळाली हे सांगण्यास आधीच एक अथवा दोन युवकांची व्यवस्था करा.
गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
५ मि: स्थानीय घोषणा.
२० मि: सभांमध्ये एकाग्रतेची क्षमता वाढवणे. टेहळणी बुरुज सप्टेंबर १५, २००२, पृष्ठे १२-१४, परिच्छेद ११-१४ वर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. दिलेल्या सूचनांची उजळणी करा आणि मंडळीच्या सभांतून होता होईल तितका अधिक फायदा करून घेण्यासाठी कोणत्या गोष्टीने त्यांना मदत केली आहे यावर टिपणी करण्यास श्रोत्यांना सांगा.
२० मि: “इतरांशी बुद्धिवाद करण्याची कला विकसित करा.”c स्थानीय क्षेत्रातील विविध पार्श्वभूमीच्या लोकांबरोबर ते बुद्धिवाद कसा करू शकले हे सांगण्यासाठी काही विशिष्ट प्रचारकांना निवेदन करा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.