वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km ९/०५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता सप्टेंबर: तुमची काळजी वाहणारा सृष्टीकर्ता आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक सादर करावे. पर्यायी सादरता म्हणून जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) हे पुस्तक किंवा कोणतेही १९२ पानी जुने पुस्तक सादर केले जाऊ शकते. घरमालकाने पुस्तक स्वीकारले नाही तर जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. घरमालकाने आस्था दाखवल्यास कृपया अपेक्षितो माहितीपत्रक द्यावे. नोव्हेंबर: थोर शिक्षकाकडून शिका पुस्तक (इंग्रजी). आपल्याला मुले नाहीत असे घरमालकाने सांगितल्यास, ज्ञान पुस्तक किंवा तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यावी. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याऐवजी, मंडळीकडे साठा असल्यास, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही या पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील.

▪ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्‍तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्ट) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.

▪ बहिष्कृत केलेल्यांना किंवा ज्यांनी मंडळीशी आपला संबंध तोडला आहे अशांना जाऊन भेटण्याच्या संबंधाने, टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२, पृष्ठे १७-९ वरील सूचना पाळण्याची सर्व वडिलांना आठवण करून दिली जाते.

▪ २००६ सालच्या स्मारकविधीच्या काळातील खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल ३० रोजी दिले जाईल. भाषणाचा विषय नंतर कळवला जाईल. त्या रविवारी ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट असेल किंवा संमेलन असेल त्या मंडळ्यांमध्ये जाहीर भाषण पुढील आठवडी दिले जाईल. रविवार, एप्रिल ३०, २००६ च्या आधी कोणत्याही मंडळीत हे खास जाहीर भाषण दिले जाऊ नये.

▪ ऑक्टोबर महिन्यात पाच शनिवार रविवार येत असल्यामुळे या महिन्यात सहायक पायनियर सेवा करण्याची उत्तम संधी आहे.

▪ सन २००६ सेवा वर्षादरम्यान, मंडळीला विभागीय पर्यवेक्षक भेट देत असलेल्या महिन्यात सहायक पायनियरींग करत असलेले सर्वजण भेटीच्या आठवड्यात पायनियरांसोबत होणाऱ्‍या सभेच्या सुरुवातीच्या अर्ध्या सत्राला उपस्थित राहू शकतात. उपस्थित राहू शकणाऱ्‍या सर्वांना या खास व्यवस्थेचा फायदा घेण्याचे उत्तेजन देण्यात येत आहे.

▪ नवीन सेवा वर्षादरम्यान, प्रत्येक मंडळीच्या वापरासाठी वार्षिक सेवा फॉर्म्सचा पुरेसा साठा पाठवण्यात येत आहे. पाठवलेला साठा, पुढील सेवा वर्षासाठी पुरेसा आहे की नाही याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी. यांपैकी कोणत्याही फॉर्म्सचा आणखी साठा हवा असेल तर सप्टेंबरच्या तुमच्या लिटरेचर रिक्वेस्टसोबत कृपया त्यांची लवकरात लवकर मागणी करावी.

▪ ड्यूरेबल पॉवर ऑफ अटर्नी (डीपीए) कार्ड आजीवन वापराकरता असल्यामुळे दर वर्षी नवीन कार्ड भरण्याची गरज नाही. शिवाय विशिष्ट प्रकारच्या कागदावर छापलेले असल्यामुळे हे कार्ड बरीच वर्षे टिकू शकते. त्यामुळे दर वर्षीच्या फॉर्म्सच्या साठ्यासोबत डीपीए कार्डांचा व डीपीए कार्ड भरण्याकरता सूचना (डीपीएआय) या फॉर्म्सचा साठा पाठवला जाणार नाही. प्रत्येक मंडळीने आपल्या मंडळीच्या गरजेनुसार या फॉर्म्सचा साठा लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून मागवावा. मंडळीजवळ या कार्डांचा व सूचनापत्रांचा पुरेसा साठा वर्षभर राहील याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी व त्यानुसार आधीपासूनच या साहित्याची मागणी करावी जेणेकरून मंडळीचा साठा संपणार नाही. डीपीए कार्ड फक्‍त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे पण हे कार्ड भरण्याचे सूचनापत्र (डीपीएआय) हे इंग्रजी, कन्‍नड, तमीळ, तेलगू, मल्याळम व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

▪ उपलब्ध झालेली नवीन सीडी-रॉम:

वॉचटावर लायब्ररी—२००४ आवृत्ती —इंग्रजी.

ही सीडी सर्वसामान्य लोकांना देण्याकरता, शाळांच्या ग्रंथालयांकरता किंवा आपल्या संदेशात आस्था दाखवणाऱ्‍यांसाठी नाही. ही सुविधा केवळ मंडळीच्या अशा बांधवांकरता आहे ज्यांच्याकडे कंप्युटर वापरण्याची सोय आहे. ही सीडी केवळ मंडळीकडूनच मागवता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा