सेवा सभा आराखडा
डिसेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पुढील आठवडी होणाऱ्या चर्चेच्या तयारीकरता सर्वांना, रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्याचे उत्तेजन द्या. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ तारखेला खास क्षेत्र सेवेच्या व्यवस्थांविषयी सांगा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून डिसेंबर १५ चा टेहळणी बुरूज अंक आणि ऑक्टोबर-डिसेंबरचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक सादरतेत, “मी आधीच तुमच्या कामाशी सुपरिचित आहे,” असे बोलून जे संभाषणाला खीळ घालतात अशा लोकांबरोबर कसे बोलायचे ते दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान १२ पाहा.
१५ मि: “तुमची मदत हवी आहे.”a एका वडिलांची छोटीशी मुलाखत घ्या. मंडळीत सेवा करण्याकरता, कोणत्या गोष्टीमुळे त्यांना अध्यक्षाचे काम करू पाहण्याचे उत्तेजन मिळाले व नियुक्त होण्यासाठी असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास कोणत्या गोष्टीने त्यांना मदत केली, हे विचारा.
२० मि: “नातेवाईकांना साक्ष देणे—कसे?”b दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. कशाप्रकारे, नातेवाईकांची सत्यात आवड निर्माण करून त्यांना साक्ष दिली यावर संक्षिप्त टिपणी देण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.
गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
५ मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: “ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. आमची राज्य सेवा याच्या ऑक्टोबर २००४ अंकाच्या पुरवणीतून काही मुद्द्यांचा समावेश करा. प्रशालेतून कशाप्रकारे फायदा मिळत आहे, यावर टिपणी देण्यासाठी एक किंवा दोघांना आधीच सांगा.
२५ मि: “रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते या व्हिडिओतून लाभ मिळवणे.” पान ३ वरील प्रश्नांचा उपयोग करून, रक्ताविना या व्हिडिओवर श्रोत्यांबरोबर चर्चा. नंतर शेवटला परिच्छेद वाचा. रक्त वर्ज्य करण्यास आपल्याला साहाय्य करणाऱ्या नवीन तरतुदीविषयी चर्चा होणार असल्यामुळे सर्वांना पुढच्या आठवड्याच्या सेवा सभेसाठी उपस्थित राहायचे उत्तेजन द्या.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्व प्रचारकांना त्यांचा डिसेंबरचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून जानेवारी १ चा टेहळणी बुरूज अंक आणि जानेवारी-मार्चचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
२५ मि: रक्त वर्ज्य करा, या देवाच्या आज्ञेचे पालन करणे. शाखा दफ्तराने पाठवलेल्या मॅन्यूस्क्रीप्टचा उपयोग करून वडिलांनी भाषण द्यावे. सुरवातीलाच हे सांगा, की डिपीए कार्ड आजच भरावयाचे नाहीत. मॅन्यूस्क्रीप्ट वाचत असताना, वक्ता, मुख्य मुद्द्यांवर जोर देण्याकरता संक्षिप्त टिपणींचा समावेश करू शकतो, पण मॅन्यूस्क्रीप्टमध्ये अधिक उदाहरणांचा किंवा शास्त्रवचनांचा समावेश करू नये. वेळ मिळेल त्यानुसार ते, उल्लेखित शास्त्रवचनांचे वाचन करू शकतात किंवा ती केवळ उद्धृत करू शकतात. उचित मुद्द्यांच्या वेळी, “रक्त वर्ज्य करण्यास आपल्याला साहाय्य करणारी नवीन तरतूद” या चौकानातील विधानांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करा. सचिवांनी, मंडळीतील बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व प्रचारकांना एक एक डिपीए कार्ड द्यावे आणि “डिपीए कार्ड भरण्यासंबंधीच्या सूचना” द्याव्यात जेणेकरून त्यांना हा भाग हाताळला जात असताना त्या सूचना पाहता येतील. ओळख पत्र याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याची सचिवांनी खात्री करावी.
१० मि: तुमच्या विवेकाची भूमिका. टेहळणी बुरूज, जून १५, २००४, पृष्ठे २३-४ वरील परिच्छेद १६-१९ वर आधारित वडिलांचे भाषण. आपल्या विवेकानुसार घ्यावे लागणारे निर्णय हे गंभीर निर्णय असतात कारण यांत, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध गोवलेला असतो, यावर जोर द्या.
गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. जानेवारी महिन्यात कोणते प्रकाशन सादर करायचे आहे ते सांगा.
२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ४.” पहिल्या परिच्छेदावर केवळ एक मिनिटाच्या प्रस्तावनेनंतर, परिच्छेद २-३ वर आधारित पाच मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा; यात, एक बायबल अभ्यास संचालक अभ्यासाची तयारी कशी करायची हे विद्यार्थ्याला दाखवत आहे. या प्रात्यक्षिकात ते, ज्ञान पुस्तक किंवा अपेक्षा माहितीपत्रकातील एखाद्या परिच्छेदाची चर्चा करतात. मग, परिच्छेद २-५ वर प्रश्नोत्तराने चर्चा केल्यानंतर, प्रात्यक्षिकातील मुख्य मुद्द्यांवर जोर द्या.
१५ मि: “संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था.” पान ४ वरील लेखावर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. माहीत असेल तर, पुढील विभागीय संमेलनाची व खास संमेलन दिवसाची तारीख सांगा. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांनी, अध्यक्ष पर्यवेक्षकांना याविषयी लवकरात लवकर कळवावे.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.