वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०४ पृ. १
  • आपला डोळा निर्दोष ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला डोळा निर्दोष ठेवा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचा डोळा निर्दोष आहे का?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • “डोळ्याबद्दल डोळा” या नियमाचा काय अर्थ होता?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • खास संमेलन दिवसाची उजळणी
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ९/०४ पृ. १

आपला डोळा निर्दोष ठेवा

१. निर्दोष डोळा असणे म्हणजे काय आणि हे महत्त्वाचे का आहे?

१ डोंगरावरील प्रवचनात येशूने, लाक्षणिक किंवा आध्यात्मिक डोळा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर किती जबरदस्त प्रभाव पाडू शकतो याकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित केले. तो म्हणाला: “ह्‍यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल.” (मत्त. ६:२२, २३) निर्दोष डोळा म्हणजे एकाच उद्देशावर केंद्रित असणे अर्थात देवाची इच्छा पूर्ण करणे; तो भौतिक गोष्टींबद्दलच्या अनावश्‍यक चिंतांमुळे विचलित होत नाही. (मत्त. ६:१९-२१, २४-३३) कोणती गोष्ट निर्दोष डोळा टिकवून ठेवायला आपल्याला मदत करू शकते?

२. देवाचे वचन भौतिक गोष्टींबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगण्याचे उत्तेजन देते?

२ संतृप्त असणे: आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे हे शास्त्रवचनांनुसार एक कर्तव्य आहे. (१ तीम. ५:८) पण याचा अर्थ आपण जे सर्वात उत्तम आणि सर्वात आधुनिक आहे ते मिळवण्यासाठी सतत झटत राहिले पाहिजे. (नीति. २७:२०; ३०:८, ९) त्याऐवजी, शास्त्रवचने आपल्याला “अन्‍नवस्त्र” अर्थात जे जीवनाश्‍यक आहे तेवढ्यात तृप्त राहायला आर्जवतात. (१ तीम. ६:८; इब्री लोकांस १३:५, ६) या सल्ल्याकडे लक्ष दिल्याने आपल्याला आपला डोळा उचित गोष्टीवर केंद्रित ठेवता येईल.

३. कोणती गोष्ट आपल्याला स्वतःवर ओझे लादून घेण्याचे टाळण्यास मदत करू शकेल?

३ अनावश्‍यक कर्जात न बुडण्याद्वारे व अनावश्‍यक वस्तू गोळा न करण्याद्वारे किंवा वेळखाऊ व ज्यांकडे लक्ष द्यावे लागते अशा गोष्टींच्या मागे न धावण्याद्वारे आपण सुज्ञता दाखवतो. (१ तीम. ६:९, १०) हे आपण कसे करू शकतो? एखाद्या कार्याला सुरवात करण्याआधी, त्याविषयी प्रार्थनापूर्वक विचार करा आणि या कार्यामुळे आध्यात्मिक गोष्टींत बाधा येणार नाही याची प्रामाणिकपणे खात्री करा. आध्यात्मिक गोष्टींना आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याचा दृढनिश्‍चय करा.—फिलिप्पै. १:१०; ४:६, ७.

४. आपली जीवनशैली साधी बनवण्याचे मार्ग आपण का शोधले पाहिजे?

४ आपली जीवनशैली साधी बनवा: भौतिकवादाचे आकर्षण कमी करण्यास साहाय्य करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली साधी बनवा. आपले कुटुंब जादा भौतिक गोष्टींविना जगू शकते, असे ज्या बांधवाला वाटले ते म्हणाले: “मी आता मंडळीत पहिल्यापेक्षा अधिक सहभाग घेऊन माझ्या बांधवांची सेवा करू शकतो. माझी ही पूर्ण खात्री पटली आहे, की व्यक्‍तिगत गोष्टींपेक्षा खऱ्‍या उपासनेला प्राधान्य देणाऱ्‍या सर्व सेवकांना यहोवा आशीर्वादित करतो.” तुम्ही आपली जीवनशैली साधी बनवून आणखी आशीर्वाद मिळवू इच्छिता का?

५. आपले डोळे निर्दोष ठेवण्यासाठी सतत प्रयत्न का केला पाहिजे?

५ सैतानाच्या, त्याच्या भौतिक जगाच्या आणि आपल्या अपरिपूर्ण शरीराच्या कुप्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या डोळ्यांना इकडे-तिकडे भटकू देण्यापेक्षा आपण त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आणि सार्वकालिक जीवनाच्या आपल्या आशेवर केंद्रित ठेवू या.—नीति. ४:२५; २ करिंथ. ४:१८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा