वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०४ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • फेब्रुवारी ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • फेब्रुवारी २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००४
km २/०४ पृ. २

सेवा सभा आराखडा

फेब्रुवारी ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून, जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि फेब्रुवारी १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. एका प्रात्यक्षिकात, “मला माझा स्वतःचा धर्म आहे” या संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या लोकांबरोबर कसे बोलायचे ते दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान १० पाहा.

१० मि: “यहोवाच्या जवळ या पुस्तकाच्या अभ्यासातून फायदा प्राप्त करा.” लेखावर आधारित मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांचे भाषण. परिच्छेद २ ची चर्चा करताना श्रोत्यांना अभ्यास आराखडा पाहायला सांगा. परिच्छेद ३ ची चर्चा करताना, पुस्तकातील पृष्ठ २५ वरील परिच्छेद २३ वाचा आणि त्यावर चर्चा करा.

२५ मि: “यहोवाच्या अद्‌भुत कार्यांचे वर्णन करीत राहा.”a (१-१० परिच्छेद) सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करा. स्मारकविधीच्या महिन्यांदरम्यान क्षेत्र सेवेतील आपला सहभाग वाढवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यांतील निवडक घोषणा.

१५ मि: “देवाचा पाठिंबा असलेले कार्य.”b उद्‌घोषक (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे ५४७-८ वरील टिपणींचा समावेश करा.

२० मि: “यहोवाच्या अद्‌भुत कार्यांचे वर्णन करीत राहा.”c (११-१७ परिच्छेद) दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करा. एक प्रचारक, पुनर्भेट घेत असलेल्या व्यक्‍तीला स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देतो, असे एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.

फेब्रुवारी २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २० (९३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि मार्च १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक दाखवा. दोन्ही प्रसंगी, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत. एका प्रात्यक्षिकानंतर, घरमालकाला एक विचारप्रवर्तक प्रश्‍न विचारा ज्याचे उत्तर अपेक्षा माहितीपत्रकातून पुढील भेटीच्या वेळी देता येईल.

१५ मि: “सभांना नियमित उपस्थित राहण्याला—प्राधान्य देणे.”d एक दोघांना आधीच, मंडळीच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहण्याकरता त्यांनी काय व्यवस्था केली आहे हे सांगण्याची योजना करा.

२० मि: “मंडळीत” यहोवाचे स्तवन. टेहळणी बुरूज सप्टेंबर १, २००३, पृष्ठे १९-२२ वरील लेखाच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा. (१) आपण सभांमध्ये टिपणी का देतो त्याचे कारण स्तोत्र २२:२२, २५ मध्ये ठळकपणे कसे दिसते? (२) प्रार्थना करणे फायदेकारक का आहे? (३) तयारी करणे आवश्‍यक का आहे? (४) सभांमध्ये आपल्या सर्वांचे ध्येय काय असले पाहिजे? (५) पुढे बसणे फायदेकारक का आहे? (६) इतर काय म्हणतात त्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे का आहे? (७) आपण आपल्या शब्दांत उत्तर कसे देऊ शकतो? (८) आपण इतरांना आपल्या टिपणींद्वारे उत्तेजन कसे देऊ शकतो? (९) सभा घेणाऱ्‍या बांधवाची काय जबाबदारी आहे?

गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २८ (२२४)

१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना फेब्रुवारी महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. मार्च महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा आणि आमची राज्य सेवा जानेवारी २००२ मध्ये सुचवलेल्या सादरतांपैकी एकाची संक्षिप्त उजळणी करा.

१५ मि: सहविश्‍वासू बंधूभगिनींबरोबर मैत्री वाढवणे. (नीति. १८:२४; २७:९) टेहळणी बुरूज डिसेंबर १, २०००, पृष्ठे २२-३ वरील लेखावर आधारित भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा. खऱ्‍या उपासनेच्या आशीर्वादांपैकी एक आहे, खरे मित्र बनवण्याची संधी. आपल्या बंधूभगिनींबरोबर सभा, क्षेत्र सेवा आणि इतर प्रसंगी सहवास राखल्याने आपल्याला पुष्कळ उत्तेजन मिळते. मंडळीतील इतरांबरोबर आपण मैत्री कशी वाढवू शकतो? “टिकाऊ मैत्रीकरता सहा मुद्दे,” या पेटीची उजळणी करा आणि प्रत्येक मुद्दा बंधूभगिनींबरोबरच्या आपल्या व्यवहाराला कसा लागू होतो त्यावर टिपणी देण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.

२० मि: “आपण यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो.”e दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करा. वेळ असेल तर उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांवर भर द्या.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा