प्रश्न पेटी
◼ आपण मंडळीच्या सभांतील प्रत्येक भाग ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची खात्री कशाप्रकारे करू शकतो?
आपल्या मित्रांबरोबर आपण काही प्रोत्साहक गोष्टी बोलत असतो तेव्हा आपल्याला वेळ पुरत नाही. म्हणूनच, ठरलेल्या वेळेत सभांतील भाग पूर्ण करणे कठीण जाऊ शकते. कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील?
वेळेवर सुरू करा. मंडळीतील सर्वजण येतात तेव्हा, सभा सुरू करायच्या एक किंवा दोन मिनिट आधी श्रोत्यांना आपापल्या जागेवर बसण्याची विनंती केली जाऊ शकते जेणेकरून सभा ठरलेल्या वेळी आणि व्यवस्थित सुरू करता येईल. (उप. ३:१) लहान गटांच्या सभा जसे की क्षेत्र सेवेच्या सभा, उशिरा येणाऱ्यांकरता थांबून उशिरा सुरू करू नयेत.
चांगली तयारी करा. पूर्वतयारी हा, सभांची वेळेवर सुरवात करण्याचा एक मार्ग आहे. मिळालेल्या भागाचा उद्देश नीट समजून घ्या. त्यांतील मुख्य मुद्दे ओळखा आणि त्यांवर अधिक जोर द्या. बारीकसारीक तपशीलांची माहिती देऊन विषयापासून दूर भरकटू नका. साधी सादरता करा. या भागात प्रात्यक्षिके, मुलाखती असल्यास त्यांची आधीच तयारी करा. भागाची मोठ्याने बोलून तयारी करताना होता होईल तितके वेळेकडे लक्ष ठेवा.
मिळालेल्या भागाची विभागणी करा. तुमचा भाग, एखादे भाषण असो अथवा श्रोत्यांबरोबर चर्चा असो, त्याची विभागणी केल्यास तुम्हाला मदत होईल. मग प्रत्येक विभागावर किती वेळ चर्चा करायची ते ठरवा आणि तुमच्या रूपरेषेच्या समासात ते लिहा. आणि मग स्टेजवर गेल्यावर प्रत्येक भाग त्या वेळेत पूर्ण होत आहे का, हे तुमच्या घड्याळानुसार पाहात राहा. श्रोत्यांबरोबर चर्चा करताना, प्रस्ताविक भागात पुष्कळ मुद्द्यांची इतकी चर्चा करू नका की भागातील इतर अधिक महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ उरणार नाही. टेहळणी बुरूज अभ्यास संचालकांनी, अभ्यासाच्या शेवटी उजळणी पेटीचा विचार करण्याकरता पुरेसा वेळ ठेवावा. समाप्तीचे गीत आणि प्रार्थना यांसाठी ठरवलेला वेळ न घेण्याची खबरदारी देखील त्यांनी बाळगावी.
वेळेवर समाप्त करा. एका सभेत अनेक भाग असल्यास, जसे की सेवा सभा, प्रत्येक वक्त्याने आपला भाग केव्हा सुरू झाला पाहिजे व केव्हा समाप्त झाला पाहिजे याची जाणीव ठेवावी. सभा ओव्हरटाईम जात असेल तर काय? उरलेला एक किंवा अनेक भाग हाताळणाऱ्या बांधवाने किंवा बांधवांनी आपल्या भागांतील बारीकसारीक तपशीलांपेक्षा मुख्य मुद्द्यांवर चर्चा करून वेळ भरून काढला पाहिजे. असे करण्याची क्षमता एका कुशल शिक्षकाचे ओळखचिन्ह आहे.
श्रोते या नात्याने आपणही संक्षिप्त आणि मुद्देसूद टिपणी देऊन भाग हाताळणाऱ्या बांधवाला साहाय्य करू शकतो. यास्तव, आपण सर्वजण सभा “शिस्तवार व व्यवस्थितपणे” होण्यास हातभार लावू शकतो.—१ करिंथ. १४:४०.