घोषणा
▪ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके सादर करा. घरमालक आस्था दाखवतो तेव्हा, अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी खास प्रयत्न करा. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? माहितीपत्रक किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक सादर करा. ज्या घरमालकांकडे ही प्रकाशने आधीच आहेत त्यांना एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करा. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करू शकता. जानेवारी: १९८८ च्या आधीचे मंडळीकडे असलेल्या साठ्यातील कोणतेही पुस्तक. यांपैकी एकाचाही साठा तुमच्याकडे नसल्यास, जवळपासच्या मंडळीत जुन्या पुस्तकांचा अधिक साठा आहे का याची विचारपूस करा. ज्या मंडळ्यांकडे जुन्या पुस्तकांचा साठा नाही त्या, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य किंवा तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे ही पुस्तके सादर करू शकतात.
▪ आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पुरवणीत “सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” आहे आणि तो संपूर्ण २००४ वर्षाकरता जपून ठेवावा.
▪ तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळा जानेवारी १ पासून बदलणार असतील तर मंडळीच्या सचिवांनी काँग्रीगेशन मिटिंग इन्फरमेशन आणि हॅण्डबिल रिक्वेस्ट फॉर्म (S-5) भरून शाखा दफ्तराला कळवावे. हॅण्डबिल हवे असल्यास, हॅण्डबिल रिक्वेस्ट फॉर्म (S-16) भरून ते मागवू शकता. हॅण्डबिल्सची मागणी निदान आठ आठवड्यांआधी पाठवल्यास तुम्हाला निर्धारित वेळी ती मिळू शकेल.
▪ नोव्हेंबर ८-९ २००३ रोजी ऐज्वाल येथे होणाऱ्या “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनाच्या सभागृहाचा सुधारित पत्ता पुढीलप्रमाणे आहे: Archives Conference Hall, Art and Culture Department, Near Basketball Court, Babutlang, Aizawl 796 001 Mizoram.
▪ बंगळूर येथील बेथेल कुटुंब, बंगळूरच्या नव्या शाखा संकुलाच्या आगामी समर्पणाच्या संबंधाने अतिशय व्यस्त असेल. तेव्हा, नोव्हेंबर ७, २००३ पासून डिसेंबर २२, २००३ पर्यंत संकुलाच्या टुअरची व्यवस्था केली जाणार नाही.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? —पंजाबी, हिंदी
आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा —कन्नड, तेलगू, मल्याळम, हिंदी
पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या —पंजाबी, हिंदी