सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००४ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुरूप चालवली जाईल.
मूळ-पाठ: द होली बायबल मराठी—आर. व्ही. [bsi], टेहळणी बुरूज [w-MR], ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या [be], ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक’ (१९९० आवृत्ती) [si], शास्त्रवचनांतून युक्तिवाद करणे (१९८९ आवृत्ती) [rs].
प्रशालेची सुरवात, गीत, प्रार्थना आणि स्वागतपर शब्दांनी वेळेवर झाली पाहिजे व ती पुढीलप्रमाणे व्हावी:
भाषणाचा गुण: ५ मिनिटे. प्रशाला पर्यवेक्षक, साहाय्यक सल्लागार किंवा दुसरे एखादे योग्यताप्राप्त वडील, सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकावर आधारित असलेल्या एखाद्या भाषणाच्या गुणाची चर्चा करतील. (कमी वडील असलेल्या मंडळ्यांत, योग्यताप्राप्त सेवा सेवकाचा उपयोग केला जाऊ शकतो.) अन्यथा सूचित नसल्यास, नेमलेल्या पानांवरील पेटींतील माहितीसुद्धा चर्चेत समाविष्ट केली जावी. अभ्यासांचा समावेश करू नये. हे अभ्यास खासकरून व्यक्तिगत व खाजगी सल्ल्यासाठी आहेत.
नेमणूक क्र. १: १० मिनिटे. वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या शिक्षणाचा फायदा घ्या (इंग्रजी) किंवा ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आणि लाभदायक’ (इंग्रजी) यावर आधारलेली असेल. हा भाग दहा मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा आणि त्यानंतर उजळणी प्रश्न विचारू नयेत. केवळ दिलेले साहित्य सादर करणे हा या मागील हेतू नसावा तर त्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक वापरावे. या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतात.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: १० मिनिटे. एखाद्या योग्यताप्राप्त वडिलांनी अथवा सेवा सेवकांनी, सुरवातीच्या सहा मिनिटांसाठी दिलेले साहित्य स्थानीय गरजांना प्रभावीपणे लागू केले पाहिजे. आठवड्यासाठी नेमलेल्या बायबल वाचनाच्या कोणत्याही भागावर ते विवेचन मांडू शकतात. पण त्यांनी वाचनाचा केवळ सारांश देऊ नये. या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. वक्त्याने सुरवातीच्या भागासाठी देण्यात आलेल्या सहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेऊ नये. त्यानंतर, त्यांनी उरलेली चार मिनिटे श्रोत्यांबरोबरील चर्चेसाठी असल्याची खातरी करावी. श्रोत्यांना बायबल वाचन करताना आवडलेल्या मुद्यांवर आणि त्यांच्या लाभावर संक्षिप्त (३० किंवा त्याहूनही कमी सेकंदात) टिपणी देण्यासाठी आमंत्रण द्यावे. यानंतर मग प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ४ मिनिटे. वाचनाची ही नेमणूक एखाद्या बांधवाला दिली जावी. हे वाचन सहसा बायबलच्या भागाचे असेल. महिन्यातून एकदा, या नेमणुकीत टेहळणी बुरूज मधील भागाचे वाचन केले जाईल. नेमलेला भाग, प्रस्तावना किंवा समारोप न देता विद्यार्थ्याने नुसताच वाचावा. दर आठवडी वाचनाचा भाग कमी-अधिक असेल; पण तरीसुद्धा चार मिनिटे किंवा कमी वेळात तो वाचून पूर्ण झाला पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षकांनी भाग नेमण्याआधी त्यावर एक नजर टाकावी, विद्यार्थ्याचे वय आणि क्षमता लक्षात घेऊन मग तो नेमावा. प्रशाला पर्यवेक्षक खासकरून विद्यार्थ्याला, नेमलेल्या भागाचा अर्थ समजून, अस्खलितपणे, उचित ठिकाणी जोर देऊन, आवाजात योग्य चढउतार आणून, उचित ठिकाणी थांबून, आणि सहजपणे वाचण्यास मदत करतील.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. ही नेमणूक मिळालेली भगिनी, स्वतः एखादे दृश्य निवडेल अथवा सेवा प्रशाला पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ८२ वरील यादीतील एखादे दृश्य तिला नेमले जाईल. विद्यार्थीनीने, नेमलेला विषय वापरावा आणि तो विषय, स्थानीय मंडळीच्या क्षेत्रात वास्तविक आणि व्यावहारिक ठरेल अशा क्षेत्र सेवेतील एखाद्या पैलूला लागू करावा. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थीनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून तिच्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. नवीन विद्यार्थ्यांना, ज्या भाषणांना संदर्भ दिलेले आहेत अशी भाषणे नेमावीत. विद्यार्थीनी साहित्य कशाप्रकारे मांडते आणि घरमालकाला शास्त्रवचनांवर तर्क करायला तसेच सादरतेतील मुख्य मुद्दे समजायला कशाप्रकारे मदत करते ते प्रशाला पर्यवेक्षक खासकरून पाहतील. ज्या विद्यार्थिनीला हा भाग नेमला जातो तिला वाचता आले पाहिजे. प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थिनीला एक साहाय्यकही नेमतील.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. विद्यार्थ्याने, दिलेल्या विषयावर भाषण तयार करावे. मूळ-पाठ सूचित करणारा संदर्भ नसतो तेव्हा विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला विश्वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या प्रकाशनांतून संशोधन करून आपल्या भाषणासाठी माहिती गोळा करावी लागेल. हा भाग एखाद्या बांधवाला नेमला जातो तेव्हा तो, राज्य सभागृहातील श्रोत्यांना उद्देशून भाषणाच्या रूपात सादर करता येईल. एखाद्या भगिनीला हा भाग नेमल्यास तिने तो नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा. उचित असते तेव्हा प्रशाला पर्यवेक्षक नेमणूक क्रमांक ४ हा भाग एखाद्या बांधवाला नेमू शकतात. कृपया चौफुली चिन्ह असलेले विषय, केवळ बांधवांना नेमले जावेत व ते भाषण-रूपात सादर केले जावेत याची नोंद घ्या.
वेळ: कोणतेही भाषण किंवा सल्लागाराचे शेरे ओव्हरटाईम जाऊ नयेत. नेमणूक क्रमांक २ ते ४, वेळ पूर्ण होते तेव्हा विचारशीलपणे थांबवले पाहिजेत. भाषणाच्या गुणावर सुरवातीचे भाषण देणारे बांधव, नेमणूक क्रमांक १ हाताळणारे किंवा बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणारे बांधव जादा वेळ घेत असतील तर त्यांना खासगीत सल्ला द्यावा. सहभाग घेणाऱ्या सर्वांनी आपल्या वेळेकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाची एकूण वेळ: गीत व प्रार्थना सोडून ४५ मिनिटे आहे.
सल्ला: १ मिनिट. विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील एखाद्या प्रशंसनीय मुद्द्यावर सकारात्मक अभिप्राय देण्याकरता प्रशाला पर्यवेक्षकांनी एक मिनिटापेक्षा अधिक वेळ घेऊ नये. प्रशाला पर्यवेक्षकांचा हेतू “भाषण खूप चांगले होते,” फक्त असे म्हणण्याचा नसून विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणातील तो पैलू प्रभावी असण्यामागच्या विशिष्ट कारणांकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार, सभा संपल्यावर किंवा इतर वेळी खासगीत अतिरिक्त सकारात्मक सल्ला दिला जाऊ शकतो.
साहाय्यक सल्लागार: प्रशाला पर्यवेक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी एखादे योग्यताप्राप्त वडील उपलब्ध असल्यास, वडील वर्ग त्यांना साहाय्यक सल्लागार म्हणून नेमू शकतात. मंडळीत अधिक वडील असल्यास दर वर्षी वेगवेगळे वडील ही जबाबदारी सांभाळू शकतील. साहाय्यक सल्लागाराची जबाबदारी, आवश्यक असेल तर नेमणूक क्रमांक १ आणि बायबल वाचनाचे ठळक मुद्दे सादर करणाऱ्या बांधवांना खासगी सल्ला देणे ही असेल. परंतु सहवडिलांच्या किंवा सेवा सेवकांच्या प्रत्येक भाषणानंतर सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ही योजना २००४ दरम्यान चालू राहील आणि पुढे कदाचित त्यात काही फेरबदल केले जातील.
काऊंसल फॉर्म: पाठ्यपुस्तकात आहे.
तोंडी उजळणी: ३० मिनिटे. दर दोन महिन्यांनंतर प्रशाला पर्यवेक्षक एक तोंडी उजळणी घेतील. भाषणाच्या एखाद्या गुणाची चर्चा केल्यानंतर व वर सांगितल्याप्रमाणे बायबल वाचनाच्या ठळक मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर ही उजळणी असेल. तोंडी उजळणी, गेल्या दोन महिन्यांच्या आणि चालू आठवड्याच्या प्रशालेत चर्चिलेल्या विषयांवर आधारित असेल.
आराखडा
जाने. ५ बायबल वाचन: उत्पत्ति १-५ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: माहितीचा अवलंब करण्याचे फायदे स्पष्ट करा (be पृ. १५७ परि. १-पृ. १५८ परि. १)
क्र. १: रूपरेषा तयार करणे (be पृष्ठे ३९-४२)
क्र. २: उत्पत्ति २:७-२५
क्र. ३: ‘नवीन करारात’ भावी पार्थिव परादीसविषयी सांगितले आहे का की ते केवळ ‘जुन्या करारात’ दिले आहे? (rs पृ. २८५ परि. १-३)
क्र. ४: a चांगले करण्याचे कळत असून ते न केल्यास पाप आहे, या बायबलमधील उदाहरणापासून आपण काय शिकू शकतो?
जाने. १२ बायबल वाचन: उत्पत्ति ६-१० गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: साहित्याचा व्यावहारिक अवलंब (be पृ. १५८ परि. २-४)
क्र. १: स्वच्छतेचा नेमका अर्थ काय? (w-MR०२ २/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: उत्पत्ति ८:१-१७
क्र. ३: लबाडी हानीकारक का आहे?
क्र. ४: लूक २३:४३ मध्ये सांगितलेले “सुखलोक” हे ठिकाण हेडीज किंवा स्वर्गातील भाग का असू शकत नाही (rs पृ. २८६ परि. १-पृ. २८७ परि. १)
जाने. १९ बायबल वाचन: उत्पत्ति ११-१६ गीत २९ (२२२)
भाषणाचा गुण: आपल्या संदेशाचे महत्त्व समजण्यास दुसऱ्यांना मदत करणे (be पृ. १५९ परि. १-४)
क्र. १: ईश्वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो (w-MR०२ २/१५ पृष्ठे ४-७)
क्र. २: उत्पत्ति १३:१-१८
क्र. ३: कोणत्या गोष्टीवरून हे कळते, की लूक २३:४३ मध्ये परादीसविषयी जे सांगितले आहे ते पार्थिव परादीसला सूचित होते? (rs पृ. २८७ परि. २-पृ. २८८ परि. २)
क्र. ४: यहोवाचे साक्षीदार त्यांच्या आशेविषयी इतरांना का सांगतात
जाने. २६ बायबल वाचन: उत्पत्ति १७-२० गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: शब्दांची निवड (be पृ. १६० परि. १-३)
क्र. १: दया आणि करुणा दाखवण्यास साहाय्य करणारी सहानुभूती (w-MR०२ ४/१५ पृष्ठे २४-७)
क्र. २: w-MR०२ १/१ पृष्ठे १०-११ परि. ९-११
क्र. ३: लूक १३:२४ मधील येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो
क्र. ४: आपल्यातील कोणीही खरे ज्ञान आणि बुद्धी कशी संपादन करू शकतो? (rs पृ. २८८ परि. ३-पृ. २८९ परि. २)
फेब्रु. २ बायबल वाचन: उत्पत्ति २१-२४ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: सहजपणे समजणारी भाषा (be पृ. १६१ परि. १-४)
क्र. १: प्रशालेसाठी विद्यार्थी नेमणुका तयार करणे (be पृ. ४३ परि. १-पृ. ४४ परि. ३)
क्र. २: उत्पत्ति २१:१-२१
क्र. ३: मानवी तत्त्वज्ञानाचा उगम कोठून आहे? (rs पृ. २८९ परि. ३-पृ. २९० परि. २)
क्र. ४: b विवाहाकरता केलेली मागणी गंभीरपणे का घेतली पाहिजे
फेब्रु. ९ बायबल वाचन: उत्पत्ति २५-२८ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: विविध आणि अचूक अर्थाच्या शब्दांचा वापर (be पृ. १६१ परि. ५-पृ. १६२ परि. ४)
क्र. १: जेव्हा तुमच्या भाषणात एक विषय आणि सेटिंग असते (be पृ. ४४ परि. ४-पृ. ४६ परि. २)
क्र. २: उत्पत्ति २८:१-१५
क्र. ३: या त्रस्त जगात आंतरिक शांती कशी मिळवावी
क्र. ४: मानवी तत्त्वज्ञानापेक्षा येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा अभ्यास करणे योग्य विचारसरणीचा पुरावा का आहे? (rs पृ. २९० परि. ३-पृ. २९१ परि. ३)
फेब्रु. १६ बायबल वाचन: उत्पत्ति २९-३१ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: उत्साह, भावना आणि जिवंत वाटणारे शब्द (be पृ. १६३ परि. १-पृ. १६४ परि. २)
क्र. १: सरळांचा सात्विकपणा त्यांना सांभाळून नेतो (w-MR०२ ५/१५ पृष्ठे २४-७)
क्र. २: w-MR०२ २/१ पृष्ठे १५-१६ परि. ६-१०
क्र. ३: देव कोणाच्या प्रार्थना ऐकण्यास तयार आहे? (rs पृ. २९२ परि. १-पृ. २९३ परि. २)
क्र. ४: ख्रिश्चनांकरता सात्विकपणा हा गुण महत्त्वपूर्ण का आहे
फेब्रु. २३ बायबल वाचन: उत्पत्ति ३२-३५ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: व्याकरणाच्या नियमांच्या अनुरूप बोलणे (be पृ. १६४ परि. ३-पृ. १६५ परि. १)
तोंडी उजळणी
मार्च १ बायबल वाचन: उत्पत्ति ३६-३९ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: रूपरेषेचा उपयोग (be पृ. १६६ परि. १-पृ. १६७ परि. २)
क्र. १: मंडळीसाठी भाषणे तयार करणे (be पृ. ४७ परि. १-पृ. ४९ परि. १)
क्र. २: उत्पत्ति ३७:१२-२८
क्र. ३: आपल्या विश्वासाचा संबंध धीराशी का केला पाहिजे?
क्र. ४: c कोणत्या गोष्टींमुळे एखाद्याची प्रार्थना देव स्वीकारणार नाही? (rs पृ. २९३ परि. ३-पृ. २९४ परि. ३)
मार्च ८ बायबल वाचन: उत्पत्ति ४०-४२ गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: आपल्या विचारांना क्रमवार मांडणे (be पृ. १६७ परि. ३-पृ. १६८ परि. २)
क्र. १: सेवा सभेतील भागांची आणि इतर भाषणांची तयारी करणे (be पृ. ४९ परि. २-पृ. ५१ परि. २)
क्र. २: उत्पत्ति ४२:१-२०
क्र. ३: यहोवाबरोबर निकटचा नातेसंबंध कसा विकसित करता येईल
क्र. ४: d प्रार्थना करण्याकरता कोणते विषय उचित आहेत? (rs पृ. २९४ परि. ४-पृ. २९५ परि. ३)
मार्च १५ बायबल वाचन: उत्पत्ति ४३-४६ गीत २६ (२१२)
भाषणाचा गुण: भाषणाची साधी रूपरेषा ठेवणे (be पृ. १६८ परि. ३-पृ. १६९ परि. ५)
क्र. १: मनापासून केलेल्या प्रयत्नांना—यहोवा केव्हा आशीर्वादित करतो? (w-MR०२ ८/१ पृष्ठे २९-३१)
क्र. २: उत्पत्ति ४३:१-१८
क्र. ३: e‘आधी माझ्याबरोबर प्रार्थना करा, मग मला तुमचा संदेश सांगा,’ असे कोणी आपल्याला म्हणाल्यास (rs पृ. २९५ परि. ४-५)
क्र. ४: अनीतिकारक धनाने आपण मित्र कसे जोडू शकतो?
मार्च २२ बायबल वाचन: उत्पत्ति ४७-५० गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: तर्कानुसार क्रमवार माहिती (be पृ. १७० परि. १-पृ. १७१ परि. २)
क्र. १: यहोवाने हाबेलाचे अर्पण का स्वीकारले आणि काईनाचे का नाही? (w-MR०२ ८/१ पृ. २८)
क्र. २: उत्पत्ति ४७:१-१७
क्र. ३: अद्याप पूर्ण व्हायच्या बायबलच्या काही उल्लेखनीय भविष्यवाण्या कोणत्या आहेत? (rs पृ. २९६ परि. २-पृ. २९७ परि. ३)
क्र. ४: यहोवाचे भय बुद्धीचा उगम का आहे
मार्च २९ बायबल वाचन: निर्गम १-६ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: तर्काला पटेल अशा पद्धतीने माहिती सादर करणे (be पृ. १७१ परि. ३-पृ. १७२ परि. ५)
क्र. १: विचारशक्ती कशाप्रकारे तुमचे संरक्षण करू शकते? (w-MR०२ ८/१५ पृष्ठे २१-४)
क्र. २: w-MR०२ २/१५ पृष्ठे १९-२० परि. ७-११
क्र. ३: गर्वाविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे
क्र. ४: ख्रिश्चनांनी बायबलच्या भविष्यवाणींमध्ये आस्था का घ्यावी? (rs पृ. २९७ परि. ४-८)
एप्रि. ५ बायबल वाचन: निर्गम ७-१० गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: केवळ आवश्यक माहिती देणे (be पृ. १७३ परि. १-४)
क्र. १: जनतेसाठी भाषणे तयार करणे (be पृ. ५२ परि. १-पृ. ५४ परि. १)
क्र. २: निर्गम ८:१-१९
क्र. ३: f‘तुम्ही भविष्यवाणीवर खूपच जोर देता,’ असे कोणी म्हणाल्यास (rs पृ. २९८ परि. १-२)
क्र. ४: आशा “जीवाचा नांगर” का आहे
एप्रि. १२ बायबल वाचन: निर्गम ११-१४ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: नोट्स न पाहता भाषण देणे (be पृ. १७४ परि. १-पृ. १७५ परि. ४)
क्र. १: वक्त्याचे निर्णय (be पृ. ५४ परि. २-४; पृ. ५५, पेटी)
क्र. २: निर्गम १२:१-१६
क्र. ३: यहोवाकडून मिळणारे अनुशासन आपण आनंदाने का स्वीकारले पाहिजे?
क्र. ४: मरणोत्तर प्रायश्चित भूमीची शिकवण कोणत्या धर्तीवर दिली जाते (rs पृ. २९९ परि. १-६)
एप्रि. १९ बायबल वाचन: निर्गम १५-१८ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: नोट्स न पाहता भाषण देतानाचे धोके टाळणे (be पृ. १७५ परि. ५-पृ. १७७ परि. १)
क्र. १: परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा? (w-MR०२ ९/१ पृष्ठे २९-३१)
क्र. २: w-MR०२ ३/१ पृष्ठे १५-१६ परि. ८-११
क्र. ३: एका व्यक्तीच्या पापांची शिक्षा तिला तिच्या मृत्यूनंतरही दिली जाते का? (rs पृ. ३०० परि. २-६)
क्र. ४: g विवाह हे कायमचे बंधन का असले पाहिजे
एप्रि. २६ बायबल वाचन: निर्गम १९-२२ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: इतर कारण विचारतात तेव्हा (be पृ. १७७ परि. २-पृ. १७८ परि. २)
तोंडी उजळणी
मे ३ बायबल वाचन: निर्गम २३-२६ गीत १ (१३)
भाषणाचा गुण: संवादाची शैली (be पृष्ठे १७९-८०)
क्र. १: शिकवण्याच्या कलेत तरबेज व्हा (be पृ. ५६ परि. १-पृ. ५७ परि. २)
क्र. २: निर्गम २३:१-१७
क्र. ३: एका व्यक्तीला तिच्या वाईट सवयींवर मात करायला यहोवा कशी मदत करू शकतो?
क्र. ४: लोकांच्या विविध जाती कोठून आल्या? (rs पृ. ३०१ परि. १-४)
मे १० बायबल वाचन: निर्गम २७-२९ गीत १५ (१२७)
भाषणाचा गुण: आवाजाची गुणवत्ता (be पृ. १८१ परि. १-४)
क्र. १: “फरक करणे” (be पृ. ५७ परि. ३-पृ. ५८ परि. २)
क्र. २: निर्गम २८:२९-४३
क्र. ३: एकच कुटुंब होते तर काईनाला पत्नी कोठून मिळाली? (rs पृ. ३०१ परि. ५-पृ. ३०२ परि. १)
क्र. ४: जातीय पूर्वग्रह चुकीचा का आहे
मे १७ बायबल वाचन: निर्गम ३०-३३ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: व्यवस्थितरीत्या श्वास घेणे (be पृ. १८१ परि. ५-पृ. १८४ परि. १; पृ. १८२, पेटी)
क्र. १: श्रोत्यांना विचार करण्यास प्रोत्साहित करणे (be पृ. ५८ परि. ३-पृ. ५९ परि. ३)
क्र. २: निर्गम ३०:१-२१
क्र. ३: सौम्यवृत्तीचे का असावे?
क्र. ४: विविध जातीय वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण कशावरून मिळते? (rs पृ. ३०२ परि. २-पृ. ३०३ परि. २)
मे २४ बायबल वाचन: निर्गम ३४-३७ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: ताणलेले स्नायू मुक्त करणे (be पृ. १८४ परि. २-पृ. १८५ परि. ३; पृ. १८४, पेटी)
क्र. १: अंमल करण्याचा मार्ग शिकवा आणि उत्तम उदाहरण मांडा (be पृ. ६० परि. १-पृ. ६१ परि. ३)
क्र. २: निर्गम ३६:१-१८
क्र. ३: सर्व मानव देवाची मुले आहेत का? (rs पृ. ३०३ परि. ३-पृ. ३०४ परि. ४)
क्र. ४: थोडक्याविषयी विश्वासू का असावे?
मे ३१ बायबल वाचन: निर्गम ३८-४० गीत १ (१३)
भाषणाचा गुण: इतरांमध्ये आवड घ्या (be पृ. १८६ परि. १-४)
क्र. १: संवादाच्या कलेत सुधारणा कशी करता येईल (be पृ. ६२ परि. १-पृ. ६४ परि. १)
क्र. २: w-MR०२ ५/१ पृष्ठे १९-२० परि. ३-६
क्र. ३: १ योहान ३:१९, २० समजल्याने एखाद्याला सांत्वन कसे मिळू शकेल?
क्र. ४: सर्व जातीच्या लोकांमध्ये बंधू व भगिनी म्हणून कधी ऐक्य घडेल का? (rs पृ. ३०४ परि. ५-पृ. ३०५ परि. ३)
जून ७ बायबल वाचन: लेवीय १-५ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: लक्षपूर्वक ऐकणे (be पृ. १८७ परि. १-५)
क्र. १: संवाद कसा चालू ठेवायचा (be पृ. ६४ परि. २-पृ. ६५ परि. ४)
क्र. २: लेवीय ३:१-१७
क्र. ३: येशू ख्रिस्ताचा मृत्यू, हुतात्मिक मरण आलेल्या इतरांपेक्षा वेगळा कसा होता? (rs पृ. ३०६ परि. १-४)
क्र. ४: गूढ शक्तींशी संपर्क ठेवून पाहण्यात काय चूक आहे?
जून १४ बायबल वाचन: लेवीय ६-९ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: इतरांना प्रगती करायला मदत करणे (be पृ. १८७ परि. ६-पृ. १८८ परि. ३)
क्र. १: प्रश्न विचारणाऱ्याचा दृष्टिकोन समजणे (be पृ. ६६ परि. १-पृ. ६८ परि. १)
क्र. २: लेवीय ७:१-१९
क्र. ३: वाईटाचा द्वेष करण्यास आपण कसे शिकू शकतो?
क्र. ४: खंडणी ज्या प्रकारे पुरवण्यात आली होती त्या प्रकारे ती पुरवण्याची का गरज होती? (rs पृ. ३०६ परि. ६-पृ. ३०७ परि. २)
जून २१ बायबल वाचन: लेवीय १०-१३ गीत २७ (२२१)
भाषणाचा गुण: व्यावहारिक मदत देणे (be पृ. १८८ परि. ४-पृ. १८९ परि. ४)
क्र. १: तुम्ही कसे उत्तर दिले पाहिजे हे माहीत करून घ्या (be पृ. ६८ परि. २-पृ. ७० परि. ३)
क्र. २: लेवीय ११:१-२५
क्र. ३: देवाने फक्त असा हुकूम का दिला नाही, की जे आज्ञाधारक आहेत ते अनंतकाळ जगू शकतील? (rs पृ. ३०७ परि. ३-पृ. ३०८ परि. १)
क्र. ४: फसवेगिरीविषयी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे
जून २८ बायबल वाचन: लेवीय १४-१६ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: इतरांना दाखवला जाणारा आदर (be पृ. १९० परि. १-४)
तोंडी उजळणी
जुलै ५ बायबल वाचन: लेवीय १७-२० गीत १ (१३)
भाषणाचा गुण: आदराने अभिवादन करणे (be पृ. १९१ परि. १-पृ. १९२ परि. १)
क्र. १: पत्रांद्वारे संदेश पाठवणे (be पृष्ठे ७१-३)
क्र. २: लेवीय १७:१-१६
क्र. ३: यहोवाच्या संघटनेवर भरवसा ठेवा
क्र. ४: येशूच्या बलिदानाचा फायदा पहिल्यांदा कोणाला होतो आणि कोणत्या उद्देशास्तव? (rs पृ. ३०८ परि. २-३)
जुलै १२ बायबल वाचन: लेवीय २१-२४ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: आदराने संदेश सांगणे (be पृ. १९२ परि. २-पृ. १९३ परि. २)
क्र. १: प्रगतीशील असा—पुढे जात राहा (be पृ. ७४ परि. १-पृ. ७५ परि. ३)
क्र. २: लेवीय २२:१-१६
क्र. ३: आपल्या दिवसांत, येशूच्या बलिदानाचा फायदा आणखी कोणाला मिळत आहे? (rs पृ. ३०९ परि. १-३)
क्र. ४: यहोवा हा यहुदी कुळाचा देव होता का?
जुलै १९ बायबल वाचन: लेवीय २५-२७ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: पूर्ण खात्रीनिशी बोला (be पृ. १९४ परि. १-पृ. १९५ परि. २)
क्र. १: तुमच्या देणगीचा उपयोग करा (be पृ. ७५ परि. ४-पृ. ७७ परि. २)
क्र. २: लेवीय २५:१-१९
क्र. ३: दहशतवादाचा अंत कसा होईल
क्र. ४: खंडणीमुळे भवितव्यात कोणते आशीर्वाद मिळतील? (rs पृ. ३१० परि. १-४)
जुलै २६ बायबल वाचन: गणना १-३ गीत २२ (१३०)
भाषणाचा गुण: खात्री कशी दिसून येईल (be पृ. १९५ परि. ३-पृ. १९६ परि. ४)
क्र. १: ख्रिश्चनांनी ईर्षावान असावे का? (w-MR०२ १०/१५ पृष्ठे २८-३१)
क्र. २: w-MR०२ ६/१५ पृष्ठे १८-१९ परि. ६-९
क्र. ३: येशूच्या बलिदानाचा फायदा प्राप्त करण्याकरता आपल्याकडून काय अपेक्षिले जाते? (rs पृ. ३१० परि. ५-पृ. ३११ परि. ३)
क्र. ४: आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा शोक करणे चुकीचे आहे का?
ऑग. २ बायबल वाचन: गणना ४-६ गीत १३ (१२४)
भाषणाचा गुण: व्यवहारचातुर्याचा उपयोग करा परंतु दृढ राहा (be पृ. १९७ परि. १-३)
क्र. १: यहोवाच्या नजरेत प्रत्येक दिवसाचे सार्थक कसे करावे? (w-MR०२ ११/१५ पृष्ठे २०-३)
क्र. २: गणना ६:१-१७
क्र. ३: एकमेकांचा द्वेष करण्याचे थांबवण्यास बायबल लोकांना मदत कशी करू शकते?
क्र. ४: आपण आपल्या जीवनाचा उपयोग कसा करतो त्यावर खंडणीचा परिणाम कसा झाला पाहिजे? (rs पृ. ३११ परि. ४-६)
ऑग. ९ बायबल वाचन: गणना ७-९ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: साक्ष देताना व्यवहारचातुर्याचा उपयोग करा (be पृ. १९७ परि. ४-पृ. १९८ परि. ५)
क्र. १: वर्गभेद नसलेला समाज वास्तवात उतरणे शक्य? (w-MR०२ १/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: गणना ८:१-१९
क्र. ३: प्रभूला सामोरे जाण्यासाठी ख्रिश्चनांना ‘अंतराळात घेतले जाईल’ असे जेव्हा प्रेषित पौलाने म्हटले तेव्हा कोणत्या विषयावर चर्चा चालली होती? (rs पृ. ३१२ परि. १-२)
क्र. ४: ख्रिस्तविरोधक कोण आहे?
ऑग. १६ बायबल वाचन: गणना १०-१३ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: उचित समयी उचित शब्द (be पृ. १९९ परि. १-४)
क्र. १: खरा देव यहोवा यावर भरवसा ठेवा (w-MR०२ १/१५ पृष्ठे ५-७)
क्र. २: गणना १२:१-१६
क्र. ३: देव घेणार असलेला सूड त्याच्या प्रेम या गुणाच्या सुसंगत आहे का?
क्र. ४: ख्रिस्त मेघावर आरूढ होऊन जग पाहत असताना ख्रिश्चनांना स्वर्गात घेईल का? (rs पृ. ३१३ परि. १-३)
ऑग. २३ बायबल वाचन: गणना १४-१६ गीत १२ (११३)
भाषणाचा गुण: कुटुंबासोबत आणि इतरांसोबत व्यवहारचातुर्याचा उपयोग करणे (be पृ. २०० परि. १-४)
क्र. १: भिन्न मनोवृत्ती जोपासणारे भाऊ (w-MR०२ १/१५ पृष्ठे २१-३)
क्र. २: w-MR०२ ७/१५ पृष्ठे २३-४ परि. १५-१९
क्र. ३: ख्रिश्चनांना त्यांच्या हाडामांसाच्या शरीरासहित स्वर्गात घेतले जाणे शक्य आहे का? (rs पृ. ३१४ परि. १-२)
क्र. ४: h हिंसक व्हिडिओ गेम ख्रिश्चनांनी का खेळू नयेत?
ऑग. ३० बायबल वाचन: गणना १७-२१ गीत २० (९३)
भाषणाचा गुण: उभारणीकारक आणि सकारात्मक (be पृ. २०२ परि. १-पृ. २०३ परि. २)
तोंडी उजळणी
सप्टें. ६ बायबल वाचन: गणना २२-२५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: आवाजातील स्वर सकारात्मक असावा (be पृ. २०३ परि. ३-पृ. २०४ परि. १)
क्र. १: त्या प्राचीन जगाचा नाश का झाला? (w-MR०२ ३/१ पृष्ठे ५-७)
क्र. २: गणना २२:१-१९
क्र. ३: विश्वासू ख्रिश्चनांना, त्यांचा मृत्यू होण्याआधीच गुप्तपणे स्वर्गात घेतले जाईल का? (rs पृ. ३१४ परि. ३-पृ. ३१५ परि. २)
क्र. ४: i ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना वाचून का दाखवावे
सप्टें. १३ बायबल वाचन: गणना २६-२९ गीत ४ (४३)
भाषणाचा गुण: बंधूभगिनींबरोबर बोलताना (be पृ. २०४ परि. २-पृ. २०५ परि. ४)
क्र. १: विकलांगतेचा अंत कसा होणार (w-MR०२ ५/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: गणना २९:१-१९
क्र. ३: मोठ्या संकटात खऱ्या ख्रिश्चनांना संरक्षण कसे दिले जाईल? (rs पृ. ३१५ परि. ३-पृ. ३१६ परि. ३)
क्र. ४: येशू ख्रिस्तामुळे देवाची अभिवचने होय अशी कशी झाली?
सप्टें. २० बायबल वाचन: गणना ३०-३२ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: जोर देण्याकरता पुनरुक्ती (be पृ. २०६ परि. १-४)
क्र. १: धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी (w-MR०२ ७/१५ पृष्ठे २८-३१)
क्र. २: गणना ३०:१-१६
क्र. ३: काही ख्रिश्चनांना ख्रिस्ताबरोबर स्वर्गात असण्यासाठी का घेतले जाते? (rs पृ. ३१६ परि. ५-८)
क्र. ४: j अश्लील साहित्यापासून आपण दूर का पळाले पाहिजे
सप्टें. २७ बायबल वाचन: गणना ३३-३६ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत आणि भाषण देताना जोर देण्याकरता पुनरुक्ती करणे (be पृ. २०७ परि. १-पृ. २०८ परि. ४)
क्र. १: खरे संत तुमची मदत कशी करू शकतात? (w-MR०२ ९/१५ पृष्ठे ४-७)
क्र. २: w-MR०२ ८/१ पृष्ठे १८-१९ परि. १५-१९
क्र. ३: k‘स्वर्गात घेतले जाण्यावर तुम्ही विश्वास करता का?’ (rs पृ. ३१६ परि. ९-पृ. ३१७ परि. २)
क्र. ४: साहसी खेळ का टाळावेत?
ऑक्टो. ४ बायबल वाचन: अनुवाद १-३ गीत २१ (१९१)
भाषणाचा गुण: भाषणाचा विषय विकसित करणे (be पृ. २०९ परि. १-३)
क्र. १: देवाच्या अचूक ज्ञानातून मिळणारे सांत्वन (w-MR०२ १०/१ पृष्ठे ५-७)
क्र. २: अनुवाद १:१-१८
क्र. ३: सत्य आपलेसे करण्याचा काय अर्थ होतो?
क्र. ४: पूर्णपणे नवीन ओळखीच्या कोणाला पाहिल्यावर आणि नवीन ठिकाणी गेल्यावर, पूर्वी आपण हे पाहिले होते अशी भावना मनात येते तेव्हा यावरून पुनर्जन्म एक वास्तविकता असल्याचे सिद्ध होते का? (rs पृ. ३१७ परि. ३-पृ. ३१९ परि. १)
ऑक्टो. ११ बायबल वाचन: अनुवाद ४-६ गीत १७ (१८७)
भाषणाचा गुण: उचित शीर्षक निवडणे (be पृ. २१० परि. १-पृ. २११ परि. १; पृ. २११, पेटी)
क्र. १: सा.यु.पू. ५३७ पासून सा.यु.पू. ९९७ पर्यंतची गणना करणे (si पृ. २८५ परि. ५-७)
क्र. २: अनुवाद ४:१-१४
क्र. ३: योहान ९:१, २ मधील अहवाल पुनर्जन्म का सिद्ध करत नाही? (rs पृ. ३१९ परि. २-पृ. ३२० परि. २)
क्र. ४: “आत्म्याचे चिंतन” करण्यात काय गोवलेले आहे?
ऑक्टो. १८ बायबल वाचन: अनुवाद ७-१० गीत २८ (२२४)
भाषणाचा गुण: मुख्य मुद्दे ठळकपणे मांडणे (be पृ. २१२ परि. १-पृ. २१३ परि. १)
क्र. १: सा.यु.पू. ९९७ पासून सा.यु.पू. २३७० पर्यंत गणना करणे (si पृष्ठे २८५-६ परि. ८-११)
क्र. २: w-MR०२ ८/१५ पृष्ठे १५-१६ परि. ३-६
क्र. ३: पुनर्जन्माची शिकवण आणि बायबलमधील अभिवचन यांत किती फरक आहे? (rs पृ. ३२० परि. ३-४)
क्र. ४: l धर्मत्यागी लोकांबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे
ऑक्टो. २५ बायबल वाचन: अनुवाद ११-१३ गीत ९ (३७)
भाषणाचा गुण: पुष्कळ मुख्य मुद्द्यांचा उपयोग करू नका (be पृ. २१३ परि. २-पृ. २१४ परि. ५)
तोंडी उजळणी
नोव्हें. १ बायबल वाचन: अनुवाद १४-१८ गीत ७ (५१)
भाषणाचा गुण: आस्था वाढवणाऱ्या प्रस्तावना (be पृ. २१५ परि. १-पृ. २१६ परि. ५)
क्र. १: सा.यु.पू. २३७० पासून सा.यु.पू. ४०२६ पर्यंत गणना करणे (si पृष्ठे २८६-७ परि. १२-१५)
क्र. २: अनुवाद १४:१-२३
क्र. ३: a‘माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे,’ असे कोणी म्हणतो तेव्हा (rs पृ. ३२१ परि. १-३)
क्र. ४: ख्रिश्चनांनी आपले जीवन साधे का ठेवावे
नोव्हें. ८ बायबल वाचन: अनुवाद १९-२२ गीत २४ (१८५)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत लोकांचे लक्ष वेधणे (be पृ. २१७ परि. १-४)
क्र. १: येशूचे पृथ्वीवरील वास्तव्य (si पृ. २९१ परि. १६-१७)
क्र. २: अनुवाद २१:१-१७
क्र. ३: इतके धर्म का? (rs पृ. ३२२ परि. १-पृ. ३२३ परि. २)
क्र. ४: बायबलमधील उदाहरणे आपल्याला निरुत्साहाचा सामना करण्यास मदत कसे करू शकतात?
नोव्हें. १५ बायबल वाचन: अनुवाद २३-२७ गीत १८ (१६२)
भाषणाचा गुण: आपला विषय स्पष्टपणे सांगणे (be पृ. २१७ परि. ५-पृ. २१९ परि. ३)
क्र. १: येशूच्या सेवेदरम्यान खास घटना केव्हा घडल्या (si पृ. २९१ परि. १८-१९)
क्र. २: अनुवाद २४:१-१६
क्र. ३: देवाचा पाठिंबा असलेल्यांना कसे ओळखायचे
क्र. ४: सर्व धर्मात चांगलेच आहे हे खरे आहे का? (rs पृ. ३२३ परि. ३-५)
नोव्हें. २२ बायबल वाचन: अनुवाद २८-३१ गीत ३ (३२)
भाषणाचा गुण: प्रभावशाली समाप्ती (be पृ. २२० परि. १-३)
क्र. १: प्रेषितांच्या काळांतील वर्षांची मोजणी (si पृष्ठे २९१-२ परि. २०-३)
क्र. २: अनुवाद २९:१-१८
क्र. ३: आईवडील मानत असलेला धर्म सोडणे बरोबर आहे का? (rs पृ. ३२४ परि. १-३)
क्र. ४: ख्रिश्चनांनी विनयशील का असावे
नोव्हें. २९ बायबल वाचन: अनुवाद ३२-३४ गीत ६ (४५)
भाषणाचा गुण: लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी (be पृ. २२० परि. ४-पृ. २२१ परि. ४)
क्र. १: पौलाचा दुसरा मिशनरी दौरा (si पृष्ठे २९२-३ परि. २४-५)
क्र. २: w-MR०२ १०/१५ पृ. ११ परि. १०-१३
क्र. ३: देवाचे नाव पवित्र करण्याचे मार्ग
क्र. ४: संमिश्र विश्वासाविषयी बायबलचा काय दृष्टिकोन आहे? (rs पृ. ३२५ परि. १-पृ. ३२६ परि. १)
डिसें. ६ बायबल वाचन: यहोशवा १-५ गीत ५ (४६)
भाषणाचा गुण: क्षेत्र सेवेत (be पृ. २२१ परि. ५-पृ. २२२ परि. ६)
क्र. १: पौलाचा तिसरा मिशनरी दौरा आणि समाप्तीची वर्षे, ५६-१०० सा.यु. (si पृ. २९३ परि. २६-३०)
क्र. २: यहोशवा ४:१-१४
क्र. ३: संघटित धर्माचे असणे आवश्यक आहे का? (rs पृ. ३२६ परि. २-पृ. ३२७ परि. २)
क्र. ४: नाताळ हा ख्रिश्चनांचा सण आहे का?
डिसें. १३ बायबल वाचन: यहोशवा ६-८ गीत २३ (२००)
भाषणाचा गुण: अचूक माहिती देणे (be पृ. २२३ परि. १-५)
क्र. १: चूक कबूल करणे—शांतीपूर्ण संबंधांचे रहस्य (w-MR०२ ११/१ पृष्ठे ४-७)
क्र. २: यहोशवा ६:१०-२३
क्र. ३: आपण घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे का थांबवू नये?
क्र. ४: आपल्या बांधवावर प्रेम करणे महत्त्वाचे आहे का? (rs पृ. ३२७ परि. ४)
डिसें. २० बायबल वाचन: यहोशवा ९-११ गीत ११ (८५)
भाषणाचा गुण: ‘विश्वसनीय वचनाला धरून राहणे’ (be पृ. २२४ परि. १-४)
क्र. १: आपले हात बळकट करा (w-MR०२ १२/१ पृष्ठे ३०-१)
क्र. २: w-MR०२ ११/१५ पृष्ठे १८-१९ परि. १९-२३
क्र. ३: देवाबरोबर व्यक्तिगत नातेसंबंध जोडणे खरोखरच महत्त्वपूर्ण आहे का? (rs पृ. ३२७ परि. ५-पृ. ३२८ परि. १)
क्र. ४: b शांतीप्रिय असण्याचा काय अर्थ होतो
डिसें. २७ बायबल वाचन: यहोशवा १२-१५ गीत १६ (१४३)
भाषणाचा गुण: माहितीची अचूकता पारखणे (be पृ. २२५ परि. १-३)
तोंडी उजळणी
[तळटीपा]
a हा भाग केवळ बांधवांना देणे.
b हा भाग केवळ बांधवांना देणे.
c हा भाग केवळ बांधवांना देणे.
d हा भाग केवळ बांधवांना देणे.
e हा भाग केवळ बांधवांना देणे.
f हा भाग केवळ बांधवांना देणे.
g हा भाग केवळ बांधवांना देणे.
h हा भाग केवळ बांधवांना देणे.
i हा भाग केवळ बांधवांना देणे.
j हा भाग केवळ बांधवांना देणे.
k वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारक उत्तर कशाप्रकारे देता येईल हे दाखवा.
l वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारक उत्तर कशाप्रकारे देता येईल हे दाखवा.
a वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारक उत्तर कशाप्रकारे देता येईल हे दाखवा.
b वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, स्थानीय क्षेत्रातील लोक करत असलेले दावे, आक्षेप वगैरे, यांना समाधानकारक उत्तर कशाप्रकारे देता येईल हे दाखवा.