सेवा सभा आराखडा
ऑक्टोबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि ऑक्टोबर १५ चे टेहळणी बुरूज अंक कशाप्रकारे सादर केले जाऊ शकतात त्याची दोन वास्तविक वाटणारी प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका प्रात्यक्षिकात, मॅग्झीन रूट सुरू केलेल्या घरमालकाला पुनःभेट देत असल्याचे दाखवा. “आमच्या पुढील अंकात” या पेटीकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करून पुढील भेटीची योजना करा.—आमची राज्य सेवा, ऑक्टोबर १९९८, पृष्ठ ८, परि. ७-८ पाहा.
२० मि: “हर्षाने परमेश्वराची सेवा करा.”a (या भागाची चर्चा करताना सर्वांजवळ, आमची राज्य सेवा याच्या जानेवारी २००२ आणि सप्टेंबर २००३ अंकातील पुरवण्या असाव्यात.) परिच्छेद ४ वर चर्चा केल्यानंतर, नोव्हेंबर महिन्यात आपण अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक सादर करणार आहोत हे सांगा. आमची राज्य सेवा (जानेवारी २००२; सप्टेंबर २००३) पुरवणीतील सुचवलेल्या एका सादरतेची संक्षिप्त उजळणी करा. नंतर या सादरतेवर आधारित केल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकाचा सराव करत असल्याचे दाखवा. सेवेची चांगली तयारी करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: बायबल अभ्यास चालवल्याने आशीर्वाद मिळतात. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. प्रगतीशील बायबल अभ्यासांविषयी आपल्या प्रकाशनांतून काही अनुभव सांगा. (w00-MR ३/१ पृ. ६; yb९८ पृ. ५५-६०) अनुभवांवरून आपण काय शिकलो आणि बायबल अभ्यास चालवल्यामुळे आपल्याला लाभ कसे मिळू शकतात यावर विवेचन मांडण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
५ मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: “सढळ हाताने परंतु विचारपूर्वक पेरणी करा.”b तुमच्या क्षेत्रात खासकरून उचित ठरणाऱ्या अभिव्यक्तींवर जोर द्या. या सप्ताहांती, क्षेत्र सेवेसाठी असलेल्या सभेत या सूचनांची उजळणी करावी.
२५ मि: साथीदारांच्या दबावाचा धैर्याने सामना करणे. ख्रिस्ती कुटुंबात संगोपन झालेल्या एखाद्या वडिलांची अथवा सेवा सेवकाची मुलाखत घ्या. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, २००३ मधील निवडक मुद्द्यांचा उल्लेख करा. बांधवाने शाळेत असताना कोणकोणत्या दबावांचा सामना केला? (पृ. २४ परि. ३; पृ. २५ परि. ४-५) इतरांकडून त्यांना कोणत्या हानीकारक प्रभावाचा सामना करावा लागला? (पृ. २६ परि. ४-६) प्रौढ या नात्याने त्यांना अजूनही त्यांच्या साथीदारांकडून दबावाचा सामना करावा लागतो का? या दबावांचा प्रतिकार करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत मिळाली आहे? टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९९९, पृष्ठे २४-५ वर आधारित संक्षिप्त समारोपात, हितकारक मित्र मिळवण्याच्या फायद्यांवर भर द्या.
गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑक्टोबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. प्रचारकांना त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. पुढील आठवड्याच्या सेवा सभेची तयारी करताना, गेल्या सेवा वर्षातील खास दिवसीय संमेलन कार्यक्रमाच्या टिपणींची उजळणी करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि नोव्हेंबर १ चे टेहळणी बुरूज अंक कसे सादर करावेत त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका प्रात्यक्षिकात, “मला आस्था नाही,” असे म्हणणाऱ्या व्यक्तीशी कसे बोलायचे त्याची एक सादरता दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेची पृष्ठे ८-९ पाहा.
२० मि: आत्म्याच्या तलवारीचा उपयोग करा. (इफिस. ६:१७) सेवा प्रशाला पुस्तकाच्या १४३-४ पृष्ठांवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. श्रोत्यांना या प्रश्नांची उत्तरे देण्यास आमंत्रित करा: (१) प्रश्नांची उत्तरे देताना आपण बायबलचा उपयोग का करतो? (२) यहोवाचे साक्षीदार या नावावरून आपल्याबद्दल काय सूचित होते? (३) येशूने कोणते उदाहरण मांडले आणि आपण त्याचे अनुकरण कसे करू शकतो? (४) स्थानीय क्षेत्रात, बायबलमधले विचार सांगण्याचे काही प्रभावी मार्ग कोणते आहेत? (५) जेव्हा शक्य असते तेव्हा थेट बायबलमधून वचन वाचून दाखवणे योग्य का आहे? (६) वडील जन इतरांना बायबलचा चांगल्याप्रकारे उपयोग करण्याचे उत्तेजन कसे देऊ शकतात? पृष्ठ १४४ वरील पाठाच्या आधारावर, योग्यता प्राप्त प्रचारक एका प्रश्नाचे उत्तर देताना निदान एका तरी वचनाचा उपयोग करत असल्याचे चांगली तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक वेळेला साक्ष देताना बायबलचा उपयोग करण्याचे ध्येय ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१३ मि: स्थानीय अनुभव. प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहताना किंवा कामाच्या ठिकाणी, शाळेत अथवा इतरत्र साक्ष देताना आलेले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २६ (२१२)
५ मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२५ मि: सत्कर्माविषयी धनवान असा. (१ तीम. ६:१८) येथे दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करून, एक वडील गेल्या सेवा वर्षात झालेल्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाची श्रोत्यांबरोबर चर्चा करतील. मंडळीतल्या प्रचारकांना हे सांगण्यास आमंत्रित करा, की त्यांनी शिकलेल्या गोष्टी आपल्या जीवनात कशाप्रकारे लागू केल्या. (उत्तरे देण्यासाठी बंधूभगिनींना आधीच नेमण्यात येऊ शकते.) कार्यक्रमाच्या पुढील भागांवर भर द्या: (१) “सत्कर्मांमुळे मोठा लाभ होतो.” (उप. २:११) या जगाच्या निरर्थक कार्यांऐवजी देवाचे सेवक देवाच्या वचनात सांगितलेल्या सत्कर्मांच्या पाठीस का लागतात? (२) “देवाच्या दृष्टीत धनवान व्हा.” (मत्त. ६:२०) काहींनी ‘स्वर्गात संपत्ती कशाप्रकारे साठवली’ आहे आणि याचा त्यांना काय लाभ झाला आहे? (३) “बायबल अभ्यासाद्वारे आपल्या सेवेची गुणवत्ता वाढवा.” (om-MR पृ. ९१) बायबल अभ्यास सुरू करून तो संचालित करण्यास कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळू शकते? (४) “कापणीच्या हंगामात सत्कर्मे.” (मत्त. १३:३७-३९) आरंभीच्या ख्रिश्चनांनी सत्कर्मांच्या बाबतीत कोणते उत्तम उदाहरण मांडले आणि आपल्या दिवसांत राज्याचे कार्य कसे वाढले आहे? (५) “तुमच्या सत्कर्मांमुळे यहोवाचे गौरव होवो.” (मत्त. ५:१४-१६) काहींनी आपला ‘प्रकाश लोकांसमोर कसा पाडला आहे’? (६) “सत्कर्मांद्वारे यहोवाचे स्तवन करणाऱ्या युवकांची प्रशंसा करणे.” (स्तो. १४८:१२, १३) आपल्या विभागातील ख्रिस्ती युवक यहोवाचे स्तवन कसे करत आहेत? (७) “सत्कर्मे करीत राहा आणि यहोवाचे आशीर्वाद मिळवा.” (नीति. १०:२२) सत्कर्मे करण्यात आपण व्यस्त असताना, व्यक्ती या नात्याने, कुटुंब या नात्याने, मंडळी या नात्याने आणि जगव्याप्त संघटना या नात्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.