ज्ञान पुस्तकाच्या अभ्यासाकडे नेणाऱ्या बायबल चर्चांसाठी काही सूचना
१. युद्ध आणि जगाची तणावपूर्ण परिस्थिती:
“[अलीकडील बातमीविषयी सांगा.] कितीही सद्हेतू बाळगून ध्येये ठेवण्यात आलेली असली तरी, युद्धाविषयीच्या बातम्या आपल्याला असा विचार करायला लावतातच, की हे जग शांतीकडे वाटचाल करीत आहे की परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. यात काही शंका नाही, की सर्वांनाच युद्ध नसलेल्या जगाची ओढ आहे. असे जग आणणे मानवांना शक्य आहे असे तुम्हाला वाटते का?” घरमालकाची प्रतिक्रिया लक्षपूर्वक ऐका. मग, स्तोत्र ४६:८, ९ किंवा मीखा ४:२-४ वाचा आणि असे म्हणा की देवाने मनुष्याच्या कारभारात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. ज्ञान पुस्तक उघडा आणि पृष्ठ ९८ वरील परिच्छेद १ आणि २ तसेच पृष्ठ ९९ वरील ५ व्या परिच्छेदाची चर्चा करा.
२. गुन्हेगारी आणि दुःखद अपघात:
“तुम्ही ____________________ विषयी ऐकले असेल [एखाद्या विशिष्ट घटनेचा उल्लेख करा]. दुःखद घटना होती, नाही का? आपल्या सभोवताल होणाऱ्या किंवा आपण स्वतः अनुभवत असलेल्या दुःखद घटनांची देवाला खरोखरच काळजी आहे की नाही, याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका.] याबाबतीत देवाचा काय दृष्टिकोन आहे ते बायबलमध्ये सांगितलेले आहे.” स्तोत्र ७२:१२-१७ मधील काही उचित शब्दांविषयी तुम्ही सांगू शकता. मग, ज्ञान पुस्तकाचे पृष्ठ ७० उघडा आणि देव दुःखाला अनुमती का देतो त्याचे काय उत्तर आहे ते दाखवा. पुढे तुम्ही म्हणू शकता: “बायबलमधले उत्तर खरोखरच सांत्वनदायक आहे. मी तुम्हाला हे पुस्तक देऊ इच्छितो आणि त्यात तुम्ही हे उत्तर स्वतः शोधून काढावे असे मी तुम्हाला उत्तेजन देतो.”
३. मृतांची स्थिती:
“दररोज हजारो लोक आजारपणामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. तुमच्या घरातील सदस्याचा किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे तुम्हालाही कदाचित हे दुःख सहन करावे लागले असेल. याला अनेक वर्षं झालेली असली तरी, आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याचे दुःख जाणवते.” (१) घरमालक स्वतःच्या अनुभवाविषयी सांगत असेल तर: लक्ष देऊन ऐका. मग तुम्ही म्हणू शकता: “मला या शब्दांमुळे दिलासा मिळतो.” लूक २०:३८ किंवा १ थेस्सलनीकाकर ४:१३ दाखवा आणि विचारा, “माणूस वृद्ध होऊन का मरतो त्याचे कारण तुम्हाला शोधून काढायला आवडेल का?” ज्ञान पुस्तकाचे पृष्ठ ५३ काढून घरमालकाला परिच्छेद १-३ दाखवा. (२) घरमालक आपला अनुभव सांगत नसेल तर: तुम्ही म्हणू शकता, “काही म्हणतात, की मृत जन परादीस अथवा स्वर्गात जातात, तर इतर म्हणतात की ते पुन्हा मातीत जातात. यावर तुमचा काय विचार आहे?” मग उपदेशक ९:५, १० वाचा आणि ज्ञान पुस्तक उघडून पृष्ठ ८३ वरील परिच्छेद ९, १० वाचा.
४. सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व:
“आज पुष्कळ लोकांना नैराश्याने ग्रासले आहे. नकारात्मक विचार करण्याकडे त्यांचा कल असू शकतो. कोणत्या गोष्टीमुळे त्यांना मदत मिळेल असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका.] मला बायबलमधले हे वचन साहाय्यक वाटले.” मत्तय ६:३४ वाचल्यानंतर ज्ञान पुस्तकाच्या पृष्ठ १६ वरील परिच्छेद १३ मधील एका शिक्षणतज्ज्ञाने काढलेले उद्गार वाचून दाखवा. डोंगरावरील प्रवचनाच्या काही शिकवणुकींची देखील तुम्ही चर्चा करू शकता.
५. कुटुंबामध्ये उत्तम संवाद:
“कामाच्या ठिकाणी आणि शाळेत तणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे कौटुंबिक सदस्यांना उत्तेजनाची आवश्यकता असू शकते. परंतु कधीकधी, आपण स्वतःच तणावग्रस्त झाल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना उत्तेजन देण्याकरता आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. आपण आपल्या कौटुंबिक सदस्यांना काय म्हणतो हे महत्त्वाचे असले तरीसुद्धा, बायबल एका महत्त्वपूर्ण मुद्द्याविषयी सांगते जो आपण लक्षात ठेवला पाहिजे. [नीतिसूत्रे १६:२३, २४ वाचा.] या वचनात म्हटले आहे, की आपले तोंड नव्हे तर आपले हृदय यशस्वी संवादाची किल्ली आहे.” ज्ञान पुस्तक पृष्ठ १४३ वर उघडून परिच्छेद ९ काढा आणि एकमेकांची काळजी घेण्याच्या महत्त्वावर जोर द्या. उत्तम संवाद राखणे कठीण का असू शकते याची परिच्छेद ७ नुसार चर्चा करू शकता.
६. आपल्या मुलांशी समंजसपणे वागणे:
“अलीकडेच, आपल्या लक्षात आणून देण्यात आले आहे, की मुलांना अनेक तणावांचा सामना करावा लागतो. पुष्कळ मुलांचे संगोपन चांगल्या वातावरणात होते, तरीपण या समस्येचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका.] या शब्दांविषयी तुम्हाला काय वाटते? [कलस्सैकर ३:२१ वाचा आणि उत्तर ऐका.] हे करायला अतिशय सोपे आहे असे वाटेल, परंतु, घरात अमुक नियमांची आवश्यकता आहेच, हे पाहण्यास मुलांना मदत करणे कठीण आहे, याजशी तुम्ही सहमत व्हाल.” ज्ञान पुस्तकाचे पृष्ठ १३६ उघडा आणि परिच्छेद १७ चे पहिले वाक्य वाचा. परिच्छेद १७, १८ मधील मुद्द्यांची चर्चा करा.