सेवा सभा आराखडा
एप्रिल १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
१५ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि एप्रिल १५ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा.
१० मि: प्रश्न पेटी. वडिलांचे भाषण.
२० मि: “ज्योतिसारखे चमकणे.”a टेहळणी बुरूज जून १, १९९७, पृष्ठे १४-१५, परिच्छेद ८-१३ वर आधारित पाच मिनिटाच्या भाषणानंतर समारोप करा. आपण राज्य संदेश गुप्त ठेवण्याचे का टाळतो यावर जोर द्या.
गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २ (१५)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: “आपले घर उपलब्ध करून द्यायला तुम्ही तयार आहात का?” पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांचे भाषण. मे २००१ आणि मार्च १९९० आमची राज्य सेवा अंकातील प्रश्न पेटींवर टिपणी करा. मंडळीत पुस्तक अभ्यास गटांची संख्या आणि त्यातील सरासरी उपस्थितीविषयी सांगा. पुस्तक अभ्यास ज्यांच्या घरात होत आहे अशा एक किंवा दोन प्रचारकांना विचारा की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना यामुळे कसा लाभ झाला. आपल्या घरात पुस्तक अभ्यास व्हावा असे कोणाला वाटत असल्यास त्यांनी अध्यक्षीय पर्यवेक्षकांना सांगावे.
२० मि: “हे स्वीकारावे.”b राज्य आस्थेला बढावा देण्यासाठी जे आपल्या अविवाहितपणाचा चांगला उपयोग करीत आहेत अशा एक-दोघांची मुलाखत घ्या. सेवेत कोणत्या गोष्टीमुळे त्यांना संतुष्टी मिळते याविषयी त्यांना विचारा.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१० मि: स्थानीय घोषणा. सर्वांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचा सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि मे १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: देवाची उपासना (इंग्रजी) या पुस्तकाची उजळणी करा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. हे नवीन पुस्तक अभ्यासाचे दुसरे पुस्तक म्हणून वापरण्याच्या योजनेविषयी स्पष्ट करा. (km-MR ६/०० पृ. ४ परि. ५-६) या प्रकाशनातील आवडलेल्या पैलूंवर टिपणी करण्याचे श्रोत्यांना आमंत्रण द्या. या पुस्तकातील काही भागावर प्रश्न आणि शास्त्रवचने देण्यात आली आहेत जी विद्यार्थ्याला देवाच्या वचनावर गहन विचार करायला प्रवृत्त करतात, यावर जोर द्या. पृष्ठे ४७-९, परिच्छेद १३ वर दिलेले उदाहरण सांगा.
२० मि: “पुनर्भेटींमुळे बायबल अभ्यास मिळतात.”c हा भाग वडिलांनी हाताळावा, देण्यात आलेल्या प्रश्नांचा वापर करावा. हा मुद्दा ठळक करणारे क्षेत्रसेवेतील अनुभव थोडक्यात सांगण्याचे श्रोत्यांना आमंत्रण द्या. परिच्छेद ५ वर चर्चा करताना, स्थानिक क्षेत्रात बायबल अभ्यास सुरू करण्यात आलेला एखादा अनुभव प्रदर्शित करून दाखवा.
गीत १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २५ (२०४)
१० मि: स्थानीय घोषणा. “राज्य सभागृहातील ग्रंथालयासाठी नवीन योजना” यावर संक्षिप्त चर्चा. राज्य सभागृहाचा ग्रंथपाल म्हणून कोण काम पाहील हे सांगा.
२० मि: “२००३ ‘देवाचे गौरव करा’ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”d मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा; परिच्छेद ४-१२ यांवर अधिक भर द्यावा. ९-१० परिच्छेदांची चर्चा करत असताना, मंडळीचा अधिवेशन संचालक म्हणून सचिवांच्या भूमिकेवर जोर द्या. अधिवेशनासाठी लवकरात लवकर योजना केल्याबद्दल सर्वांची प्रेमळपणे प्रशंसा करा.
१५ मि: चांगले वर्तमान—आनंद करण्यास कारण. (नीति. १५:३०) मार्च आणि एप्रिल महिन्यात केलेल्या खास प्रयत्नामुळे मंडळीला काय साध्य करता आले यावर श्रोत्यांबरोबर चर्चा. मंडळीला पुढील क्षेत्रात मिळालेले सकारात्मक अनुभव सांगण्याचे उत्तेजन द्या: (१) एका आस्थेवाईक व्यक्तीला स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी केलेली मदत, (२) सहायक पायनियर म्हणून केलेली सेवा, (३) अक्रियाशील असलेल्या प्रचारकाला मंडळीबरोबर पुन्हा एकदा सक्रिय बनण्यास दिलेले उत्तेजन, (४) नवोदित व्यक्तीला प्रचार कार्य सुरू करण्यास दिलेली मदत, आणि (५) स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांची वाढवलेली आस्था. यांपैकी काही टिपणींची व्यवस्था आधीच करा. सर्वांची प्रशंसा करा आणि असेच प्रयत्न भवितव्यातही करीत राहण्यास उत्तेजन द्या.
गीत ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.