वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०३ पृ. ३-४
  • प्रचार करा व चांगल्याप्रकारे साक्ष द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचार करा व चांगल्याप्रकारे साक्ष द्या
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
    आमची राज्य सेवा—१९९८
  • सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा
    आमची राज्य सेवा—२००७
  • तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल का?
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km २/०३ पृ. ३-४

प्रचार करा व चांगल्याप्रकारे साक्ष द्या

१ “नेता व शास्ता” या नात्याने येशूने आपल्या शिष्यांना, भवितव्यात होणाऱ्‍या प्रचंड प्रचार कार्यासाठी प्रशिक्षित केले. (यश. ५५:४; लूक १०:१-१२; प्रे. कृत्ये १:८) येशूने दिलेल्या कामगिरीचे वर्णन प्रेषित पेत्राने पुढील शब्दांत केले: “त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा व अशी [“चांगल्याप्रकारे,” NW] साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.” (प्रे. कृत्ये १०:४२) आपण चांगल्याप्रकारे साक्ष कशी देऊ शकतो?

२ प्रेषित पौलाच्या उदाहरणावर विचार करून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. इफिसस मंडळीतील वडिलांना भेटल्यावर त्याने त्यांना अशाप्रकारे आठवण करून दिली: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस मी [“चांगल्याप्रकारे,” NW] साक्ष देत होतो.” पौलाला अनेक परीक्षांचा सामना करावा लागत होता तरी देखील त्याने होता होईल तितक्या लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न केला. सुवार्ता ऐकणाऱ्‍यांना त्याने केवळ मूलभूत सत्ये सांगितली नाहीत तर “देवाचा संपूर्ण मनोदय” त्यांना सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. असे करण्याकरता तो झटण्यास व त्याग करण्यास तयार होता. तो पुढे म्हणाला: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्‍यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने [अर्थात, “चांगल्याप्रकारे,” NW] सांगण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (तिरपे वळण आमचे.)—प्रे. कृत्ये २०:२०, २१, २४, २७.

३ आज आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? (१ करिंथ. ११:१) आपल्याला परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा देखील आपण योग्य जनांना शोधून काढण्याद्वारे, सर्व पार्श्‍वभूमीच्या व भाषेच्या लोकांना सुवार्ता सांगण्याद्वारे व आस्थेवाईक लोक आपल्याला भेटतात तेव्हा त्यांना मदत करण्याद्वारे पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. (मत्त. १०:१२, १३) यासाठी, वेळ, परिश्रम आणि लोकांबद्दल प्रेम यांची आवश्‍यकता आहे.

४ तुम्ही सहायक पायनियरींग करू शकता का? मार्च आणि एप्रिल महिन्यांत सहायक पायनियरींग करण्याद्वारे तुम्हाला चांगल्याप्रकारे साक्ष देण्याची संधी मिळू शकते. गेल्या वर्षी, सहायक पायनियरींग करण्यासाठी अनेकांनी केलेले खास प्रयत्न किती प्रोत्साहनदायक होते!

५ आरोग्याच्या अनेक समस्या असलेल्या एका ८० वर्षीय भगिनीला यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या उत्तेजनाने प्रेरणा मिळाली. तिने लिहिले: “पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात सुप्तावस्थेत असलेली इच्छा जागृत झाली आणि मला तीव्रपणे वाटू लागलं, की निदान एकदा तरी सहायक पायनियरींग केलीच पाहिजे.” तिने मार्चमध्ये सहायक पायनियरींग करायचे ध्येय ठेवले. तिने म्हटले: “सर्वात आधी मी, सर्व गोष्टींचा अंदाज काढला. मी माझ्या मुलीबरोबर याविषयी बोलले कारण मला तिची मदत लागणार होती. पण तिने स्वतःच जेव्हा सहायक पायनियरींगचा अर्ज भरला तेव्हा तर मला खूप आश्‍चर्य वाटलं.” त्या महिन्यात, या वृद्ध भगिनीने सेवेत ५२ तास खर्च केले. ती म्हणते: “आता मला होणार नाही, असं मला जेव्हा वाटायचं, तेव्हा मला शक्‍ती मिळावी म्हणून मी अनेकदा यहोवाला प्रार्थना करायचे. पण महिनाअखेरीस मला खूप आनंद व समाधान वाटले; आणि यहोवानं मला पुष्कळदा मदत केल्याबद्दल मी त्याचे आभार मानले आहेत. मी पुन्हा सहायक पायनियरींग करायचा प्रयत्न करणार आहे.” गंभीर आरोग्याच्या समस्या असतानाही सहायक पायनियरींग करण्याची मनापासून इच्छा असलेल्यांना या भगिनीचा हा आनंदी अनुभव ऐकून प्रोत्साहन मिळो!

६ एका बांधवाला त्याच्या नोकरीवरून अचानक ब्रेक देण्यात आला तेव्हा त्याने या संधीचा फायदा घेऊन सहायक पायनियरींग केली. महिन्यादरम्यान त्याचा प्रचार कार्याबद्दल खूप आवेश वाढला आणि महिन्याच्या शेवटी त्याने एक नवीन बायबल अभ्यास सुरू केला होता. “किती उत्तम हा महिना गेला!” अशा शब्दांत त्याने या अनुभवाबद्दलचे उद्‌गार काढले. यहोवाचे मार्गदर्शन व मदत मिळाल्यामुळे तो किती खूष होता! या बांधवाने सेवेमध्ये केलेल्या जादा प्रयत्नांमुळे यहोवाने त्याच्यावर आशीर्वादांचा जणू वर्षाव केला व आपल्यासाठी देखील तो असेच करेल.—मला ३:१०.

७ पुष्कळ लोकांना सहायक पायनियरींग करायला जमत नाही. तरीपण, प्रापंचिक व कौटुंबिक जबाबदाऱ्‍या सांभाळून तसेच व्यक्‍तिगत समस्यांना तोंड देऊन पुष्कळ बंधूभगिनींनी सहायक पायनियरींग केली आहे. चांगल्याप्रकारे साक्ष देण्यात, आपला बहुमोल वेळ आणि शक्‍ती यांचा त्याग करणे समाविष्ट आहे; परंतु यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांची मात्र आपल्याला कशाशीच तुलना करता करू शकणार नाही.—नीति. १०:२२.

८ मार्च आणि एप्रिल महिने सहायक पायनियरींग करण्याकरता अतिशय उत्तम महिने आहेत. मार्च महिन्यात पाच शनिवार-रविवार येतात. यांचा आणि संध्याकाळच्या वेळेचा फायदा घेतल्याने पूर्ण-वेळ नोकरी करणाऱ्‍या काहींना सहायक पायनियरींग करता येईल. शिवाय, एप्रिल महिन्यातील सुट्यांचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. काहींना शाळेची किंवा नोकरीची सुटी मिळाल्यास त्यांना ५० तास पूर्ण करता येऊ शकतील. मार्च आणि एप्रिल महिन्यात ५० तास पूर्ण करता यावेत म्हणून तुम्ही या लेखाबरोबर असलेल्या सहायक पायनियरींगच्या आराखड्याचा उपयोग करू शकता का? तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर व मंडळीतील इतरांबरोबर चर्चा करा, तुमच्याबरोबर सेवेत येण्यासाठी काहींना जरूर प्रोत्साहन मिळेल. तुम्हाला सहायक पायनियरींग करणे जमणार नसेल तर या महिन्यांदरम्यान तुम्ही विशिष्ट ध्येये ठेवू शकता आणि जे पायनियरींग करू शकतात त्यांच्यासोबत कार्य करू शकता. मार्च आणि एप्रिलमध्ये सेवेत अधिक सहभाग घेता यावा म्हणून आतापासूनच योजना करा.

९ स्मारकाबद्दल कदर दाखवा: दर वर्षी, स्मारकविधीच्या काळात, खंडणीबद्दल आपली कदर प्रदर्शित करण्याकरता हजारो बंधूभगिनी सहायक पायनियरींगसाठी ‘वेळ काढतात.’ (इफिस. ५:१५, १६, NW) गेल्या वर्षी, भारतात मार्च महिन्यात २,५०९ आणि एप्रिल महिन्यात १,३४९ सहायक पायनियर होते. याचा अर्थ या दोन्ही महिन्यातील प्रत्येक महिन्यात सरासरी १,९२९ पायनियर होते. यांची तुलना, सेवा वर्षाच्या पूर्वीच्या महिन्यांत सहायक पायनियरींग केलेल्या सरासरी ६५७ जणांबरोबर करा. क्षेत्र सेवेत आपला सहभाग वाढवण्याद्वारे आपल्याला, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाबद्दल आपली मनःपूर्वक कदर व्यक्‍त करण्याकरता स्मारकविधीचा काळ एक उत्तम संधी आहे.

१० एप्रिल १६ जसजसा जवळ येतो तसतसे स्मारकविधीचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो यावर मनन करा. ख्रिस्ताच्या मृत्यूपर्यंत घडलेल्या घटनांवर आणि त्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी वाटत होती त्यांचा विचार करा. येशूसमोर जो आनंद होता त्यामुळे त्याला गैरवागणूक सहन करायला कशी मदत मिळाली यावरही मनन करा. प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यावर देखरेख करत असताना मंडळीचा मस्तक या नात्याने त्याच्या सध्याच्या पदावर चिंतन करा. (१ करिंथ. ११:३; इब्री १२:२; प्रकटी. १४:१४-१६) आणि मग, तुमच्या परिस्थितीनुरूप प्रचार कार्यात पूर्ण सहभाग घेऊन ख्रिस्ताने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपली कदर व्यक्‍त करा.

११ चांगल्याप्रकारे साक्ष देण्यास इतरांनाही उत्तेजन द्या: सहायक पायनियरींगच्या सेवेत भाग घेऊन मंडळीतले वडील व सेवा सेवक, इतरांना उत्तेजन देऊ शकतात. क्षेत्र सेवेत प्रचारकांबरोबर काम करत असताना, मेंढपाळ भेटी देताना त्यांना व्यक्‍तिगतरीत्या, या खास कार्यात पूर्ण सहभाग घेण्यास मदत करण्याची संधी मिळते. तेव्हा, या खास कार्यात सहभाग घेण्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करू या आणि चांगल्याप्रकारे साक्ष देण्यासाठी आपल्या संयुक्‍त प्रयत्नांना आणखी मजबूत करू या.

१२ मार्च आणि एप्रिल महिन्यांदरम्यान जादा कार्य करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनांना वडीलजन व सेवा सेवक सहकार्य देतीलच, परंतु सेवा पर्यवेक्षकांनी खासकरून सुवार्तिक कार्यासाठी योग्य योजना केल्या पाहिजेत. त्यांनी क्षेत्र सेवेसाठी बहुतेक प्रचारकांना सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणांची, दिवसांची आणि वेळेची योजना करून त्याची मंडळीत नियमित घोषणा करावी. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी एकत्र जमण्याची योजना केली जाऊ शकते; यामुळे मंडळीतील सर्वांना साक्षकार्याच्या विविध प्रकारांत भाग घेण्याची संधी मिळू शकेल. यात, व्यापारी क्षेत्रात, रस्त्यावर आणि घरोघरी साक्षकार्य करणे तसेच पुनर्भेटी देणे आणि टेलिफोनद्वारे साक्ष देणे यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी, त्या महिन्यांसाठी पुरेसे साहित्य, नियतकालिके आणि क्षेत्र आहे की नाही याची खात्री करावी.

१३ मार्च महिन्यात बायबल अभ्यास चालू करण्याच्या ध्येयाने ज्ञान पुस्तक सादर केले जाणार आहे. जानेवारी २००२ च्या आमची राज्य सेवा यात ज्ञान पुस्तक सादर करण्याकरता उत्तम सादरता सुचवल्या होत्या. एप्रिल महिन्यात टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके सादर करण्यात येतील. “मासिके कशी सादर कराल?” यात सुचवलेल्या सादरतांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. चांगल्याप्रकारे साक्ष देण्याकरता सर्वांनी तयारी करण्यासाठी वेळ काढला पाहिजे.

१४ मंडळीचा मस्तक, ख्रिस्त येशू याच्या निर्देशनाखाली कार्य करण्याबद्दल व इतरांना सुवार्ता सांगण्याच्या आपल्याला मिळालेल्या विशेषाधिकाराबद्दल आपण किती आनंदी आहोत! मार्च आणि एप्रिल महिने जवळ येतात तसे आपण, प्रचार करण्याच्या व चांगल्याप्रकारे साक्ष देण्याच्या ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेचे पालन करून पुन्हा एकदा या महिन्यांना सर्वात उत्तम महिने करू या.

[४ पानांवरील चौकट]

मार्च आणि एप्रिल २००३ मध्ये सहायक पायनियरींग करण्याचे विविध मार्ग

दिवस तास

सोमवार १ २ - - २ -

मंगळवार १ - ३ - - -

बुधवार १ २ - ५ - -

गुरुवार १ - ३ - - -

शुक्रवार १ २ - - - -

शनिवार ५ ४ ३ ५ ६ ७

रविवार २ २ ३ २ २ ३

मार्च ५६ ५६ ५४ ५५ ५० ५०

एप्रिल ५० ५० ५१ ५३ - -

यांपैकी कोणता आराखडा तुमच्या सोयीनुसार आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा