रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते आवर्जून पाहण्याजोगा व्हिडिओ
रक्ताविना औषधोपचार करण्याच्या क्षेत्रातील किती पर्याय तुम्हाला माहीत आहेत? संक्रमणाचे काही पर्याय कोणते आहेत आणि ते कसे कार्य करतात हे तुम्हाला समजते का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्नांद्वारे आपल्या ज्ञानाचा अंदाज घ्या. सूचना: या व्हिडिओत शस्त्रक्रियेची काही लहान दृश्ये दाखवण्यात आली असल्यामुळे, आपल्या लहान मुलांबरोबर हा व्हिडिओ पाहायचा की नाही याबाबतीत पालकांनी योग्य काय ते ठरवावे.
(१) यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण का नाकारतात याचे प्रमुख कारण काय आहे आणि बायबलमध्ये हे तत्त्व कोठे आढळते? (२) वैद्यकीय उपचार घेण्याच्या बाबतीत आपली काय इच्छा आहे? (३) रुग्णांचा मूलभूत हक्क काय आहे? (४) रक्त संक्रमण नाकारणे उचित व जबाबदारीचे का आहे? (५) रुग्णाचे खूप रक्त वाया जाते तेव्हा डॉक्टर कोणती दोन तातडीची पावले उचलू शकतात? (६) रक्त संक्रमणाशी आरोग्याचे कोणते धोके संबंधित आहेत? (७) शस्त्रक्रियेच्या वेळी जास्त रक्त वाया जाऊ नये म्हणून शल्यचिकित्सकांकडे कोणती काही साधने असतात? (८) संक्रमणाच्या पर्यायाविषयी कोणती माहिती तुम्हाला असली पाहिजे? (९) रक्त संक्रमणाविना गंभीर व जटिल शस्त्रक्रिया करणे शक्य आहे का? (१०) अनेकानेक शल्यचिकित्सक यहोवाच्या साक्षीदारांसाठी काय करण्यास तयार आहेत आणि कालांतराने सर्व रुग्णांसाठी औषधोपचाराचा कोणता दर्जा ठरू शकतो?
रक्ताविषयी आपली भूमिका काय आहे याबाबतीत प्रश्न विचारणाऱ्या कोणत्याही बायबल विद्यार्थ्याबरोबर, साक्षीदार नसलेल्या विवाह सोबत्याबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर, सहकर्मचाऱ्यांबरोबर, शिक्षकांबरोबर आणि शाळासोबत्यांबरोबर रक्ताविना हा व्हिडिओ पाहणे फायदेकारक ठरेल. व्हिडिओत दाखवलेले कोणतेही उपचार स्वीकारायचे की नाहीत हे, पूर्णपणे एखाद्या व्यक्तीच्या जाणीवपूर्वक निर्णयावर अवलंबून आहे.—टेहळणी बुरूज, जून १५ आणि ऑक्टोबर १५, २००२ अंकांतील “वाचकांचे प्रश्न” लेख पाहा.