वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०२ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००२
आमची राज्य सेवा—२००२
km ७/०२ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता जुलै व ऑगस्ट: कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), आणि सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) पर्यायी सादरता म्हणून, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, ही प्रकाशने तुम्ही देऊ शकता. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवली जाते तेथे अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

▪ सप्टेंबर १६, २००२ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहापासून आपण, यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश २ (इंग्रजी) या पुस्तकाचा आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यास करणार आहोत. हे प्रकाशन आसामी, गुजराती, मराठी आणि नेपाळी भाषांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे, या भाषा बोलणाऱ्‍या प्रचारकांनी इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील पुस्तकापासून लाभ घ्यावा.

▪ सप्टेंबरपासून, विभागीय पर्यवेक्षक, “ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख कायम ठेवा” असे शीर्षक असलेले जाहीर भाषण देतील.

▪ काही मंडळ्यांनी, वार्षिक साहित्यांची व सेवा प्रशाला पुस्तकाची गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मागणी केली आहे. कृपया याची नोंद घ्यावी, की स्मारकविधीच्या निमंत्रण पत्रिका यांव्यतिरिक्‍त, खास मागणी अर्ज यांतील इतर साहित्य जसे की, शास्त्रवचनांचे परीक्षण, कॅलेंडर, प्रांतीय अधिवेशनांचे बॅज कार्ड आणि सेवा प्रशाला पुस्तके केवळ मंडळीबरोबर सहवास राखणाऱ्‍यांसाठीच आहेत, क्षेत्रात वाटप करण्यासाठी नाही. त्यामुळे, मंडळीकडून मिळालेल्या मागणीत आम्ही, प्रचारकांच्या संख्येनुसार फेरबदल केले आहेत. सर्व सचिवांना विनंती केली जाते की त्यांनी, पॅकींग यादीत वार्षिक साहित्यांची उरलेली संख्या तपासून पाहावी. अतिरिक्‍त साठा हवाच असेल तर एका चिठ्ठीवर ज्यादा साहित्य मागवण्याचे कारण लिहून पुन्हा एकदा मागणी करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा