सेवा सभा आराखडा
मे १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१५ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरतेच्या रकान्यातील पहिले) आणि मे १५ चे टेहळणी बुरूज सादर करणारी दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवा. दोन्ही प्रात्यक्षिकांमध्ये, “मी कामात आहे,” या संभाषणाला खीळ घालणाऱ्याला कसे हाताळायचे ते दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृष्ठे ११-१२.
१० मि: “आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?” वडिलांचे प्रोत्साहनदायक भाषण.
२० मि: “२००२ ‘आवेशी राज्य उद्घोषक’ यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन.”a सचिवांनी हा भाग हाताळावा. बायबल काळापासून आपल्या काळापर्यंत, देवाच्या लोकांना मजबूत बनवण्यासाठी, मोठमोठ्या अधिवेशनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. [उद्घोषक, (इंग्रजी) पृष्ठ २५४, परिच्छेद १-३ आणि सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठ ८२१, परिच्छेद ५ पाहा.] या वर्षाच्या तीन दिवसांच्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १ (१३)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. प्रश्नपेटीची उजळणी करा.
१० मि: ख्रिस्ती तटस्थता टिकवून ठेवा. योग्य वडिलांकरवी भाषण. शाळा, कामाच्या ठिकाणी आणि शेजारीपाजारी लोकांमध्ये देशभक्तीची मनोवृत्ती दिसून येते. या मनोवृत्तीला प्रोत्साहन देणारे अनेक जण राष्ट्रीय दुर्घटनांबद्दल वाटणाऱ्या चिंतेला व दुःखाला तोंड देण्यासाठी हे करतात. आपण जगात जे पाहतो त्यामुळे आपल्यालाही वाईट वाटत असले तरी, विश्वव्यापी सार्वभौमत्वाचा अधिक महत्त्वाचा वादविषय आपल्याला समजतो आणि राज्य संदेशातून आपल्याला सांत्वन मिळते. राष्ट्रीय कार्यांत आपण भाग का घेत नाही हे लोकांचे मन न दुखावता समजावून सांगताना आपण त्यांना देवाच्या वचनांतील सांत्वनदायक व आशादायक संदेशही सांगितला पाहिजे. यहोवाचे साक्षीदार व शिक्षण (इंग्रजी) या माहितीपत्रकातील पृष्ठे २०-४ वरील “झेंडा वंदन” या पोटमथळ्याखाली, आपण देशभक्तीच्या कार्यक्रमांत भाग का घेत नाही त्याची कारणे दिली आहेत. मुख्य विषयांवर चर्चा करा आणि या माहितीची आपल्या मुलांबरोबर काळजीपूर्वक उजळणी करण्यास पालकांना उत्तेजन द्या. माहितीपत्रकाच्या पृष्ठ २० वरील आणि जानेवारी ८, १९९६, सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठ ३१ वरील अनुभव सांगा. सरकारी अधिकाऱ्यांचा आदर करताना यहोवाला अनन्य भक्ती देण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
८ मि: स्थानीय गरजा.
१५ मि: “स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो.” वडील श्रोत्यांबरोबर लेखाची चर्चा करतात. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, २००२, पृष्ठे ६-७ वरील माहितीची संक्षिप्त उजळणी करून भाग समाप्त करा.
गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
१२ मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना त्यांचा मे महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एका तरुण प्रचारकाला एप्रिल-जूनचे सावध राहा! (मासिक सादरतेच्या रकान्यातील तिसरे.) आणि एका वृद्ध प्रचारकाला जून १ चे टेहळणी बुरूज सादर करत असल्याचे प्रात्यक्षिकात दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, सादरतेत शास्त्रवचनाचा किती सहजपणे उपयोग करण्यात आला होता त्यावर विवेचन मांडा.
१५ मि: “तुमच्या मंडळीच्या सेवेचे क्षेत्र मोठे आहे का?” सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग भाषण व श्रोत्यांबरोबर चर्चा या रूपात हाताळावा. मंडळीकडे किती क्षेत्र आहे आणि गेल्या वर्षी किती क्षेत्र पूर्ण करण्यात आले ते दाखवा. दिलेल्या सूचना स्थानीयरीत्या कशाप्रकारे उपयोगात आणल्या जाऊ शकतात ते समजावून सांगा. येणाऱ्या दिवसांत, क्वचितच कार्य केल्या जाणाऱ्या क्षेत्रात सेवा करण्याच्या योजनांची उजळणी करा.
१८ मि: “अभ्यास सुरू करण्याकरता तुम्ही अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करता का?” (या भागाची चर्चा होताना मंडळीतील सर्वांनी जानेवारी २००२ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणी सोबत आणावी.) सुरवातीला, चांगल्याप्रकारे तयारी केलेला एक प्रचारक परिच्छेद ३ मधील उदाहरणानुसार बायबल अभ्यास कसा सुरू करतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर, माहितीपत्रकाचे ठळक मुद्दे सांगा आणि बायबल अभ्यास सुरू करण्यासाठीच खास हे कशाप्रकारे बनवण्यात आले आहे तेही सांगा. जानेवारी २००२ च्या पुरवणीत सुचवलेल्या सादरतांची उजळणी करणे महत्त्वाचे का आहे ते सांगा. श्रोत्यांना विचारा, की कोणत्या सादरतांमुळे त्यांना यश आले. वर सुचवलेले प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दाखवून भागाची सांगता करा.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१५ मि: स्थानीय घोषणा. मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यात साहाय्यक किंवा सामान्य पायनियरींग केल्यामुळे कोणते प्रतिफळ मिळाले व आनंद कसा मिळाला हे सांगण्यासाठी काही प्रचारकांची व्यवस्था करा.
१५ मि: युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकात इतर बायबल भाषांतरांचाही उपयोग कसा करण्यात आला आहे. श्रोत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर संक्षिप्त भाषण द्या. युक्तिवाद पुस्तकाच्या पृष्ठ ८ वरील दुसरा परिच्छेद वाचा आणि आपल्या क्षेत्र सेवेत आपण बायबलवर जास्त भर का व कसा दिला पाहिजे ते समजावून सांगा. पृष्ठ ६ वरील बायबल भाषांतरांच्या संक्षिप्त नावांची यादी दाखवा आणि आपण इतर भाषांतरांतून उतारे का घेतो ते समजावून सांगा. टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९७ पृष्ठ १६ वरील परिच्छेद २ आणि पृष्ठ २० वरील परिच्छेद १५ यांत उल्लेखलेल्या स्मरणिकांवर चर्चा करा. युक्तिवाद पुस्तकातून, “प्रेषितांचे स्वर्गारोहण,” “मूर्ती,” आणि “त्रैक्य” या विषयांचा उपयोग करून श्रोत्यांना, विविध भाषांतरांची तुलना केल्याने सत्य शिकवण्यास कशी मदत मिळते ते सांगण्यास आमंत्रित करा.
१५ मि: “आपला विश्वास आपल्याला सत्कर्मे करण्यास प्रेरित करतो.”b परिच्छेद २ ची चर्चा करताना, एका आवेशी साक्षीदाराची थोडक्यात मुलाखत घ्या. तिला/त्याला, इतरांना साक्ष दिल्याने आपला विश्वास प्रदर्शित कसा होतो, मजबूत कसा होतो हे व्यक्त करण्यास सांगा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.