घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. पुनर्भेटीच्या वेळी घरमालकाला आस्था आहे असे दिसून आल्यास तुम्ही नियतकालिक मार्ग सुरू करू शकता. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. घरमालकांकडे ही प्रकाशने आधीच असतात तेव्हा मंडळीकडे साठा असलेले उचित माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. जुलै: कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: देव खरोखरी आपली काळजी करतो का? भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.
▪ प्रत्येक मंडळीला जानेवारीच्या मासिक यादीसोबतच वार्षिक साहित्यांसाठी खास मागणी अर्ज, देखील पाठवण्यात आला होता. ज्या मंडळ्यांनी अद्याप २००२ अधिवेशनाच्या बॅज काड्र्सच्या तसेच २००३ सालासाठी वार्षिक साहित्यांच्या साठ्याची मागणी केलेली नसेल त्यांनी ती लगेच पाठवून द्यावी. राज्य सभागृह साहित्य यादी व्यवस्थेखाली येणाऱ्या मंडळ्यांनी त्यांच्या “कोऑर्डिनेटींग काँग्रीगेशन” द्वारेच आपल्या मागण्या पाठवाव्यात. कोऑर्डिनेटींग काँग्रीगेशनच्या सचिवांनी याची खात्री करावी, की त्यांच्या साहित्य गटामधील प्रत्येक मंडळीसाठी आवश्यक असलेला साठा त्यांनी मागवला आहे.
▪ संस्थेला सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षक आणि सचिव यांचे पत्ते आणि टेलिफोन नंबर यांची एक अद्ययावत नोंद ठेवणे जरूरीचे असते. त्यामुळे यांत कधीही काही बदल झाल्यास मंडळीच्या सेवा समितीने, अध्यक्षीय पर्यवेक्षक/सचिव पत्त्यात बदल (S-29) फॉर्म संबंधितांच्या सह्यांसहित तो पूर्णपणे भरून लवकरात लवकर संस्थेला पाठवून द्यावा. पिन कोडमध्ये बदल झाला तरीसुद्धा संस्थेला कळवणे आवश्यक आहे.
▪ मंडळीच्या सचिवांनी, सामान्य पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205), व सहायक पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205b) यांचा पुरेसा साठा आपल्याजवळ बाळगावा. या फॉर्म्सची मागणी साहित्य मागणी फॉर्म (S-14) यावर केली जाऊ शकते. या फॉर्म्सचा निदान एका वर्षाचा तरी साठा ठेवला जावा. सामान्य पायनियर अर्ज पूर्णपणे भरलेला आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून पाहावे. अर्जदारांना त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख आठवत नसल्यास त्यांनी अंदाजे तारीख घालून त्याची नोंद करून ठेवावी.
▪ तुम्ही दुसऱ्या एखाद्या देशात जाणार असाल व तुम्हाला तेथील मंडळीच्या सभांची, एखाद्या संमेलनाची किंवा प्रांतीय अधिवेशनाची माहिती हवी असेल तर, तारखा, वेळ आणि ठिकाण यांबाबतचे तुमचे विनंतीवजा पत्र त्या देशांतील कारभार पाहणाऱ्या शाखा दफ्तराला पाठवावे. अलीकडच्या वार्षिकपुस्तकाच्या शेवटल्या पानावर तुम्हाला शाखा दफ्तरांचे पत्ते मिळतील.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
“सर्व शास्त्रवचने ईश्वरप्रेरित आणि लाभदायक” —तामीळ
आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित —तामीळ