“मानवरूपी देणग्या” देवाच्या कळपाचे पालन उत्साहाने करतात
१ यहोवाने आपल्या पुत्राकरवी “मानवरूपी देणग्या” [NW] देऊन किती प्रेमळ योजना केली आहे. (इफिस. ४:८, ११, १२) या मानवरूपी देणग्यांकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत; देवाच्या कळपाचे सक्रियपणे व आनंदाने पालन करण्याची एक जबाबदारी त्यांच्याकडे आहे. (१ पेत्र ५:२, ३) आपल्या सर्वांनाच या तरतुदीची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यातून आपल्याला लाभही मिळतो. समस्यांचा सामना करणारे, नव्याने मंडळीत आलेले, विशिष्ट प्रकारची कमतरता असलेले, मंडळीपासून भरकटलेले, अशा सर्वांच्या आध्यात्मिक कल्याणाची या वडिलांना काळजी असते.—फिलिप्पै. २:४; १ थेस्सलनी. ५:१२-१४.
२ जागतिक घडामोडींमुळे बंधुभगिनी अस्वस्थ होतात तेव्हा हे सहमेंढपाळ “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा” असे होतात. जीवनाच्या समस्यांखाली आपण दबून जातो, आपण निराश होतो किंवा आपल्याला कोणाच्या आधाराची गरज असते तेव्हा हे वडील मदतीला धावून येतात. अशा वेळी ते “रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे होतात.—यश. ३२:२.
३ अक्रियाशील झालेल्यांना प्रोत्साहन देणे: अनियमित किंवा अक्रियाशील झालेल्यांना उत्तेजन देण्याचा, मंडळीच्या सर्व कार्यहालचालींमध्ये पुन्हा नियमित सहभाग घेण्यासाठी पावले उचलण्यास त्यांना मदत करण्याचा वडीलजन विशेष प्रयत्न करीत आहेत. अशा अक्रियाशील बंधूभगिनींना प्रेमळपणे मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्यामुळे अनेक जण सभांना नियमित उपस्थित राहू लागले आहेत व आध्यात्मिकरीत्या ते इतके मजबूत झाले आहेत की ते क्षेत्र सेवेत पुन्हा एकदा भाग घेऊ लागले आहेत. वडिलांच्या या प्रयत्नांवरून आपल्याला, यहोवा देवाला आपल्या लोकांबद्दल असलेल्या काळजीचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या तडफदार नेतृत्वाचा प्रत्यय येतो. भरकटलेल्या किंवा हरवलेल्या मेंढराबद्दल अशाप्रकारची काळजी व्यक्त करण्यात त्याने उत्तम उदाहरण मांडले आहे.—मत्त. १८:१२-१४; योहा. १०:१६, २७-२९.
४ हे सहमेंढपाळ, एखाद्या बंधू किंवा भगिनीमध्ये, आध्यात्मिकरीत्या कमजोर होत चालल्याची काही चिन्हलक्षणे दिसतात का हे पाहत असतात. निरुत्साह, सभांना व क्षेत्र सेवेत अनियमित होणे यांसारखी चिन्हलक्षणे एखाद्यात दिसू लागल्यास त्याचा अर्थ त्या व्यक्तीला आध्यात्मिक मदतीची आवश्यकता आहे. जगीक लोकांप्रमाणे वेशभूषा व केशभूषा करण्याची किंवा मंडळीची सारखी टीका करण्याची प्रवृत्ती एखादा दाखवू लागतो तेव्हा अशा बंधू किंवा भगिनीला वडीलजन मदत करू इच्छितात. अशा लोकांनी यहोवाबद्दल आपल्या मनात पुन्हा एकदा प्रेम जागृत करावे म्हणून प्रामाणिक आवड व जिव्हाळा दाखवून काळजी वाहणारे हे प्रेमळ वडील “आपला जीवहि देण्यास राजी” होतात.—१ थेस्सलनी. २:८.
५ गतकाळात, काही समर्पित ख्रिश्चनांनी मंडळीबरोबरचा आपला संपर्क तोडला; आरोग्याच्या समस्या, आर्थिक अडचणी किंवा कुटुंबाकडून येणाऱ्या दबावांमुळे ते आध्यात्मिकरीत्या निष्क्रिय बनले. तेव्हा वडिलांनी टीकात्मक न होता अशा लोकांना खात्री दिली की यहोवा त्याच्या सर्व मेंढरांची काळजी घेतो आणि कठीण काळात तो त्यांना टिकून राहायला मदत करतो. (स्तो. ५५:२२; १ पेत्र ५:७) कळपाचे पालन करणारे हे सतर्क मेंढपाळ, या लोकांना जाणीव करून घेण्यास मदत करतात की ते जर ‘देवाजवळ आले म्हणजे तोही त्यांच्याजवळ येईल,’ त्यांना सांत्वन व तजेला देईल.—याको. ४:८; स्तो. २३:३, ४.
६ वयस्करांना जपणे: ज्यांच्याकडे सहजपणे दुर्लक्ष होऊ शकते अशा अशक्त लोकांची देखील सहमेंढपाळांना काळजी आहे. बहुतेक मंडळ्यांमध्ये असे कोणीतरी असतेच जे दुर्बल असते किंवा नर्सिंग होममध्ये असते अथवा अपंग असते. त्यांच्या परिस्थितीमुळे ते राज्याच्या संदेशाच्या प्रचार कार्यात मर्यादित सहभाग घेऊ शकतात हे समजण्याजोगे आहे. भेट द्यायला येणाऱ्या लोकांबरोबर, इतर रुग्णांबरोबर किंवा त्यांची काळजी घेणाऱ्यांबरोबरच त्यांना सुवार्तेबद्दल बोलायची संधी मिळत असावी. तरीपण, त्यांच्यापरीने ते करत असलेला प्रयत्न, एकूण प्रचार कार्याला मोलाचा हातभार लावतो असे आपण समजतो. (मत्त. २५:१५) ते फक्त १५ मिनिटांसाठी जरी साक्ष देत असले तरी, त्याचा अहवाल दिला पाहिजे व त्यांना नियमित राज्य प्रचारक म्हणून गणले पाहिजे.
७ “मानवरूपी देणग्या” असलेले वडीलजन, वर्षाच्या या काळात अर्थात स्मारक विधीच्या काळात आपल्या बांधवांच्या आध्यात्मिक गरजांविषयी विशेष सतर्क आहेत. मंडळीच्या उबदार सहवासामुळे मिळणारा आनंद व मानसिक शांती पुन्हा प्राप्त करावी म्हणून, मंडळीपासून भरकटत गेलेल्या सर्व लोकांना मदत करण्याचा खास प्रयत्न करणाऱ्या वडिलांसाठी हा किती उचित समय आहे! ‘विश्वासाने एका घरचे झालेल्या’ या लोकांना आपण, खंडणी बलिदानावरील आपला विश्वास आहे याची पुन्हा खात्री देऊन मंडळीच्या सभांमध्ये व क्षेत्र सेवेत पाहतो तेव्हा आपल्याला आनंद होतो.—गलती. ६:१०; लूक १५:४-७; योहा. १०:११, १४.