“सत्कर्माविषयी धनवान असावे”
१ आपल्या आवेशी सेवेच्या शेवटच्या वर्षांत, प्रेषित पौलाने तीमथ्य आणि तीत यांच्या अगदी निकट सहवासात राहून कार्य केले. दोघांनाही त्याने प्रोत्साहनात्मक पत्रे लिहिली. तीताला त्याने लिहिले, की “ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगली कामे चालविण्याविषयी काळजी घ्यावी.” (तीत ३:८, पं.र.भा.) तीमथ्याला त्याने लिहिले की देवावर आशा बाळगणाऱ्यांनी “सत्कर्माविषयी धनवान असावे.” (१ तीमथ्य ६:१७, १८) त्याचा हा सल्ला आज आपल्या सर्वांसाठीच उत्तम सल्ला आहे. परंतु आपल्याला आपल्या जीवनात सत्कर्मे करण्यास काय प्रवृत्त करेल? आणि येणाऱ्या दिवसांत कोणती विशिष्ट कर्मे आपण करू शकतो?
२ सत्कर्माविषयी धनवान होण्याची प्रेरणा आपल्याला, यहोवावर भरवसा ठेवल्याने आणि त्याच्यावर प्रेम केल्याने मिळते तसेच त्याने आपल्याला दिलेल्या अद्भुत आशेतूनही मिळते. (१ तीम. ६:१९; तीत २:११) वर्षाच्या या काळात खासकरून आपल्याला याची आठवण करून दिली जाते, की यहोवाने आपला पुत्र येशू याला पृथ्वीवर पाठवले जेणेकरून तो आपल्या पित्यावर लावलेला दोष काढून टाकील व सर्व योग्य लोकांसाठी जीवनाचा मार्ग तयार करू शकेल. (मत्त. २०:२८; योहा. ३:१६) हा मुद्दा, मार्च २८ रोजी ख्रिस्ताच्या स्मारक विधीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या भाषणात अगदी स्पष्ट केला जाईल. तेव्हा, सार्वकालिक जीवन मिळवण्याची आपल्याला आशा मिळाल्यामुळे, “सत्कर्माविषयी धनवान” होण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करण्यास आपण प्रेरित होत नाही का? निश्चितच! आता आपण कोणती सत्कर्मे करू शकतो?
३ मार्च आणि त्यानंतर करण्याजोगी सत्कर्मे: आपण सर्व निश्चितच स्मारकविधीला उपस्थित राहू. ही संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांसाठी वर्षातली सर्वात महत्त्वाची घटना आहे. (लूक २२:१९) आपल्या आनंदात होता होईल तितक्या लोकांनी सहभाग घ्यावा अशी आपली इच्छा आहे. २००२ वार्षिकपुस्तक (इंग्रजी), यातील सेवा अहवाल पाहिल्यावर तुम्हाला दिसून येईल की गेल्या वर्षी पृथ्वीवरील अनेक देशांतील स्मारक उपस्थिती प्रचारकांच्या संख्येपेक्षा तिप्पट, चौपट, पाचपट किंवा त्यापेक्षा अधिक पटीने होती. सर्व मंडळ्यांमधील सर्वांनी आपापल्या क्षेत्रात स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकेचे वाटप करण्यात कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसून आले. तेव्हा, मार्च २८ येण्याआधीच आपण होता होईल तितका वेळ लोकांना स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात घालू इच्छितो, तारणाच्या आशेविषयी त्यांनी शिकावे म्हणून त्यांना मदत करू इच्छितो.
४ एप्रिल महिन्यात बऱ्याच मुलांच्या शाळांना सुटी लागलेली असते; त्यामुळे मुले आणि त्यांचे पालक यांच्याकडे बराच रिकामा वेळ उरतो. हा रिकामा वेळ आपण “सत्कर्माविषयी धनवान” होण्यात कसा कामी लावू शकू? सुवार्तेच्या प्रचार कार्यात जोमाने सहभाग घेऊन व “चांगल्या कामात तत्पर” राहून. (तीत २:१४; मत्त. २४:१४) तुम्हाला मार्च महिन्यात साहाय्यक पायनियरींग करता आली नाही तर तुम्ही एप्रिल व/किंवा मे महिन्यात करू शकाल का? तुम्ही जर मार्च महिन्यात पायनियरींग करणार आहात तर ती पुढेही चालू ठेवू शकाल का?
५ प्रापंचिक नोकरी करणाऱ्या काहींना दिसून आले आहे की कामाला जाताना तासभर ते कदाचित रस्त्यावरील साक्षकार्यात किंवा सकाळी लवकरच सुरू होणाऱ्या व्यापार क्षेत्रातील लोकांना साक्ष देण्याच्या कार्यात भाग घेऊ शकतात. काही जण त्यांच्या दुपारच्या जेवणाची सुटी साक्षकार्यासाठी ठेवतात. काही जणांना या वेळेत आपल्या सहकर्मचाऱ्याबरोबर बायबल अभ्यास करता येतो. शाळा चालू असतात तेव्हा देखील, गृहिणी असलेल्या अनेक भगिनी, अधिक वेळ क्षेत्र सेवेसाठी वेळ काढू शकल्या आहेत. आपली दररोजची कामे करण्यासाठी सकाळी जरा लवकर उठल्यास त्यांना प्रचार कार्यासाठी व बायबल अभ्यास चालवण्यासाठी वेळ मिळू शकतो.—इफिस. ५:१५, १६.
६ तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करायला जमत नसले तरी, सेवेत अधिकाधिक भाग घेण्याकरता तुम्ही स्वतःचे एक व्यक्तिगत वेळापत्रक बनवू शकता; जेणेकरून तुम्हाला ‘चांगले ते करण्यास, सत्कर्माविषयी धनवान असण्यास व इतरांना सत्य सांगण्यासाठी परोपकारी व दानशूर’ होण्यास जमेल.—१ तीम. ६:१८.
७ शिष्य बनवण्याच्या सत्कर्माची सतत आठवण ठेवा: दर वर्षी बरेच आस्थेवाईक लोक स्मारकविधीला येतात. मंडळीतील कोणाला तरी, उपस्थित राहणाऱ्या परंतु सध्या अभ्यास न करणाऱ्या अशा लोकांकडे लक्ष देणे जमेल का? त्यांना आध्यात्मिक प्रगती करता यावी म्हणून साहाय्य करण्याकरता त्यांच्याकडे कोणाला पुन्हा भेटी देता येतील का? कदाचित या आस्थेवाईक लोकांपैकी काही लोक साक्षीदारांचे नातेवाईक असतील. किंवा काही असे असतील जे पूर्वी अभ्यास करत होते; तर अशांना अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी व नियमितरीत्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी थोड्या प्रोत्साहनाची आवश्यकता असेल. अशा लोकांना पुन्हा एकदा आपल्याबरोबर यहोवाचे सक्रिय सेवक झाल्याचे पाहून आपल्याला आनंद होणार नाही का?
८ मार्च आणि मार्चनंतरच्या काळात आपण क्षेत्र सेवेत जास्तीत जास्त भाग घेऊ तेव्हा कदाचित आपण अशा अनेक आस्थेवाईक लोकांना भेटू ज्यांच्याकडे आपण पुन्हा जाऊ शकू. निघण्याआधी आपण अशा लोकांना एक प्रश्न विचारू शकतो ज्यावर ते विचार करू शकतील. आणि मग त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही पुढच्या वेळी याल हे त्यांना तुम्ही सांगू शकता. अशाने तुम्ही पुनर्भेटीसाठी मार्ग तयार करता. जितक्या लवकर तुम्ही पुनर्भेट द्याल तितका चांगला परिणाम तुम्हाला मिळेल. पहिल्या भेटीत आपण अभ्यास सुरू करू शकलो नाही तर शक्य असल्यास पुढच्या भेटीत लगेच आपण प्रयत्न करू शकतो.
९ रस्त्यावरील साक्षकार्यात आपण लोकांबरोबर संभाषण सुरू करण्यास तत्पर असले पाहिजे. अनेक प्रचारकांना रस्त्यावर साक्षकार्य करताना आस्थेवाईक लोकांनी आपली नावे, पत्ता आणि टेलिफोन नंबर दिले आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीला भेटलात ती व्यक्ती तुमच्या क्षेत्रात राहणारी नसेल तर राज्य सभागृहातून, कृपया पुनर्भेट द्या, (S-43) हा फॉर्म घेऊन तो भरा व मंडळीच्या सचिवांना तो द्या जेणेकरून ते, ती व्यक्ती ज्या क्षेत्रात राहते त्या क्षेत्राच्या मंडळीला तो देतील. सचिवांना हे करता येणार नसेल तर ते तो फॉर्म पुढील कार्यवाहीसाठी शाखा दफ्तराला पाठवतील. अशाप्रकारे त्या व्यक्तीची आस्था आणखी वाढवता येऊ शकेल.
१० जर तुम्हाला पत्ता नव्हे तर टेलिफोन नंबर मिळाला असेल तर त्या व्यक्तीला फोन करून तुम्ही पुनर्भेट करू शकता. तुम्ही काय चर्चा करू इच्छिता याची आधीच तयारी करा. संदर्भासाठी युक्तिवाद (इंग्रजी), पुस्तक हाताशीच ठेवा. काहींना टेलिफोनवर अभ्यास करण्यात चांगले यश मिळाले आहे; घरी भेटू न शकणाऱ्या लोकांबरोबरही टेलिफोनद्वारे अभ्यास छान चालल्याचे दिसून आले आहे. एका भगिनीने, घरोघरच्या कार्यात तिला भेटणाऱ्या आस्थेवाईक स्त्रियांकडून टेलिफोन नंबर घेण्यास सुरवात केली व अशाप्रकारे तिला दोन बायबल अभ्यास सुरू करण्यात यश मिळाले.
११ अक्रियाशील लोकांना मदत करण्यास वडिलांना सहकार्य द्या: या लोकांकडे प्रेमळपणे लक्ष देण्यात वडिलांना खास आस्था आहे. अनेक अक्रियाशील लोक स्वतःहूनच मंडळीच्या सभांना पुन्हा एकदा उपस्थित राहू लागले आहेत. स्तोत्र ९१ मध्ये वर्णन केलेली आध्यात्मिक सुरक्षा आपल्याला हवी असेल तर यहोवाच्या संघटनेच्या निकट राहणे महत्त्वाचे आहे हे या लोकांनी ओळखले पाहिजे. यांपैकी काही लोक तर क्षेत्र सेवेत पुन्हा भाग घेण्यास तयार झाले आहेत. अक्रियाशील असलेले इतर लोक या महिन्यातील स्मारक विधीला उपस्थित राहिलेच तर व्यक्तिगत बायबल अभ्यास करण्यास त्यांना आवडेल. असे आहे तर मग साहाय्य मिळवू पाहणाऱ्या या लोकांबरोबर अभ्यास करण्यासाठी वडिलांनी व्यवस्था करावी. अशाप्रकारचे साहाय्य देण्यासाठी तुम्हाला सांगण्यात आले असेल तर तुमचे सहकार्य हे प्रशंसनीय ठरेल.—रोम. १५:१, २.
१२ ‘चांगली कामे चालवित’ राहा: एक किंवा अधिक महिन्यांसाठी साहाय्यक पायनियरींग केलेल्यांना दिसून आले आहे, की पुढच्या महिन्यांत त्यांचे क्षेत्र कार्य वाढले. ते अशा आस्थेवाईक लोकांना भेटले ज्यांच्याकडे पुन्हा गेले पाहिजे असे त्यांना वाटले. अशा लोकांना पुन्हा भेटता यावे म्हणून, पूर्वीपेक्षा जास्त वेळा क्षेत्र सेवेत जाण्यास त्यांना प्रेरणा मिळाली. काहींनी बायबल अभ्यास सुरू केले; अशाप्रकारे त्यांना सेवेमध्ये जास्त भाग घेण्यास मदत मिळाली.
१३ इतर काहींना, प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात इतका आनंद मिळू लागला, की आपल्या प्राथमिकतांचे परीक्षण करून पाहण्यास ते प्रेरित झाले. यामुळे काही जण, प्रापंचिक नोकरीसंबंधाने थोडीफार तडजोड करून नियमित साहाय्यक पायनियरींग करू लागले. इतर काही जण सामान्य पायनियर सेवेत उतरू शकले. जगीक गोष्टींवर नव्हे तर देवावर पूर्ण आशा ठेवण्यास ते शिकले. “परोपकारी व दानशूर” झाल्याने यहोवाकडून समृद्ध आशीर्वाद मिळतात व “खरे जीवन” उपभोगण्याची आपली आशा आणखी पक्की झाली हे त्यांच्या नजरेस आले. (१ तीम. ६:१८, १९) अर्थातच, जसजसे अधिकजण पायनियर सेवा करतील तसतसा सबंध मंडळीला लाभ होईल. आपले अनुभव सांगितल्याशिवाय व इतरांनीही आपल्याबरोबर क्षेत्र सेवेत यावे म्हणून त्यांना उत्तेजन दिल्याशिवाय पायनियरांना राहावत नसल्यामुळे, मंडळीत एकदम आध्यात्मिक वातावरण निर्माण होते.
१४ तेव्हा, ख्रिस्ती सेवेतील आपला सहभाग अधिक वाढवून आपण स्मारक विधीच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या काळातही सर्व जण “सत्कर्माविषयी धनवान” होऊ या. एका धार्मिक नव्या पृथ्वीवर चिरकाल राहण्याची आशा दिल्याबद्दल आपण यहोवाला आपले आभार प्रदर्शित करू या.—२ पेत्र ३:१३.