वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • मार्च ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km ३/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ७ (५१)

१३ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जानेवारी-मार्चचे सावध राहा! आणि मार्च १५ चे टेहळणी बुरूज सादर करणारी दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवा. दोन्ही प्रात्यक्षिकांमध्ये, “मला आस्था नाही,” हा संभाषणाला खीळ घालणारा विषय कसा हाताळायचा ते दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवा.—युक्‍तिवाद पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ १६.

१२ मि: उन्हाळ्यासाठी तुमच्या काय योजना आहेत? एक वडील अथवा एक सेवा सेवक आपल्या कुटुंबाबरोबर उन्हाळ्याच्या महिन्यांतील त्यांच्या योजनांची चर्चा करतात. कुटुंब मिळून साहाय्यक पायनियरींग करण्याविषयी, आणि सुटी काढून मौजमजा करण्याविषयी ते बोलतात. बाहेरगावी गेले तरीसुद्धा मंडळीच्या सभा, क्षेत्र सेवा, कौटुंबिक बायबल अभ्यास यांसारख्या ईश्‍वरशासित कार्यांकडे दुर्लक्ष करू इच्छित नाहीत यावर त्या सर्वांचे एकमत आहे. ते घरी असले किंवा बाहेर कुठे गेलेले असले तरी, मंडळीच्या सचिवांना वेळीच आपला क्षेत्र सेवेचा अहवाल पाठवण्याची खात्री करतील.

२० मि: “सत्कर्माविषयी धनवान असावे.”a सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. मार्च २८ रोजी येणाऱ्‍या स्मारकविधीसाठी क्षेत्र सेवेत पूर्ण भाग घेण्याची तयारी करण्यास सर्वांना आर्जवा. छापील आमंत्रण पत्रिकांना पूर्णपणे कामी कसे लावता येईल त्याची चर्चा करा. काही प्रचारकांना विचारा, की त्यांनी मागच्या वर्षी स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्‍यांना, बायबल विद्यार्थ्यांना व इतर आस्थेवाईक लोकांना कसे बोलवले होते व यामुळे सर्वांना कशाप्रकारे आनंद मिळाला होता. एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींग करू शकणाऱ्‍या सर्वांना उत्तेजन द्या व सभेनंतर पायनियरींगचा फॉर्म घेण्यास सांगा.

गीत क्र. १० (८२) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. “स्मारक विधीकरता सूचना” याची चर्चा करा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००२ यात, मार्च २३ पासून २८ पर्यंत स्मारकविधीसाठी असलेली बायबल वचने वाचायला सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि:“यहोवाबरोबर आणि त्याच्या पुत्राबरोबर आनंदाने एक होणे.” वडिलांनी शास्त्रवचनांवर आधारित एक प्रेरणादायक भाषण द्यावे. आतापासून मार्च २८ पर्यंतच्या काळात सर्वांना, क्षेत्र सेवेत जास्तीत जास्त भाग घेऊन आपल्याबरोबर होता होईल तितक्या लोकांना स्मारकविधीसाठी उपस्थित राहण्यास आमंत्रित करण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: वार्षिकपुस्तकाचा तुम्हाला किती लाभ होतो? भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. पहिल्यांदा, राज्य सेवेच्या पृष्ठ ६ वरील “नियमन मंडळाकडून पत्र” यांतील मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या. मग, श्रोत्यांना हे विचारा, की वार्षिकपुस्तकातील कोणते अहवाल व अनुभव त्यांना विशेष प्रोत्साहनदायक व विश्‍वास मजबूत करणारे वाटले. सर्वांना, वार्षिकपुस्तक वाचून काढण्याचे व आपल्या बायबल विद्यार्थ्यांचा यहोवाच्या संघटनेशी परिचय वाढवण्यास त्यांना मदत व्हावी म्हणून वार्षिकपुस्तकाचा उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१४ मि: स्थानीय घोषणा. एप्रिल महिन्यात साहाय्यक पायनियरींगसाठी फॉर्म भरण्याची वेळ अजूनही गेलेली नाही हे सांगा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून एक तरुण बंधू/भगिनी, जानेवारी-मार्चचे सावध राहा! आणि एक वडील, एप्रिल १ चे टेहळणी बुरूज प्रस्तुत करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, प्रस्तुतीतल्या काही चांगल्या मुद्द्‌यांवर भर द्या.

१५ मि: स्थानीय गरजा.

१६ मि: उत्तेजन देण्यासाठी युक्‍तिवाद (इंग्रजी), पुस्तकाचा उपयोग करा. श्रोत्यांबरोबर चर्चा. प्रत्येकाला वेळोवेळी उत्तेजनाची आवश्‍यकता असते. यास्तव, इतरांना तसेच सेवेमध्ये आपल्याला भेटणाऱ्‍या सर्व दुःखी लोकांना “धीर” देण्याची गरज आहे याची आपल्या सर्वांना जाणीव झाली पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:१४) युक्‍तिवाद पुस्तकाचा उपयोग करून श्रोत्यांना विचारा, की पृष्ठे ११७-२१ वर सांगितलेल्या परीक्षांचा सामना करणाऱ्‍या व्यक्‍तीला ते शास्त्रवचनांच्या आधारावर कोणत्या प्रकारचे उत्तेजन देतील. आवश्‍यकता भासते तेव्हा प्रत्येकाने कोणाला तरी उत्तेजन देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे हे सुचवा.—गलती. ६:१०.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

७ मि: थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा मार्चचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१८ मि: “‘मानवरूपी देणग्या’ देवाच्या कळपाचे पालन उत्साहाने करतात.” वडिलांनी भाषण द्यावे. दिलेल्या शास्त्रवचनांवर चर्चा करा. निष्क्रिय झालेल्या लोकांना मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्याने आणि अशक्‍त लोक आपल्या परीने जो प्रयत्न करू शकतात तो करण्यास त्यांना मदत केल्याने कोणते चांगले परिणाम मिळू शकतात व मिळाले आहेत ते सांगा. यहोवाच्या सेवेत सक्रिय राहण्यासाठी हे सर्व लोक जो प्रयत्न करतात त्याची प्रेमळ मेंढपाळ कदर करतात.

२० मि: “प्रचार कार्यातला तुमचा आनंद द्विगुणीत करा.”b परिच्छेद ५ ची चर्चा करताना, स्थानीय क्षेत्रात जास्तीत जास्त प्रभावी कसे होता येईल यावर श्रोत्यांना व्यावहारिक सल्ला विचारा. संक्षिप्त साक्ष देण्यासाठी आपण सुरवात कशी करू शकतो यावर एक किंवा दोन उदाहरणांचे प्रात्यक्षिक दाखवा. या आठवड्यांत साक्ष देण्यासाठी संधी निर्माण करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा