वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०१ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह
  • नव्हेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००१
km ११/०१ पृ. २

सेवा सभा आराखडा

नोव्हेंबर १२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

८ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.

१७ मि: युक्‍तीवाद (इंग्रजी), पुस्तकाची वैशिष्ट्ये. श्रोत्यांबरोबर चर्चा. या पुस्तकातील विविध वैशिष्ट्ये, बायबलच्या शिकवणुकींचे स्पष्टीकरण देण्यासाठी किती उपयुक्‍त आहेत याविषयीच्या खालील उदाहरणांचा विचार करा: “राज्य” (पृष्ठे २२५-६) किंवा “आत्मा” (पृष्ठ ३८०) यांच्या व्याख्या; देवाचे नाव कोठे आणि कशारितीने वापरले आहे हे दाखवणारे विविध भाषांतरांतील तुलनात्मक अनुवाद (पृष्ठे १९१-३) किंवा नरकाविषयीची खरी समज (पृष्ठे १६९-७०); इतर धर्मांपासून आपल्याला वेगळे करणाऱ्‍या सविस्तर विश्‍वासांची यादी (पृष्ठे १९९-२०१) किंवा कोणता धर्म खरा हे एखादी व्यक्‍ती कशी ओळखू शकते (पृष्ठे ३२८-३०); नाताळच्या उगमाविषयीचे सत्य उलगडणारी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी (पृष्ठे १७६-८) किंवा प्रारंभीच्या ख्रिश्‍चनांची तटस्थता (पृष्ठे २७३-५); उत्त्पत्तीला दुजोरा देणारा (पृष्ठे ८५-६) किंवा गांजा आणि तंबाखूच्या हानीकारक परिणामांना सिद्ध करणारा वैज्ञानिक पुरावा (पृष्ठे १०८-११). प्रचार कार्यात जेव्हाही संधी मिळते तेव्हा या उत्तम शिक्षण साधनाचा उपयोग करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: यहोवाच्या प्रीतीबद्दल कृतज्ञता दाखवल्याने मिळणारे आशीर्वाद—भाग १.”a परिच्छेद ३-६ वर चर्चा करत असताना, मंडळीतील बांधवांना घरोघरचे कार्य, रस्त्यावरील साक्षकार्य, पुनर्भेटी आणि बायबल अभ्यास यांत मिळालेले प्रोत्साहनदायक अनुभव विचारा.

गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.

नव्हेंबर १९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: स्थानीय गरजा.

२२ मि: “तुमची समजशक्‍ती वाढवा.”b एक वडील मागील सेवा वर्षातील खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण उजळणी करतात.

गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर २६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१५ मि: स्थानीय घोषणा. नोव्हेंबरचा क्षेत्र सेवा अहवाल देण्यास सर्व प्रचारकांना आठवण करून द्या. “मासिके कशी सादर कराल?” यातील सुचनांचा वापर करून, चांगली तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा; त्यासाठी ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! आणि नोव्हेंबर १५ टेहळणी बुरूज या मासिकांचा वापर करा. त्यानंतर डिसेंबरमध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक किंवा एखादे पर्यायी प्रकाशन देण्यासाठी सादरता कशा शोधाव्यात हे स्पष्ट करा. वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्समधील “प्रेझेन्टेशन्स” आणि मधला पोटमथळा “लिस्ट बाय पब्लिकेशन” पाहा. याची एक-दोन उदाहरणे सांगा.

१५ मि: “वेळ काढायचा कुठून?” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. ऑक्टोबर १, २००० टेहळणी बरूज, पृष्ठे २०-१, परिच्छेद ९-१० वरील “अभ्यासाकरता वेळ काढणाऱ्‍यांचे अनुभव” या पोटमथळ्याखालील मुख्य मुद्यांचा समावेश करा. अनावश्‍यक कार्यांतून महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढण्याचे काही व्यावहारिक मार्ग कोणते आहेत हे श्रोत्यांना विचारा. व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक अभ्यास, मंडळीच्या सभा, क्षेत्र सेवा आणि दैनिक बायबल वाचनासाठी वेळ बाजूला काढून ठेवण्याच्या गरजेवर जोर द्या.

१५ मि: लहान मुले यहोवाची स्तुती करतात. श्रोत्यांबरोबर चर्चा. बहुतेक मंडळ्यांमध्ये असे अनेक लहान मुले आहेत जे प्रचारकार्यात भाग घेतात. या मुलांना बहुतेककरून प्रौढांना साक्ष द्यावी लागत असली तरीसुद्धा त्यांनी यांत भाग घेणे उचित आहे. (स्तो. १४८:१२, १३; मत्त. २१:१५, १६) पालक आणि प्रचारक, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याद्वारे या लहान मुलांमध्ये रस घेतात तेव्हा या मुलांना क्षेत्र सेवेत भाग घेण्यास आनंद वाटतो. घरोघरच्या कार्यासाठी आणि पुनर्भेटींसाठी मुलांना सोबत नेण्याचे काही मार्ग सुचवायला श्रोत्यांना सांगा. मासिके कशी सादर करायची, आपल्या सादरतेत बायबलचा उपयोग कसा करायचा व घरमालकाशी आत्मविश्‍वासाने कसे बोलायचे हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी काय केले हे पालकांना विचारा. मुलांना शाबासकी देणे किती फायद्याचे आहे याचा विशेष उल्लेख करा. एक किंवा दोन लहान प्रचारकांची मुलाखत घ्या. प्रचारकार्यासंबंधी त्यांना कोणती गोष्ट आवडते आणि का आवडते ते विचारा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १६ (१४३)

१० मि: स्थानीय घोषणा. प्रश्‍न पेटीची उजळणी करा.

१५ मि: “शक्‍तीसाठी यहोवावर अवलंबून राहा.”c टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९९, पृष्ठे १८-१९, परिच्छेद ६-८ मधील मुद्दे संक्षिप्तपणे सांगा.

२० मि: “अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!” श्रोत्यांबरोबर चर्चेच्या रूपात सेवा पर्यवेक्षक हा भाग हाताळतील. उपलब्ध असल्यास, अटेन्डंट्‌सना उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका द्यायला सांगा. “मासिके कशी सादर करावीत?” या पेटीत दिलेल्या सुचनांचा उपयोग करून चांगली तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा. एक प्रचारक ऑक्टोबर-डिसेंबर सावध राहा! सादर करतो तर दुसरा डिसेंबर १ चे टेहळणी बुरूज सादर करतो. प्रत्येक प्रात्यक्षिकाच्या शेवटी, प्रचारक बायबलविषयी माहिती ही पत्रिका, मासिके न घेतलेल्या आणि मासिके घेतलेल्या—घरमालकाला देतो. सेवाकार्यात भेटणाऱ्‍या प्रत्येकाला ही नवीन पत्रिका देण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा