वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km ६/०१ पृ. ३

घोषणा

◼ साहित्य सादरता जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर जास्त लक्ष द्या. जुलै व ऑगस्ट: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: चिरकाल टिकणारे ईश्‍वरी नाव (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! व मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे, आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—मदत अथवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्धाविना जग असेल का? (इंग्रजी) व सर्व लोकांसाठी एक पुस्तक ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. सप्टेंबर: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार हे माहितीपत्रक आणि जीवनाची सुरवात कशी झाली? उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) हे पुस्तक.

◼ जुलै ३०, २००१ ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यापासून भारतातील सर्व पुस्तक अभ्यास गटांमध्ये यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीसाठी प्रकाश १ या इंग्रजी पुस्तकाचा अभ्यास केला जाईल. याचा अर्थ मराठी, नेपाळी आणि तेलगू भाषिक पुस्तक अभ्यासांच्या गटांमध्ये देखील याच पुस्तकाचा अभ्यास केला जाईल.

◼ फेब्रुवारीच्या मासिक स्टेटमेंटबरोबर प्रत्येक मंडळीला स्पेशल रिक्वेस्ट फॉर्म फॉर ॲन्युएल आयटम्स हेही पाठवण्यात आले होते. ज्या मंडळ्यांनी अद्यापही, २००१ च्या अधिवेशनाचे बॅजकार्ड आणि इतर वार्षिक साहित्य जसे की शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे, वार्षिकपुस्तक, कॅलेंडर आणि २००२ वर्षाच्या स्मारक निमंत्रणपत्रिका यांची मागणी केली नसेल त्यांनी होता होईल तितक्या लवकर ती करावी. नाहीतर संस्थेला, तुमच्या पुढील वर्षाच्या मागण्या पाठवायला कठीण जाईल. किंगडम हॉल लिटरेचर इन्व्हेंटरी अरेंजमेंटखाली येणाऱ्‍या मंडळ्यांनी, त्यांच्या मागण्या फक्‍त “संयोजक मंडळी”द्वारेच पाठवाव्यात. साहित्य संयोजक आणि संयोजक मंडळीचे सचिव यांनी, प्रत्येक मंडळीच्या साहित्य गटासाठी आवश्‍यक साठ्याची मागणी करण्यात आली आहे याची खात्री करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा