तुमच्या व्यक्तिगत लायब्ररीत सर्व वार्षिकपुस्तके आहेत का?
यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक याची प्रत्येक प्रत मौल्यवान ज्ञानाच्या खजिन्याप्रमाणे आहे ज्यामुळे वाचणाऱ्या प्रत्येकाला आनंद मिळतो. संपूर्ण जगभरात चाललेल्या राज्य प्रचार कार्याचे उभारणीकारक अहवाल, यहोवाचे मार्गदर्शन, संरक्षण आणि आशीर्वाद यांवरील आपला भरवसा आणखी मजबूत करतात. आमच्याजवळ १९९७ ते २००० वर्षांपर्यंतच्या इंग्रजी भाषेतील वार्षिकपुस्तकांचा साठा उपलब्ध आहे. या वार्षिकपुस्तकांमध्ये, उरुग्वे, चेक प्रजासत्ताक, जपान, जर्मनी, पराग्वे, बेनीन, ब्राझील, ब्रिटन, मलावी, मादागास्कर, मायक्रोनेशिया व मार्टिनीकमध्ये होत असलेल्या राज्यप्रचार कार्याच्या इतिहासाची मनोरंजक माहिती दिली आहे. तुमच्या व्यक्तिगत लायब्ररीत यांपैकी कोणती वार्षिकपुस्तके नाहीत का? ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकांनी देखील, राज्य सभागृहातील लायब्ररीत या पुस्तकाच्या प्रती हव्यात की नाही ते पाहावे. प्रचारकांना अथवा मंडळ्यांना ही वार्षिकपुस्तके हवी असतील तर ते मंडळीच्या साहित्य सेवकाला त्यांची ऑर्डर देऊ शकतात.