घोषणा
◼ साहित्य सादरता मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके. पुनर्भेटीत आस्था दाखवण्यात आल्यास, वर्गणी सादर केली जाऊ शकते. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक द्यावे. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर जास्त लक्ष द्या.
◼ एप्रिल महिन्यात सहायक पायनियरिंग करू इच्छिणाऱ्या प्रचारकांनी आताच योजना आखून लवकरात लवकर आपले अर्ज द्यावेत. त्यामुळे वडिलांना क्षेत्र आणि नियतकालिकांचा आणि साहित्यांचा पुरेसा साठा तयार ठेवण्यासाठी आवश्यक योजना करता येतील. सहायक पायनियरिंगसाठी ज्यांचे अर्ज मान्य झाले आहेत अशा सर्वांची नावे मंडळीत घोषित केली जावीत.
◼ या वर्षाचा स्मारकविधी रविवार, एप्रिल ८, २००१ रोजी पार पाडण्यात येईल. या दिवशी क्षेत्र सेवेच्या सभांशिवाय इतर कुठलीही सभा होणार नाही. टेहळणी बुरूज अभ्यास दुसऱ्या कुठल्या तरी वेळी घेण्यासाठी वडिलांनी आवश्यक व्यवस्था करावी.
◼ मंडळीतल्या सर्वांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नूतनीकरण वर्गण्या तसेच त्यांच्या व्यक्तिगत वर्गण्याही मंडळीमार्फतच पाठवाव्यात.
◼ संस्था, प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्यात मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून, ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
द गाइडन्स ऑफ गॉड—आवर वे टु पॅरडाईज —मल्याळम, तामीळ
देव आपल्याकडून काय अपेक्षितो? —आसामी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम आणि हिंदी
◼ भारतात उपलब्ध नसलेली प्रकाशने:
इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स —इंग्रजी
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स (डिलक्स पॉकेट आवृत्ती; DLbi25)
न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स−(डिलक्स; DLbi12 समासातील संदर्भांसह)
मॅन्काईंड्स सर्च फॉर गॉड —इंग्रजी
सिंग प्रेझेस टू जेहोवा (मोठ्या आणि लहान आकारातील गीत पुस्तके) —इंग्रजी
रिझनिंग फ्रॉम द स्क्रिप्चर्स —इंग्रजी, तामीळ
आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित —इंग्रजी, मल्याळम आणि तामीळ
बायबल कथांचं माझं पुस्तक, लहान आवृत्ती —तामीळ
कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन —तामीळ, तेलगू
व्हेन समवन यू लव्ह डाईज —मल्याळम
रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? —हिंदी, मल्याळम, तामीळ
चर्चेसाठी बायबलचे विषय —मल्याळम
सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक —मल्याळम, तामीळ
“पहा! मी सर्व नवे करतो” —मल्याळम
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! —तामीळ