एप्रिल—‘मेहनत व परिश्रम’ करण्याचा समय
१ स्मारक विधीचा समय हा यहोवाच्या लोकांसाठी मनन करण्याचा समय असतो. या काळात आपण ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे जे काही साध्य करण्यात आले त्यावर आणि त्याने सांडलेल्या रक्तामुळे देवाकडून मिळालेल्या आशेवर मनन करतो. मागच्या वर्षाच्या एप्रिल १९ तारखेचा तुम्ही विचार करता तेव्हा कोणत्या गोष्टी तुमच्या मनात येतात? त्या संध्याकाळी तुम्हाला भेटलेल्या लोकांचे चेहरे, स्मारकविधीचे ते समृद्ध व आध्यात्मिक वातावरण, त्यावेळी केलेली गांभीर बायबल चर्चा आणि कळकळीच्या प्रार्थना तुम्हाला आठवतात का? कदाचित त्या दिवशी, यहोवाने व येशूने तुमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मनापासून कदर दाखवण्याचा तुम्ही निश्चय केला असेल. अशा प्रकारे मनन केल्याने आता तुमच्यावर कोणता परिणाम होतो?
२ यहोवाचे लोक केवळ शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत नाहीत हे स्पष्टपणे दिसून येते. (कलस्सै. ३:१५, १७) गेल्या एप्रिलमध्ये ख्रिस्ती सेवेत अधिक वेळ खर्च करून आपण यहोवाने उद्धाराकरता केलेल्या तरतूदींप्रती आपली कृतज्ञता दर्शवली होती. त्या महिन्यात शेकडो बांधवांनी सहायक पायनियरिंग सेवा केली. आणि ही संख्या भारतात त्या आधीच्या वर्षात गाठलेल्या उच्चांकापेक्षा ३४ टक्क्यांनी जास्त होती. इतर राज्य प्रचारकांसह या पायनियरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे क्षेत्र सेवेच्या तासांत, मासिक वितरणात आणि पुनर्भेटींत नवीन उच्चांक गाठण्यात आले. हजारो बायबल अभ्यास चालू झाल्याचे आणि स्मारक विधीची अभूतपूर्व उपस्थिती पाहून आमचा आनंद द्विगुणीत झाला होता!
३ आपल्या खात्रीलायक आशेमुळे खरोखरच आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा मिळते. प्रेषित पौलाने लिहिले त्याप्रमाणे: “ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करितो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेविली आहे.”—१ तीम. ४:१०.
४ या स्मारक विधीच्या महिन्यांत, यहोवाने केलेल्या जीवनदायक तरतुदींवर तुम्ही आपला विश्वास कसा दर्शवाल? गेल्या एप्रिल महिन्यात, भारतात राज्य प्रचारकांची संख्या आजपर्यंत नोंदण्यात आलेल्या सर्वाधिक संख्येच्या खालोखाल होती. या एप्रिल महिन्यात ही संख्या आपल्याला पार करता येईल का? प्रयत्न केल्यास जरूर करता येईल. पण, त्यासाठी प्रत्येक बाप्तिस्माप्राप्त आणि बाप्तिस्मारहित प्रचारकाला सेवाकार्यात सहभाग घेणे आवश्यक आहे. अनेक नवीन लोक देखील सहभाग घेण्यास योग्य ठरू शकतात. यास्तव, या एप्रिल महिन्यात क्षेत्रात मेहनत व परिश्रम करण्याच्या योजना आखताना इतर प्रचारकांना तसेच नवीन आणि अल्पानुभवी लोकांनाही आपल्यासोबत क्षेत्रात कार्य करण्याचे उत्तेजन कसे द्याल त्यावर विचार करा.
५ अनियमित झालेल्यांना पुन्हा उत्साही होण्यास मदत करणे: एखाददोन महिने क्षेत्र सेवेला न आलेले कोणी तुमच्या माहितीत असतील तर तुम्ही त्यांना उत्तेजन देऊ शकता आणि तुमच्यासोबत क्षेत्र कार्यात सहभाग घेण्याचे त्यांना आमंत्रण देऊ शकता. मंडळीत काहीजण अक्रियाशील झाले असतील तर वडीलजन त्यांना भेटण्याचा खास प्रयत्न करतील आणि एप्रिल महिन्यापासून पुन्हा सक्रिय बनण्याचे उत्तेजन देतील.
६ यहोवाची सेवा करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण सर्वांनी यहोवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागत राहिला पाहिजे. (लूक ११:१३) हा आत्मा मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? देवाचे प्रेरित वचन वाचले पाहिजे. (२ तीम. ३:१६, १७) तसेच, दर आठवडी होणाऱ्या पाचही सभांना उपस्थित राहून “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो” ते देखील आपण ऐकले पाहिजे. (प्रकटी. ३:६) अनियमित आणि अक्रियाशील झालेल्यांना बायबल अभ्यासाच्या सवयी सुधारण्यास आणि नियमितपणे सभांना उपस्थित राहण्यास मदत करण्याचा हा योग्य समय आहे. (स्तोत्र ५०:२३) अर्थात, असे करत असताना आपल्या स्वतःच्या आध्यात्मिकतेकडे देखील लक्ष देणे जरूरीचे आहे. पण, यासोबतच आणखी एका गोष्टीची गरज आहे.
७ प्रेषित पेत्राने म्हटले, की देव त्याच्या “आज्ञा पाळणाऱ्यांना” पवित्र आत्मा देतो. (प्रे. कृत्ये ५:३२) या आज्ञांचे पालन करण्यात, ‘लोकांना उपदेश [प्रचार] करून साक्ष देण्याची’ आज्ञा पाळणे देखील सामील आहे. (प्रे. कृत्ये १:८; १०:४२) प्रचार कार्य करण्यास आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्तीची गरज आहे हे खरे आहे; पण जेव्हा आपण यहोवाला आनंदी करण्याची इच्छा असल्याचे आपल्या कृतींतून दाखवू लागतो तेव्हा तोही आपल्याला अधिक मदत करतो हे देखील खरे आहे. तेव्हा, स्वेच्छेने आज्ञा पाळण्याकरता ती सुरवातीची पावले उचलण्याचे महत्त्व आपण कदापि कमी लेखू नये.
८. आपल्या लहानग्यांना मदत करणे: पालकांनो, तुमच्या मुलांना इतरांबरोबर सत्याविषयी बोलण्याची इच्छा असल्याचे तुमच्या लक्षात आले आहे का? ते तुमच्यासह क्षेत्र सेवेत येतात का? त्यांचे आचरण अनुकरणीय आहे का? या सर्व प्रश्नांना तुमचे होय असे उत्तर आहे तर उशीर का करावा? मंडळीतील सेवा समितीच्या एखाद्या बांधवाशी बोला आणि या एप्रिल महिन्यात तुमचे मूल प्रचारक बनण्यास योग्य आहे की नाही ते पाहा. (आमची सेवा पुस्तक, पृष्ठे ९९-१००.) स्मारक विधीच्या या काळात यहोवाची स्तुती करण्यात तुमची मुले मोठ्या प्रमाणात योगदान करू शकतात याची जाणीव असू द्या.—मत्त. २१:१५, १६.
९ अमेरिकेतील जॉर्जिया शहरातील एक ख्रिस्ती स्त्री नेहमीच आपल्या मुलीला इतरांसोबत यहोवाविषयी बोलण्याचे उत्तेजन देत असे. गेल्या वर्षी आपल्या आईसह क्षेत्र सेवा करता असताना या मुलीने एका गृहस्थाला अपेक्षा माहितीपत्रक दिले आणि आतील विषय सूची दाखवून त्याला थोडक्यात माहिती दिली. गृहस्थाने तिला विचारले: “तू किती वर्षांची आहेस?” तिने म्हटले “सात.” या चिमुरडीने दिलेला हा अर्थपूर्ण राज्य संदेश ऐकून तो चकित झाला. कारण, लहानपणी तो स्वतः यहोवाच्या साक्षीदारांच्या सहवासात वावरत असे. पण, बायबलचे सत्य त्याने कधीच मनावर घेतले नव्हते. लवकरच या गृहस्थाबरोबर आणि त्याची पत्नी व मुलगी यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.
१० अगदी लहान वयातच प्रचारक झालेल्यांची उदाहरणे आपल्याजवळ आहेत; त्यांच्यासोबत सेवा करण्याचा आनंद खरोखरच अनोखा आहे. हे लहानगे आपल्या वयाच्या इतर मुलांना प्रोत्साहन देऊ शकतात. पण, एप्रिल महिना हा प्रत्येक कुटुंबासाठी आपले कौटुंबिक बंधन दृढ करण्याचा आणि संपूर्ण कुटुंब या नात्याने एकत्र सेवा करून आध्यात्मिक उन्नती करण्याचा देखील समय आहे. आणि या बाबतीत कुटुंब प्रमुखाने पुढाकार घेतला पाहिजे.—नीति. २४:२७.
११ नवोदितांना मदत करणे: तुम्ही ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करता त्या नवोदितांबद्दल काय? एप्रिल महिन्यातील या खास प्रयत्नांत तेसुद्धा योगदान देऊ शकतात का? ज्ञान पुस्तकातील २ ऱ्या अध्यायाच्या २२ व्या परिच्छेदाची किंवा मग ११ व्या अध्यायाच्या १४ व्या परिच्छेदाची चर्चा केल्यानंतर कदाचित त्यांनी शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याची इच्छा व्यक्त केली असावी. ज्ञान पुस्तकाचा त्यांचा अभ्यास जवळजवळ संपत आला असेल तर १८ व्या अध्यायातील ८ वा परिच्छेद हाताळताना या गोष्टीवर स्पष्टपणे चर्चा करण्याची तयारी असू द्या. त्या परिच्छेदात असे म्हटले आहे: “तुम्ही जे शिकता ते तुम्हाला तुमचे नातेवाईक, मित्र व इतरांना कदाचित सांगावेसे वाटेल. जसे येशूने अनौपचारिक स्थितीमध्ये सुवार्तेची सहभागिता केली तसे तुम्ही खरे पाहता हे करत असाल. (लूक १०:३८, ३९; योहा. ४:६-१५) आता तुमची अधिक करण्याची इच्छा असेल.” तुम्ही ज्यांच्याबरोबर बायबल अभ्यास करता त्यांच्या बाबतीत हे दिसून येते का?
१२ तुमच्या बायबल विद्यार्थ्याचा देवाच्या वचनावर विश्वास आहे का? तो बायबल तत्त्वांचे पालन करत आहे का? त्याने देवाच्या दर्जांनुरूप जगण्यासाठी जीवनात आवश्यक बदल केले आहेत का? तो मंडळीच्या सभांना उपस्थित राहतो का? त्याला यहोवा देवाची सेवा करण्याची इच्छा आहे का? तसे असेल तर त्याला मंडळीतल्या वडिलांशी बोलण्याचे उत्तेजन द्या. त्यामुळे तो बाप्तिस्मारहित प्रचारक या नात्याने एप्रिल महिन्यात तुमच्यासोबत क्षेत्र सेवा करण्यास योग्य आहे की नाही हे वडिलांना ठरवता येईल. (आपली सेवा पुस्तक, पृष्ठे ९७-९.) अशाप्रकारे, यहोवाची सेवा करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यहोवाची संघटना कशाप्रकारे पाठबळ देईल हे तो स्वतः अनुभवू शकेल.
१३ हे खरे आहे, की काही बायबल विद्यार्थी इतरांपेक्षा अधिक वेगाने प्रगती करतील. जून २००० च्या आमची राज्य सेवा अंकाच्या पृष्ठ ४, परिच्छेद ५-६ मधील सूचनांनुसार, ज्या लोकांनी सुरवातीला आस्था दाखवली पण सक्रिय सहवास राखण्याकरता त्यांना अधिक मदतीची गरज होती अशांसोबत अनेकजण दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास करत आहेत. हे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक ‘थोड्या किंवा फार समयात’ ख्रिस्ताचे खरे शिष्य बनतील ही आशा मात्र आपण सोडत नाही. (प्रे. कृत्ये २६:२९) तुम्ही ज्यांच्याबरोबर बायबल अभ्यास करत आला आहात ते ‘फार समय’ या वर्गात मोडत असतील तर स्मारक विधीच्या या काळात ख्रिस्ताच्या खंडणीबद्दल गहिरी कृतज्ञता दाखवायला सुरवात करण्याची त्यांच्यासाठी ही चांगली संधी ठरू शकेल का?
१४ सहभाग घेण्यास त्यांना कशी मदत केली जाऊ शकते: येशूने इतरांना सेवा कार्य करण्याचे जे प्रशिक्षण दिले त्याचे परीक्षण केल्याने, सेवेत सहभाग घेण्यास योग्य असलेल्यांना कशी मदत केली जाऊ शकते त्याची माहिती आपल्यालाही मिळू शकेल. लोकांचा मोठा घोळका पाहून आपल्या शिष्यांना त्यांच्याशी बोलण्यास येशूने सांगितले नाही. त्याने आधी त्यांना प्रचार कार्याचे महत्त्व पटवून दिले; प्रार्थनाशील मनोवृत्ती राखण्याचे उत्तेजन दिले आणि त्यांच्यासाठी तीन प्रमुख तरतुदी करून दिल्या: एक सोबती, क्षेत्र आणि संदेश. (मत्त. ९:३५-३८; १०:५-७; मार्क ६:७; लूक ९:२, ६) तुम्ही देखील असेच करू शकता. तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या नवीन विद्यार्थ्याला अथवा काही अनियमित झालेल्यांना मदत करणार असाल तर पुढील उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खास प्रयत्न करणे उचित ठरेल.
१५ सेवेचे महत्त्व पटवून द्या: प्रचाराचे कार्य किती महत्त्वपूर्ण आहे ते व्यक्तीला पटवून द्या. आधी तुम्ही स्वतः सेवेबद्दल आनंदी मनोवृत्ती बाळगा. सेवाकार्यात मंडळी जे काही साध्य करत आहे त्याबद्दलचे काही अनुभव सांगा. मत्तय ९:३६-३८ मध्ये येशूने जी मनोवृत्ती व्यक्त केली तीच मनोवृत्ती दाखवा. भावी प्रचारकाला किंवा अक्रियाशील झालेल्या व्यक्तीला, सेवा कार्यात तो घेणार असलेल्या सहभागाविषयी आणि जगभरातील कार्य यशस्वी होण्याविषयी प्रार्थना करण्याचे उत्तेजन द्या.
१६ साक्ष देण्याजोग्या अनेक संधींचा विचार करण्यास सांगा: पुस्तक अभ्यास गटाबरोबर घरोघरचे साक्षकार्य करण्याच्या शक्यतेचा उल्लेख करा. नातेवाईकांबरोबर आणि परिचित व्यक्तींबरोबर किंवा जेवणाच्या सुटीत सहकर्मचाऱ्यांबरोबर अथवा शाळकरी मित्रांबरोबर संभाषण करण्याचे विद्यार्थ्याला सुचवा. सार्वजनिक वाहतुकींतून प्रवास करताना इतर प्रवाशांशी सहज संभाषण सुरू करणे शक्य आहे, यासाठी केवळ त्यांच्याबद्दल वैयक्तिक आस्था दाखवण्याची गरज आहे. आपण पुढाकार घेतो तेव्हा सहसा एक उत्तम साक्ष देण्याची संधी मिळते. होय, इतरांना आपली आशा सांगण्याच्या अनेक संधी “प्रतिदिवशी” आपल्याला मिळतात.—स्तोत्र ९६:२, ३.
१७ असे असले तरी तुम्हाला आणि नव्या प्रचारकाला, होता होईल तितक्या लवकर घरोघरच्या कार्यात सहभाग घेणे श्रेयस्कर ठरेल. एप्रिल महिन्यात जास्त वेळ सेवेत खर्च करण्याचा निर्धार तुम्ही केला असेल तर तुमच्यासाठी सोयीस्कर ठरेल असे एखादे क्षेत्र नेमून देण्याची क्षेत्र सेवकाला विनंती करा. हे शक्य झाल्यास ते क्षेत्र पूर्णपणे उरकण्याची तुम्हाला संधी मिळेल. उदाहरणार्थ, क्षेत्र सेवा झाल्यावर क्षेत्रातून बाहेर पडताना अथवा सभांना किंवा इतर कामानिमित्त येता-जाता, ज्या घरात तुम्हाला आधी कोणीच भेटले नव्हते किंवा जिथे थोडीफार आस्था दाखवण्यात आली होती त्या घरात कोणी असल्याचे कदाचित तुम्हाला दिसून येईल. योग्य असल्यास, अशा लोकांना सगळ्यात परिणामकारक ठरेल त्या वेळी संक्षिप्त भेट द्या. अशारितीने, आपल्याला नेमलेले काम पूर्ण केल्याचे समाधान आणि आनंद तुम्हाला मिळेल.
१८ एक प्रभावी संदेश तयार करणे: एखाद्याला राज्याचा संदेश इतरांना सांगण्याची इच्छा तर असेल, पण नवीन असल्यामुळे किंवा बऱ्याच काळापासून क्षेत्र सेवेला न गेल्यामुळे त्याला आत्मविश्वास वाटत नसेल. म्हणूनच, नवोदितांना आणि अक्रियाशील झालेल्यांना उत्तम तयारी करण्यास मदत करणे आवश्यक आहे. सेवा सभा आणि क्षेत्र सेवेच्या सभा यांतून आपल्याला उपयुक्त मार्गदर्शन मिळू शकते हे मान्य आहे. तरीपण वैयक्तिकपणे तयारी करण्याला पर्याय नाही.
१९ तुम्ही नवोदितांना सेवेकरता तयारी करण्यास कशी मदत करू शकता? त्यासाठी, एखाद्या नियतकालिकाच्या प्रस्तावनेची तयारी करण्यापासून सुरवात करा. ही प्रस्तावना साधी आणि संक्षिप्त ठेवा! बातम्यांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या अशा काही घटनांचा त्यांना विचार करायला सांगा ज्यात क्षेत्रातील लोकांना अधिक रस असेल. आणि मग, त्या घटनांशी संबंधित एखादा मुद्दा चालू अंकांतून दाखवा. मग, दोघे मिळून त्या प्रस्तावनेचा सराव करा आणि शक्य तितक्या लवकर क्षेत्रात त्याचा उपयोग करा.
२० स्मारक विधीला आलेल्या लोकांना प्रगती करण्यास मदत करा: गेल्या वर्षी जगभरात स्मारक विधीची उपस्थिती १ कोटी ४८ लाखांहून अधिक होती. आणि प्रचारक या नात्याने ज्यांनी क्षेत्र सेवा अहवाल दिला त्यांची संख्या केवळ ६० लाखांपेक्षा थोडी जास्त होती. याचा अर्थ, जवळजवळ ८८ लाख असे आस्थेवाईक लोक आहेत जे वेळ काढून बायबलच्या एका महत्त्वाच्या विषयाचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी या खास सभेला आले. सभेला आल्यामुळे त्यांना वैयक्तिकपणे काही बांधवांशी भेटता आले. याचा त्यांच्यावर बहुधा चांगलाच प्रभाव पडला असावा. त्यांपैकी अनेकजण आपल्याविषयी फार आदराने बोलतात, आपल्या जागतिक कार्यासाठी अनुदान देतात आणि इतरांसमोर आपले समर्थन करतात. आस्थेवाईक लोकांचा हा मोठा गट भविष्यातील वाढीस सूचित करतो. तेव्हा, अधिक प्रगती करण्यासाठी आपण त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतो?
२१ स्मारक विधीला उपस्थित राहणारे अधिकतर लोक, आपल्यापैकी कोणी ना कोणी त्यांना वैयक्तिकपणे आमंत्रण दिले होते म्हणून उपस्थित होते. याचा अर्थ, असा होतो की, श्रोत्यांमधील निदान एका व्यक्तीला तरी ते वैयक्तिकपणे ओळखतात. आपण दिलेल्या आमंत्रणामुळे कोणी उपस्थित राहतो तेव्हा त्या ठिकाणी त्याचे स्वागत करणे आणि कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घेण्यास त्याची मदत करणे ही आपली जबाबदारी असते. सभागृह कदाचित भरलेले असेल, तेव्हा त्या नवीन व्यक्तीला जागा मिळण्यास मदत करा. त्याला बायबल द्या. आणि गीत गाताना तुमचे गीतपुस्तक त्याला दाखवा. त्याला काही प्रश्न असल्यास उत्तरे द्या. तुम्ही त्याच्याबद्दल दाखवत असलेल्या वैयक्तिक आस्थेमुळे सत्याबद्दल अधिक जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढेल. अर्थात, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, की एखादी नवीन व्यक्ती आपल्याला आढळल्यास आपण तिचे हार्दिक स्वागत केले पाहिजे व परिचय करून घेण्यासाठी त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलले पाहिजेत.
२२ स्मारक विधीची उपस्थिती पाहून एखाद्याच्या मनावर विलक्षण परिणाम पडू शकतो. तो सभांना आला याचाच अर्थ, तो जे काही शोधत आहे ते दुसरीकडे त्याला सापडलेले नाही आणि आपल्याजवळ असे काहीतरी आहे ज्याचे जवळून परीक्षण करण्याची त्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, यहोवाच्या असीम प्रेमाविषयी कधीही विचार न केलेल्या नवीन व्यक्तीसाठी खंडणीच्या अद्भुत तरतुदीचे स्पष्टीकरण म्हणजे एक गहन प्रकटीकरण ठरू शकते. आपण किती वेगळे आहोत अर्थात, किती प्रांजळ, मैत्रीपूर्ण, प्रेमळ आणि आदरपूर्ण आहोत हे चटकन त्याच्या लक्षात येईल. चर्चेसमध्ये त्याने पाहिलेल्या मूर्ती आणि अर्थशून्य विधी त्याला आपल्या सभागृहात आढळणार नाहीत. तसेच, श्रोत्यांमध्ये निरनिराळ्या पार्श्वभूमीतून आलेले लोक आहेत; शिवाय, दान गोळा केले जात नाही हे देखील नवीन लोकांच्या पटकन लक्षात येते. या गोष्टींमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तीला पुन्हा सभागृहात येण्याची जबरदस्त प्रेरणा मिळू शकते.
२३ स्मारक विधीनंतर, उपस्थित राहिलेल्या नवीन व्यक्तीला लगेच भेट देऊन त्यांना प्रगती करण्यास मदत करण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला आमंत्रण दिले असल्यास त्यांना मदत करण्याची तुमच्यावर खास जबाबदारी आहे. तेथून निघण्याआधी त्यांना राज्य सभागृहात होणाऱ्या इतर सभांची कल्पना आहे याची खात्री करा. पुढच्या जाहीर भाषणाचा विषय त्यांना सांगा. त्यांच्या घराजवळ असलेल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटाची अचूक वेळ आणि स्थान त्यांना सांगा. मग, त्यांना पहा! माहितीपत्रक द्या आणि “यहोवाने केलेली निर्मिती व चमत्कार” या पोटमथळ्यापासून एप्रिल ३० च्या सप्ताहात पुढे चर्चा केली जाईल ते सांगा. लवकरच होणाऱ्या विभागीय संमेलनास किंवा खास संमेलन दिवसास उपस्थित राहण्याची योजना संपूर्ण मंडळी का करत आहे याविषयी समजावून सांगा.
२४ त्यांच्या घरी मैत्रीपूर्ण भेट देण्याची व्यवस्था करा. त्यांच्याजवळ अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक आहे याची खात्री करा. कारण या प्रकाशनांमार्फतच त्यांना बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचा परिचय होऊ शकतो. ते अद्याप अभ्यास करत नसतील तर त्यांना बायबल अभ्यास करण्यास आवडेल का असे विचारा. त्यांना यहोवाचे साक्षीदार माहितीपत्रक वाचण्याचे सुचवा. या माहितीपत्रकात आपण एक संघटना या नात्याने कसे कार्य करतो याची स्पष्ट माहिती दिली आहे. आवर होल असोसिएशन ऑफ ब्रदर्स यासारखे व्हिडिओ पाहण्याचे आमंत्रण त्यांना द्या. मंडळीतील इतरांशी आणि खासकरून जवळपास राहणाऱ्या कुटुंबांशी त्यांची भेट करून देण्याची व्यवस्था करा. येणाऱ्या महिन्यांत त्यांच्याशी संपर्क राखा आणि विभागीय पर्यवेक्षक मंडळीला भेट देतात किंवा प्रांतीय अधिवेशन असते तेव्हा त्यांना सभांना येण्याचे आमंत्रण द्या. “सार्वकालिक जीवनाकडे योग्य कल असलेले” असे दाखवून देण्यासाठी प्रत्येक संधी त्यांना द्या.—प्रे. कृत्ये १३:४८.
२५ वडील काय करू शकतात: येत्या एप्रिल महिन्यात सेवेत एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे यश बऱ्याच प्रमाणात वडिलांवर अवलंबून आहे. तुम्ही पुस्तक अभ्यास संचालक असल्यास तुमच्या पुस्तक अभ्यास गटातील प्रत्येक व्यक्तीला या खास कार्यांमध्ये सहभाग घेता यावा म्हणून काय-काय करता येण्यासारखे आहे याची यादी करा. तुमच्या गटात कोणी लहान, नवीन, अनियमित अथवा अक्रियाशील आहे का? मग, यांना मदत करण्यासाठी त्यांच्या पालकांनी अथवा इतर प्रचारकांनी पुढाकार घेतला आहे का ते पाहा. तुम्हाला जी काही वैयक्तिक मदत देता येईल ती त्यांना द्या. दोन वर्षांपासून अनियमित असलेल्या एका बहिणीने गेल्या एप्रिल महिन्यात ५० तास सेवेत खर्च केले. कशामुळे तिला हे शक्य झाले? वडिलांच्या उत्तेजनात्मक मेंढपाळ भेटींमुळे हे शक्य झाले असे तिने म्हटले.
२६ येणाऱ्या महिन्यासाठी पुरेसे क्षेत्र, नियतकालिके आणि प्रकाशने उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी वडिलांनी आणि सेवा सेवकांनी सहकार्य करावे. क्षेत्र सेवेसाठी अतिरिक्त सभांची व्यवस्था केली जाऊ शकते का? असल्यास, या खास व्यवस्थेची मंडळीला कल्पना द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मंडळीच्या आणि वैयक्तिक प्रार्थनांमध्ये एप्रिल महिन्यात अधिक राज्य कार्य करण्याकरता यहोवाच्या आशीर्वादांसाठी विनंती करा.—रोम. १५:३०, ३१; २ थेस्सलनी. ३:१.
२७ गेल्या एप्रिल महिन्यात उत्तर कॅरोलायनामधील एका मंडळीत अधिकतर कार्य करण्यासाठी वडिलांनी खरोखरच सर्वांना खूप उत्तेजन दिले होते. आपल्याला सहायक पायनियरिंग करता येईल का याचा प्रार्थानापूर्वक विचार करण्याचे त्यांनी दर आठवडी होणाऱ्या सभांमध्ये प्रचारकांना उत्तेजन दिले. प्रत्येक वेळी त्या मंडळीतील सर्व वडील आणि सेवा सेवक एप्रिल महिना एक अभूतपूर्ण महिना बनवण्याविषयी अगदी उत्साहाने बोलायचे. याचा परिणाम असा झाला, की मंडळीतील सर्व वडील आणि सेवा सेवक यांच्यासह ५८ टक्के प्रचारकांनी त्या महिन्यात पायनियरिंग केली!
२८ पूर्णार्थाने सहभाग घेण्याचा आनंद: सेवेत ‘मेहनत व परिश्रम’ केल्याने आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात? (१ तीम. ४:१०) गेल्या एप्रिलमध्ये आपल्या मंडळीने केलेल्या आवेशपूर्ण कार्याविषयी बोलताना वर उल्लेख केलेल्या वडिलांनी म्हटले: “बांधव क्षेत्र सेवेत अधिकाधिक कार्य करू लागले तेव्हापासून त्यांना आपल्या बंधूभगिनींविषयी किती प्रेम आणि जवळीक वाटते याविषयी ते अगदी भरभरून बोलतात.”
२९ फार चालणे फिरणे शक्य नसलेल्या एका तरुण बांधवाला गेल्या एप्रिल महिन्यातील खास कार्यात सहभाग घेण्याची उत्कट इच्छा होती. काळजीपूर्वक समायोजन करून तसेच आपल्या आईच्या व आध्यात्मिक बांधवांच्या मदतीने त्याने सहायक पायनियरिंग केले आणि त्याच्यासाठी हा महिना फार फलदायक ठरला. या अनुभवाबद्दल त्याला काय वाटले? त्याने म्हटले: “आयुष्यात पहिल्यांदाच मला एका धडधाकट मनुष्यासारखं वाटलं.”
३० यहोवाच्या राज्यपदाविषयी इतरांशी बोलण्याचा विशेषाधिकार एक बहुमान आहे असे मानणाऱ्या व्यक्तीला यहोवा समृद्धपणे आशीर्वादित करतो यात शंका नाही. (स्तोत्र १४५:११, १२) आपल्या प्रभूच्या मृत्यूचे स्मरण करताना आपल्याला याची जाणीव आहे की ईश्वरी भक्तीचे आशीर्वाद भविष्यात याहून अधिक असतील. प्रेषित पौलाला अनंतकालिक जीवनाच्या प्रतिफळाची उत्कंठा होती. पण, हाताची घडी घालून बसून आशा धरली म्हणजे आपोआप अनंतकालिक जीवन मिळणार नाही हे पौलाला माहीत होते. त्याने लिहिले: “ह्याकरिता त्याची जी शक्ति माझ्या ठायी जोराने कार्य चालवित आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.” (कलस्सै. १:२९) एक जीवनदायी कार्य साध्य करण्यासाठी यहोवाने येशूमार्फत पौलाला शक्ती दिली, आणि हीच शक्ती तो आपल्यालाही नक्कीच देऊ शकतो. एप्रिल महिन्यात तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा आहे का?
[३ पानांवरील चौकट]
एप्रिल महिन्यात प्रचारक होण्यासाठी तुम्ही कोणाला उत्तेजन देऊ शकता?
तुमच्या मुलाला?
बायबल विद्यार्थ्याला?
अक्रियाशील झालेल्या एखाद्याला?