वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०० पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२०००
km ८/०० पृ. ७

घोषणा

◼ ऑगस्ट महिन्याकरता साहित्य सादरता: पुढील कोणतेही ३२ पृष्ठांचे ब्रोशर सादर केले जाऊ शकते: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्‌स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: लाईफ—हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्हल्यूशन ऑर बाय क्रिएशन? ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! चे अंक. पुनर्भेट करताना एखाद्या व्यक्‍तीला आस्था असल्याचे आढळल्यास वर्गणी करण्याचे प्रोत्साहन द्यावे. नोव्हेंबर: किंग्डम न्यूज क्र. ३६, “नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?” या पत्रिकेचे वितरण. प्रत्येक घरात किंग्डम न्यूज क्र. ३६ देताना अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक द्यावे. लोकांजवळ आधीपासूनच यांपैकी एखादे प्रकाशन असल्यास अनंतकाळ जगा किंवा क्रिएशन पुस्तक तुम्ही देऊ शकता.

◼ मंडळीच्या प्रिसायडिंग ओव्हरसियरने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने सप्टेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

◼ प्रत्येक मंडळीला २००१ सेवा वर्षात उपयोगात आणण्याकरता फॉर्म्सचा पुरेसा साठा लवकरच पाठवला जाईल. कृपया या फॉर्म्सचा जपून वापर करावा. प्रत्येक फॉर्म ज्या उद्देशाकरता आहे केवळ त्याच उद्देशाकरताच वापरावा.

◼ ऑगस्ट ३१, २००० किंवा त्यानंतर लवकरात लवकर लिटरेचर व मासिकांची वार्षिक मोजणी केली जावी. ही वार्षिक मोजणी दर महिन्यात लिटरेचर कोऑर्डिनेटर जी मोजणी करतात त्यासारखीच आहे. एकूण संख्या लिटरेचर इन्वेन्टरी फॉर्मवर (S(d)-18) भराव्यात. मासिकांची एकूण संख्या, लिटरेचर ग्रूपमध्ये असणाऱ्‍या प्रत्येक मंडळीचे मॅगझीन सर्व्हंट सांगू शकतील. प्रत्येक कोऑर्डिनेटिंग मंडळीला तीन लिटरेचर इन्वेन्टरी फॉर्म्स (S(d)-18) पाठवले जातील. यांपैकी ओरिजिनल फॉर्म भरून कृपया सप्टेंबर ६ च्या आत संस्थेला पाठवावा. फॉर्मची कार्बन प्रत मंडळीच्या फाईलसाठी ठेवावी. तिसरी प्रत वर्क शीट म्हणून वापरू शकता. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सेक्रेटरीने इन्वेन्टरीची तपासणी करावी. कोऑर्डिनेटिंग मंडळीच्या सेक्रेटरी व प्रिसायडिंग ओव्हरसियरने फॉर्मवर सह्‍या कराव्यात.

◼ ऑगस्ट २४, २००० पासून ऑगस्ट ३१, २००० पर्यंत संस्थेजवळ लोणावळा बेथेलमध्ये असलेल्या सर्व लिटरेचरची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाईल. या दरम्यान कोणत्याही मंडळीच्या लिटरेचर रिक्वेस्ट्‌स पाठवल्या जाणार नाहीत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा