वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०० पृ. ५-६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—२०००
आमची राज्य सेवा—२०००
km ८/०० पृ. ५-६

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत मे १ ते ऑगस्ट २१, २००० पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:

१. एफ्राइमी पुरुष संतापून बोलले तेव्हा गिदोनाने दिलेल्या उत्तरातून त्याचा सौम्यपणा व नम्रता दिसून आली आणि यामुळे त्यांच्या खोट्या आरोपांकडे दुर्लक्ष होऊन शांती प्रस्थापित झाली. (शास्ते ८:१-३) [साप्ताहिक बायबल वाचन]

२. “आपण देवाला पाहिले आहे” असे मानोहाने म्हटले, पण खरे तर त्याने व त्याच्या पत्नीने स्वतः यहोवाला नव्हे तर त्याच्या वतीने बोलणाऱ्‍या देवदूताला पाहिले होते. (शास्ते १३:२२) [साप्ताहिक बायबल वाचन; w८८ ५/१५ पृ. २३ परि. ३]

३. आपला पती आपला आदर करतो आणि आपल्यावर प्रेम करतो हे त्याच्या वागण्याबोलण्यातून दिसून यावे हे जसे एका पत्नीला वाटते त्याचप्रकारे पतीलाही अशी अपेक्षा असते की पत्नीने तिच्या वागण्याबोलण्यातून त्याला आदर दाखवावा. [kl-MR पृ. १४४ परि. १२]

४. प्रार्थनेत आपण सर्वात आधी आपल्या गरजांबद्दल उल्लेख केला पाहिजे. [kl-MR पृ. १५५ परि. १३]

५. शास्ते २१:२५ हे वचन एका अशा काळाबद्दल सांगते जेव्हा यहोवाने इस्राएल राष्ट्राला कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शनाशिवाय सोडून दिले होते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR९५ ६/१५ पृ. २२ परि. १६]

६. कराराच्या कोशावर असलेले करूब यहोवाच्या उपस्थितीचे प्रतीक होते; यहोवा “करूबारूढ असतो” [किंवा, “करूबांच्या मध्ये असतो,” तळटीप, NW] असे त्याविषयी म्हटले आहे. (१ शमु. ४:४) [साप्ताहिक बायबल वाचन; w८० ११/१ पृ. २९ परि. २.]

७. शौलाच्या सैनिकांनी एकदा नाईलाजास्तव रक्‍तासहित मांस खाल्ले तरीही त्यांना शिक्षा देण्यात आली नाही, यावरून हेच दिसते की एखाद्या व्यक्‍तीचे जीवन धोक्यात असेल तर तेवढ्यापुरते देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष केल्यास हरकत नाही. (१ शमु. १४:२४-३५) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR९४ ४/१५ पृ. ३१ परि. ७-९.]

८. “मन वळवणे” या शब्दाचा काही लोक चलाखीने एखाद्याला कह्‍यात घेणे असा अर्थ घेतात, पण खरे पाहता याचा मूलभूत अर्थ सकारात्मक आहे जसे पटवून सांगणे, सबळ तर्कशुद्ध गोष्टींनी एखाद्याचे विचार बदलणे. (२ तीम. ३:१४, १५) [MR९८ ५/१५ पृ. २१ परि. ४]

९. “जिवंतांच्या समूहात” [“जिवाच्या गाठोड्यात” पं.र.भा.] ही उक्‍ती देवाकडून मिळणाऱ्‍या संरक्षणाला सूचित करते; दाविदाने देवाच्या नजरेत रक्‍तपाताचा दोषी बनण्यापासून स्वतःला वाचवले तर तो देखील देवाकडून त्याच्या जिवाच्या संरक्षणाची अपेक्षा करू शकत होता. (१ शमु. २५:२९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR९२ ५/१ पृ. ११ परि. ३.]

१०. २ शमुवेल ७:१६ येथे देवाने दाविदासोबत केलेल्या राज्याच्या कराराविषयी जे सांगण्यात आले आहे त्यावरून, मशिहा बनणार असलेले अब्राहामाचे संतान नेमक्या कोणत्या घराण्यातून उत्पन्‍न होईल हे स्पष्ट झाले आणि हे एक कायदेशीर आश्‍वासन होते की दाविदाच्या घराण्यातून आलेल्या या संतानाचे राज्य ‘कायमचे स्थापित होईल.’ [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR९० २/१ पृ. १४ परि. २१-पृ. १५ परि. २२.]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. स्तोत्र ३४:१८ येथे कोणते आश्‍वासन देण्यात आले आहे? [w-MR९८ ४/१ पृ. ३१ परि. २]

१२. योसेफाला बर्णबा का म्हटले जायचे? (प्रे. कृत्ये ४:३६) [w-MR९८ ४/१५ पृ. २० परि. ३ तळटीप]

१३. एलीने यहोवापेक्षा आपल्या पुत्रांचा अधिक आदर केला असे बायबलमध्ये का म्हटले आहे? (१ शमु. २:१२, २२-२४, २९) [साप्ताहिक बायबल वाचन, पाहा w-MR९६ ९/१५ पृ. १३ परि. १४.]

१४. ‘आपल्या गरजा काय आहेत हे मागण्यापूर्वीच जर देव जाणून आहे’ तर मग मदतीकरता प्रार्थना का करावी? [kl-MR पृ. १५१ परि. ४]

१५. १ शमुवेल १:१-७ या वचनांतून स्पष्ट होते त्याप्रमाणे शमुवेलाच्या कुटुंबाने कोणता अनुकरणीय आदर्श मांडला? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९८ ३/१ पृ. १६ परि. १२.]

१६. “द्रव्याचा मोह” एका व्यक्‍तीला कशाप्रकारे भुलवू शकतो? (मत्त. १३:२२) [w-MR९८ ५/१५ पृ. १५ परि. १]

१७. वयाने मोठा असलेल्या योनाथानने देवाचा अभिषिक्‍त असलेल्या दाविदाबद्दल आदर कशाप्रकारे दाखवला व आज हे कशास सूचित करते? (१ शमु. १८:१, ३, ४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा wMR८९ ६/१ पृ. २४, २६ परि. ४, १३.]

१८. ईयोब ‘सात्विक व सरळ’ होता तरीसुद्धा तो परिपूर्ण नव्हता हे ईयोबच्या पुस्तकात कशाप्रकारे दाखवण्यात आले आहे? (ईयो. १:८) [w-MR९८ ५/१ पृ. ३१ परि. १]

१९. “नेटाने यत्न करा,” असे कोणत्या अर्थाने म्हटले आहे? (लूक १३:२४) [w-MR९८ ६/१५ पृ. ३१ परि. १, ४]

२०. इतरांसोबत कार्य करत असताना, २ शमुवेल १२:२६-२८ येथे आढळणारा कोणता अतिमहत्त्वपूर्ण धडा आपण मनापासून पाळला पाहिजे? [साप्ताहिक बायबल वाचन wMR९३ १२/१ पृ. ११ परि. १९.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. निष्ठा विवाहाला _________________________ व _________________________ देते. [kl-MR पृ. १४१ परि. ६]

२२. सा. यु. पहिल्या शतकात यहोवाने _________________________ सामोरे आणले. मंडळ्या तयार झाल्या व त्यांचे कार्यवहन प्रेषित व वडील जनांच्या _________________________ मार्गदर्शनाद्वारे झाले. (प्रे. कृत्ये १५:२२-३१) [kl-MR पृ. १६० परि. ३]

२३. देवाचे नाव यहोवा याचा अर्थ, _________________________ असा आहे असे समजले जाते. याचा अर्थ असा होतो, की यहोवा आपले _________________________ साध्य करण्याकरता त्याला वाटेल ती भूमिका घेऊ शकतो. [wMR९८ ५/१ पृ. ५ परि. ३]

२४. मंडळीच्या क्षेत्रात सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्तेचा प्रचार करणे हा _________________________ शोधण्याचा व तुम्हाला _________________________ आहे हे दाखवणारी सत्कर्मे करण्याचा एक मार्ग आहे. [kl-MR पृ. १७५ परि. ९]

२५. येशूचा दाखला दाखवून देतो, की खरा प्रामाणिक मनुष्य देवाच्या _________________________ केवळ पालनच करीत नाही तर त्याचे _________________________ प्रदर्शित करतो. (लूक १०:२९-३७) [w-MR९८ ७/१ पृ. ३१ परि. २]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. प्रार्थना (एक अर्थहीन विधी; काहीतरी मिळवण्याचा मार्ग; देवासोबत जवळचे नातेसंबंध राखण्याचे माध्यम) आहे. [kl-MR पृ. १५० परि. ३]

२७. (शमुवेल; दावीद; शौल) याचा राज्याभिषेक झाल्यानंतर इस्राएलात शास्त्यांच्या राज्याचा काळ संपुष्टात आला आणि त्यानंतर त्याने यहोवाच्या मदतीने (अम्मोनी; मवाबी; पलिष्टी) लोकांचा पराभव केला. (१ शमु. ११:६, ११) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ १२/१५ पृ. ९ परि. २-पृ. १० परि. १.]

२८. तीमथ्याला खासकरून (प्रेषित पौलाकडून; त्याच्या वडिलांकडून; त्याच्या आईकडून व आजीकडून) “पवित्र शास्त्राची” माहिती मिळाली होती, त्यामुळे तो एक उत्तम मिशनरी व पर्यवेक्षक बनू शकला. (२ तीम. ३:१४, १५; फिलिप्पै. २:१९-२२) [w-MR९८ ५/१५ पृ. ८ परि. ३-पृ. ९ परि. ५]

२९. बाप्तिस्मा (तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचा शेवट; यहोवाचा साक्षीदार व देवाचा नियुक्‍त सेवक या नात्याने जीवनभरच्या देवाच्या सेवेची सुरवात; तारणाची खात्री) आहे. [kl-MR पृ. १७८ परि. १७]

३०. यहोवा देवावर प्रेम करणाऱ्‍या व परादीस पृथ्वीवर वस्ती करणाऱ्‍यांसमोर (अनंतकाल; एक हजार वर्षे; ७० ते ८० वर्षांचे जीवन) राहील. [kl-MR पृ. १९० परि. २२]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

शास्ते ११:३०, ३१; १ शमु. १५:२२; ३०:२४, २५; २ राजे ६:१५-१७; याको. ५:११

३१. यहोवा त्याच्या इच्छेला अनुलक्षून आपल्या लोकांचे संरक्षण करण्याकरता स्वर्गीय सैन्यांचा उपयोग करील असे आश्‍वासन देतो. [w-MR९८ ४/१५ पृ. २९ परि. ५]

३२. दिलेला शब्द पाळणे कठीण आणि त्रासदायक असले तरीसुद्धा असे करण्याची मंडळीच्या पर्यवेक्षकांवर खासकरून जबाबदारी आहे. [w-MR९९ ९/१५ पृ. १० परि. ३-४]

३३. परीक्षाप्रसंगात असतानाही देवाला विश्‍वासू राहिल्यामुळे यहोवा देवाकडून अद्‌भुत प्रतिफळ मिळते. [w-MR९८ ५/१ पृ. ३१ परि. ४]

३४. देवावर खरे प्रेम असलेल्या व्यक्‍तीने देवाला केवळ अर्पणे वाहू नयेत, तर देवाच्या नियमांचे आज्ञाधारकपणे पालन करावे. [साप्ताहिक बायबल वाचन, पाहा w-MR९६ ६/१५ पृ. ५ परि. १.]

३५. आज यहोवाच्या संस्थेत सहायक भूमिका पार पाडणाऱ्‍यांची तो मनापासून कदर करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८६ ९/१ पृ. २८ परि. ४.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा