सेवा सभा आराखडा
जुलै १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत १७ (१८७)
१२ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मंडळीच्या एप्रिल महिन्याच्या क्षेत्र सेवा अहवालाबद्दल सांगा. “कृपया मागचे पृष्ठ पाहावे” या शीर्षकाखाली दिलेल्या माहितीकडे बांधवांचे लक्ष वेधा आणि तुमच्या क्षेत्रात परिणामकारक ठरेल अशी एखादी सादरता वापरून प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: “आम्ही शांत बसू शकत नाही.” एका मिनिटात प्रस्तावना देऊन प्रश्नोत्तराने लेखाची चर्चा करा. प्रचाराचे कार्य आपल्याला इतके महत्त्वाचे का वाटते याच्या कारणांचा उल्लेख करा. जानेवारी १५, १९९७, टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २३-४ वर दिलेल्या मुद्द्यांपैकी काही समर्पक मुद्दे सांगा.
१८ मि: “सर्व काही उन्नतीसाठी असावे.” दोन वडिलांनी या लेखावर चर्चा करावी. प्रत्येक परिच्छेद व दिलेली सर्व वचने वाचावीत. या वचनांतून कोणती तत्त्वे शिकायला मिळतात याविषयी सांगा. बिझनेसचे व्यवहार किंवा पैशांची गुंतवणूक करताना खबरदारी बाळगण्याच्या गरजेवर जोर द्या. मार्च १५, १९९७, टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे १८-१९, २२ वर दिलेल्या सूचनांची उजळणी करावी.
गीत २ (१५) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ (२२२)
१२ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. आस्था दाखवणाऱ्या व्यक्तीला देवाचे वैयक्तिक नाव माहीत असणे आणि ते उपयोगात आणणे का महत्त्वाचे आहे हे समजावण्याकरता डिव्हाईन नेम हे ब्रोशर कसे वापरावे याविषयी थोडक्यात सांगावे.—पाहा रिझनिंग पुस्तक, पृष्ठे १९६-७.
१५ मि: “परोपकारी व दानशूर असावे.” प्रश्नोत्तरे. नोव्हेंबर १, १९९६, टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २९-३० वर “आपण का देतो” या शीर्षकाखाली दिलेल्या चार कारणांचा उल्लेख करा.
१८ मि: माझा आदर्श कोण असावा? एक वडील कौटुंबिक अभ्यास घेत आहेत. कुटुंबात एक किंवा दोन किशोरवयीन मुले आहेत. वडिलांना लक्षात आले आहे की अलिकडे मुलांचे संभाषण सहसा स्पोर्ट स्टार्स, चित्रपट किंवा टीव्ही स्टार्स, आणि संगीत स्टार्स विषयीच असते. जगिक लोकांविषयी अशाप्रकारची ओढ असणे हे जगाच्या आत्म्याचेच लक्षण असल्यामुळे वडील आपल्या मुलांविषयी काळजी व्यक्त करतात. सर्व मिळून सावध राहाच्या! जून ८, १९९८ अंकातून पृष्ठे १२-१४ वर चर्चा करतात. मुलांना जाणीव होते की जगिक लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणे धोक्याचे आहे आणि ख्रिस्ती लोकांकरता जगिक प्रसिद्धी अजिबातच महत्त्वाची नाही. त्याऐवजी, आपल्या आईवडिलांचा, मंडळीतल्या वडिलांचा आणि इतर अनुभवी बांधवांचा, आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणे जास्त हितकारक आहे.
गीत ९ (३७) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ (४५)
५ मि: स्थानिक घोषणा.
१५ मि: देवाचे सेवक म्हणून आपली लायकी पटवून देणे. दोन सेवा सेवक डिसेंबर १५, १९९८ टेहळणी बुरूज यातील पृष्ठे १९-२० वर दिलेल्या बायबलच्या सल्ल्याची चर्चा करतात. सेवा सेवक म्हणून आपली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडणे किती आवश्यक आहे याबद्दल जाणीव व्यक्त करून, वैयक्तिक पातळीवर काय करता येईल याबद्दल ते विचारविनिमय करतात. क्षेत्र सेवेत इतरांपुढे चांगले उदाहरण ठेवण्याचे महत्त्व तसेच बांधवांना वैयक्तिकरित्या मदत करण्यात वडिलांना कसे साहाय्य करता येईल या काही मुद्द्यांवर ते चर्चा करतात. या शेवटल्या काळाचे गांभीर्य ओळखण्यासाठी आणि आध्यात्मिकरित्या प्रगती करण्यासाठी मंडळीतल्या बांधवांना होईल तितके साहाय्य करण्याची इच्छा देखील ते व्यक्त करतात.
१० मि: ज्यांना भेटता येत नाही अशांना पत्राद्वारे प्रचार करणे. या विषयावर भाषण व चर्चा. आजकाल लोकांना घरी भेटणे अतिशय कठीण होत चालले आहे, पण काही प्रचारकांना पत्राद्वारे प्रचार केल्यामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत. काही सूचनांवर विचार करा. पत्रातला मजकूर थोडक्यात असावा, बायबलच्या आधारावर आणि आदरणीय पद्धतीने लिहिलेला असावा. निनावी पत्रे पाठवू नका. पत्र सुवाच्य अक्षरांत लिहा किंवा टाइप करा. किंग्डम हॉलचा पत्ता आणि मंडळीच्या सभांच्या वेळा लिहायला विसरू नका. सभांना येण्याचे आमंत्रण द्या. पुढील पत्रव्यवहाराकरता संस्थेचा पत्ता देऊ नका. स्कूल गाईडबुक पृष्ठे ८७-८ आणि नोव्हेंबर १९९६ आमची राज्य सेवा यातील प्रश्नपेटीत दिलेल्या सूचनांवर चर्चा करा.
१५ मि: परिणामकारक प्रस्तावनांचा उपयोग करा. पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेतील २-७ पृष्ठांवरील दोन किंवा तीन प्रस्तावना निवडून त्या तुमच्या क्षेत्रात परिणामकारक पद्धतीने कशा उपयोगात आणता येतील यावर चर्चा करा. “रस्त्यावर लोकांशी बोलताना, किंवा अनौपचारिक प्रचार करताना किंवा इतर वेळी तुम्ही कोणती प्रस्तावना वापरता?” याबाबत श्रोत्यांना विचारा. वेळेनुसार एक किंवा दोन प्रस्तावनांचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १ (१३) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २३ (२००)
१५ मि: स्थानिक घोषणा. जुलै महिन्याचा क्षेत्र सेवेचा रिपोर्ट देण्याची सर्वांना आठवण करून द्या. या महिन्यात ब्रोशर्स देताना आलेले काही अनुभव सांगण्याची श्रोत्यांना विनंती करा.
१२ मि: स्थानिक गरजा.
१८ मि: “यहोवाच्या सहनशीलतेची तुम्ही कदर करता का?” प्रश्नोत्तरे. यहोवाच्या सहनशीलतेच्या संदर्भात समर्पक मुद्द्यांचा उल्लेख करा.—इन्साइट, खंड २, पृष्ठे २६३-४ पाहा.
गीत २२ (१३०) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २६ (२१२)
१० मि: स्थानिक घोषणा.
१७ मि: “तुम्ही लाजऱ्या स्वभावाचे आहात का?” प्रश्नोत्तरे. १९९७ इयरबुक, (इंग्रजी) पृष्ठे ४३-४ वर दिलेला अनुभव सांगून सर्वांना प्रोत्साहन द्या.
१८ मि: भविष्यात सुबुद्धीने वागा. वडिलांचे भाषण. आपले भविष्य आनंदी असावे असे सर्व तरुणांचे स्वप्न असते. असे वाटणे साहजिक असले तरीसुद्धा जीवनात यशस्वी होण्यासाठी तरुणांनी देवाच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. (नीति. १९:२०) तरुणपणात लैंगिक आकर्षण अतिशय तीव्र असते. पण या भावनांवर नियंत्रण न ठेवल्यास परिणाम अतिशय वाईट होऊ शकतात. किशोरवयीन मुलामुलींने आपसात भावनिकरित्या गुंतणे, पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होणे, गाठीभेटी वाढणे इत्यादी कितपत योग्य आहे यासंबंधात अनेक प्रश्न उभे राहतात. यासंदर्भात तरुण लोक विचारतात या पुस्तकात पृष्ठे २३१-५ वर दिलेल्या सल्ल्यावर चर्चा करा. नोव्हेंबर १५, १९९९, टेहळणी बुरूज पृष्ठे १८-२३ वर तरुणांनी देवाप्रती असलेले आपले कर्तव्य पूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी दिलेल्या मुख्य मुद्द्यांकडे लक्ष वेधा. तरुणांना या सल्ल्यावर विचार करायला आणि काही प्रश्न असल्यास आपल्या आईवडिलांसोबत त्यांवर चर्चा करण्याचे प्रोत्साहन द्या.
गीत २८ (२२४) व समाप्तीची प्रार्थना.