वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०० पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
    आमची राज्य सेवा—२००५
  • इतरासमोर नम्र हृदयाने प्रार्थना करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ६/०० पृ. ३

प्रश्‍न पेटी

◼ मंडळीच्या सभांमध्ये प्रार्थना कोणी करावी?

प्रार्थनेला आपल्या उपासनेत महत्त्वाचे स्थान आहे. आणि खासकरून मंडळीच्या वतीने यहोवाला प्रार्थना करणे हा एक बहुमानच नव्हे तर एक मोठी जबाबदारी देखील आहे. हे लक्षात घेऊन, मंडळीतले वडील सभांमध्ये प्रार्थना करण्याकरता बांधवांची विचारपूर्वक निवड करतात. मंडळीच्या वतीने प्रार्थना करणारे, बाप्तिस्मा झालेले प्रौढ ख्रिस्ती बांधव असले पाहिजेत. मंडळीतल्या लोकांना ज्यांच्याबद्दल आदर वाटतो व ज्यांची वागणूक मंडळीत अनुकरण करण्याजोगी आहे असे हे बांधव असावेत. त्यांच्या प्रार्थनेतून त्यांचा यहोवा देवासोबत किती जवळचा नातेसंबंध आहे हे दिसून आले पाहिजे. जून १, १९८७ च्या टेहळणी बुरूज अंकात “इतरांसमोर नम्र हृदयाने प्रार्थना करणे” या लेखात मंडळीच्या वतीने प्रार्थना करणाऱ्‍यांकरता काही महत्त्वाचे मार्गदर्शन आहे.

ज्यांची वागणूक पोरकटपणाची आहे, किंवा ज्यांच्या वागणूकीत प्रौढता नाही अशा बांधवांना वडिलांनी प्रार्थना करण्याची जबाबदारी देऊ नये. तसेच ज्या बांधवाला सतत कुरकूर करण्याची सवय आहे आणि जो प्रार्थनेचा उपयोग इतरांना टोमणे मारण्यासाठी करतो अशा बांधवालाही प्रार्थना करायला सांगू नये. (१ तीम. २:८) मंडळीत बाप्तिस्मा झालेले किशोरवयीन बांधव असतात, पण अशा बांधवांची मंडळीच्या वतीने प्रार्थना करण्याइतकी आध्यात्मिक वाढ झाली आहे का हे वडिलांनी विचारपूर्वक ठरवावे.—प्रे. कृत्ये १६:१, २.

कधीकधी क्षेत्र सेवेच्या सभांमध्ये योग्य बांधव हजर नसल्यामुळे एखाद्या बाप्तिस्मा झालेल्या बहिणीला प्रार्थना करावी लागते. अशा वेळी प्रार्थना करताना त्या बहिणीने डोक्यावर पदर घ्यावा. क्षेत्र सेवेच्या गटाला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य बांधव नसल्यास वडिलांनी ही जबाबदारी एखाद्या अनुभवी बहिणीला द्यावी.

जाहीर भाषणाआधी सहसा चेअरमन सुरवातीची प्रार्थना करतात. पण मंडळीत पुष्कळ योग्य बांधव असल्यास त्यांपैकी एकाला प्रार्थना करण्याची संधी देता येईल. तसेच, सभेचा शेवटला भाग हाताळणारा बांधव कदाचित समारोपाची प्रार्थना करू शकतो. पण ज्या बांधवांना प्रार्थना करायची आहे त्यांना आधीपासूनच सांगणे आवश्‍यक आहे. म्हणजे प्रार्थनेत कोणत्या मुद्द्‌यांचा उल्लेख करायचा आहे यावर विचार करायला त्यांना वेळ मिळेल. आणि त्यामुळे त्या विशिष्ट सभेला अनुरूप अशी अर्थपूर्ण, मनःपूर्वक प्रार्थना त्यांना करता येईल.

सभांच्या सुरवातीला व शेवटी केलेल्या प्रार्थना लांबलचक नसाव्यात. सर्वांसमोर प्रार्थना करताना उभे राहून प्रार्थना केल्यास सर्वांना ती स्पष्ट ऐकू येते; प्रार्थना करणाऱ्‍याने सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात आणि स्पष्ट उच्चारात बोलावे. म्हणजे सर्वांना शेवटी मनापासून “आमेन” म्हणता येईल!—१ इति. १६:३६; १ करिंथ. १४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा