घोषणा
◼ जून महिन्याकरता साहित्य सादरता: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या ब्रोशरद्वारे बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची ब्रोशर्स: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी) ईश्वरी नाम जे सर्वकाळ टिकते (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: लाईफ—हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्हल्यूशन ऑर बाय क्रिएशन?
◼ इंग्रजीशिवाय इतर कोणत्याही भाषांतून हॅन्डबिल्सची ऑर्डर पाठवताना त्या भाषेत मंडळीचे नाव व सभांच्या ठिकाणाचा पूर्ण पत्ता लिहून पाठवावा. ही माहिती हॅन्डबिल रिक्वेस्ट फॉर्मवर (S(d)-16) योग्य जागेत भरावी. हा फॉर्म भरण्याआधी त्यात POINTS TO REMEMBER या शीर्षकाखाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
◼ मंडळ्या १९९९ सालच्या टेहळणी बुरूज व सावध राहा! खंड जून लिटरेचर रिक्वेस्टसोबत मागवायला सुरवात करू शकतात. हे खंड उपलब्ध असेपर्यंत व मंडळ्यांना ते पोचेपर्यंत मंडळ्यांच्या पॅकिंग लिस्टवर “पेंन्डिंग” असे दाखवण्यात येईल. हे खंड स्पेशल रिक्वेस्ट आयटम्सपैकी आहेत.
◼ आमची राज्य सेवाच्या या अंकापासून व टेहळणी बुरूजच्या जून १, २००० अंकापासून गुजराती, हिन्दी, कन्नड, मराठी आणि तेलगू या भाषेतील प्रकाशनांत दिलेले गीत क्रमांक हे त्या त्या भाषेतील गीत पुस्तिकेतील गीतांचे क्रमांक असतील. कंसात दिलेले क्रमांक इंग्रजी गीत पुस्तकातील त्याच गीतांचे क्रमांक असतील.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन—मल्याळम व तमीळ.