सेवा सभा आराखडा
जून १२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २६ (२१२)
८ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.” एका मिनिटात प्रस्तावना देऊन प्रश्नोत्तराने लेखाची चर्चा करा. जून १५, १९९६, टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठ ३२ वर दिलेल्या अनुभवातून काही मुद्दे सांगा.
२२ मि: अपेक्षा ब्रोशरचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करणे. आमची राज्य सेवा, जानेवारी १९९९ या अंकातील ६ व्या पृष्ठावर दिलेल्या लेखावर आधारित भाषण. ६ व्या परिच्छेदात दिलेल्या सूचनांनुसार एक प्रात्यक्षिक दाखवा. एखाददोन प्रचारकांची मुलाखत घ्या. अभ्यास सुरू करण्यात कशाप्रकारे यश आले, सुरवात कशी केली आणि अभ्यासात खंड पडू नये म्हणून कोणती काळजी घेतली याविषयी प्रश्न विचारा.
गीत ३ (३२) व समाप्तीची प्रार्थना.
जून १९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ८ (५३)
१२ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल आणि त्रैमासिक हिशेब तपासणीची घोषणा. मुलांचे शाळाकॉलेज सुरू होण्याच्या बेतात आहेत, तेव्हा मंडळीत तरुणांचे प्रश्न किंवा यूथ पुस्तकांचा साठा उपलब्ध असेल तर येत्या काही महिन्यांत या पुस्तकांचा चांगला उपयोग कसा करता येईल यावर प्रात्यक्षिक दाखवा.
८ मि: प्रश्न पेटी. वडिलांद्वारे भाषण
२५ मि: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?” सर्व्हिस ओव्हरसियरने प्रश्नोत्तर पद्धतीने या भागाची चर्चा करावी. प्रत्येक परिच्छेद मोठ्याने वाचण्यात यावा आणि ३, ४ व ७ क्रमांकाच्या परिच्छेदात दिलेली वचने वाचावीत. ६ व्या परिच्छेदाची चर्चा करताना, बाप्तिस्मा झालेल्या लोकांसोबत पुन्हा बायबल अभ्यास सुरू करावा किंवा नाही हे ठरवण्याआधी सर्व्हिंस ओव्हरसियरला विचारणे महत्त्वाचे आहे यावर जोर द्या.—आमची राज्य सेवा, नोव्हेंबर १९९८ च्या अंकातील प्रश्न पेटी पाहा.
गीत २१ (१९१) व समाप्तीची प्रार्थना.
जून २६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४ (४३)
१० मि: स्थानिक घोषणा. जून महिन्याचा रिपोर्ट देण्याची प्रचारकांना आठवण करून द्या. जुलै महिन्यात कोणती साहित्य सादरता आहे ते सांगा. मंडळीजवळ कोणत्या ब्रोशर्सचा साठा आहे आणि प्रत्येक ब्रोशरचा विषय काय आणि ते कोणाला देता येईल हे थोडक्यात सांगा. एखाद्या ब्रोशरचा सेवेत कसा उपयोग करता येईल याचे चांगली तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा.
१८ मि: कसे उत्तर द्यावे ते तुम्ही समजावे. (कलस्सै. ४:६) भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. बायबलच्या विरोधात असलेल्या एखाद्या मुद्द्यावर कोणी प्रश्न विचारल्यास तुम्ही काय करता? अशावेळी रीझनिंग पुस्तकाची मदत तुम्ही घेऊ शकता. यात कसे उत्तर द्यावे याविषयी बऱ्याच सहायक सूचना दिल्या आहेत. उदाहरणार्थ, ख्रिस्ताच्या खंडणीवर विश्वास ठेवण्याद्वारे पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळू शकते असे आपण मानतो, पण सगळेच जण हे मानत नाहीत. रीझनिंग पुस्तकाच्या १०३-४ आणि ३२१ पृष्ठांवर दिलेल्या “इफ समवन सेझ. . .” या शीर्षकाखालील वेगवेगळ्या उत्तरांवर चर्चा करा. रीझनिंग पुस्तक क्षेत्र सेवेत नेहमी सोबत नेण्याचे सर्वांना प्रोत्साहन द्या.
१७ मि: “तुम्ही तेथे असाल का?” भाषण व अनुभव. वडिलांनी हा भाग हाताळावा. बायबलच्या काळांपासून आजपर्यंत यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक वाढीत मोठ्या अधिवेशनांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. ( प्रोक्लेमर्स पुस्तकातील पृष्ठ २५४ वरील परिच्छेद १-३ व इन्साइट, खंड १, पृष्ठ ८२१, परिच्छेद ५ पाहा.) या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनाच्या तीनही दिवसांना उपस्थित राहण्याकरता आतापासूनच तयारी करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. आधीपासूनच योजना, तयारी व प्रयत्न केल्यामुळे कोणते आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले याविषयी श्रोत्यांमधून काही बांधवांना आपले अनुभव सांगण्याची विनंती करा.
गीत ६ (४५) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २३ (२००)
१० मि: स्थानिक घोषणा. अपेक्षा ब्रोशरमधून बायबल अभ्यास कसा सुरू केला याविषयी प्रचारकांचे अनुभव विचारा.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: बायबल तत्त्वांचे पालन केल्याने कुटुंबात आनंद येऊ शकतो. रीझनिंग पुस्तकातील २५३-४ पृष्ठांवरील आठ मुद्द्यांवर दोन बांधवांची चर्चा. देवाच्या वचनात दिलेली तत्त्वे समजून त्यांचे पालन केल्यानेच कुटुंबात खरा आनंद येऊ शकतो हे आपल्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्यांना समजावून सांगणे किती महत्त्वाचे आहे यावर भर द्या. अपेक्षा ब्रोशरमधील ८ व्या पाठातील मुद्द्यांचा उपयोग करून हे कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवा. देवाच्या सल्ल्याप्रमाणे वागणाऱ्या कुटुंबात सदैव सुख, शांती आणि एकता असते. त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये अतूट प्रेम असते. कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकातील १३ व्या अध्यायातील १ आणि २१-२ या परिच्छेदातले अनुभव सांगा.
गीत ७ (५१) व समाप्तीची प्रार्थना.