घोषणा
◼ मे महिन्याकरता साहित्य सादरता: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती. आस्था दाखवणाऱ्यांना अपेक्षा ब्रोशर सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर लक्ष द्या. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची ब्रोशर्स: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी) ईश्वरी नाम जे सर्वकाळ टिकते (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.
◼ पुन्हा एकदा आठवण करून देण्यात येत आहे की प्रचारकांनी खासगी पत्रव्यवहार करताना लिहिणाऱ्याचा पत्ता म्हणून संस्थेचा पत्ता कधीही देऊ नये. सत्य शिकण्यास इच्छुक असणाऱ्यांना साक्ष देण्यासाठी किंवा त्यांना काही पुस्तके पाठवताना, घरी नसलेल्यांना किंवा दुर्गम परिसरांत राहणाऱ्यांना पत्र लिहिताना हे आठवणीत ठेवावे. पत्राद्वारे साक्ष देताना तुम्ही एकतर तुमचा स्वतःचा किंवा तुमच्या किंगडम हॉलचा पत्ता देऊ शकता. कृपया संस्थेचा पत्ता देऊ नये.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकाने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ ला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
◼ बऱ्याच मंडळ्यांकडे जुन्या लिटरेचरचा मोठा साठा शिल्लक आहे. जादा लिटरेचर साठण्याच्या या समस्येकडे सर्व्हिस कमिटीच्या बांधवांनी व खासकरून सर्व्हिस ओव्हसियर्सनी लक्ष द्यावे व त्यानुसार संस्थेकडून कोणते साहित्य मागवावे व कोणते मागवू नये हे ठरवावे. आता आपण किंमत न घेता साहित्य वाटप करत असल्यामुळे याकडे खास लक्ष द्यावे. जास्तीत जास्त चार किंवा पाच महिने पुरेल इतकेच साहित्य मागवावे. यानंतर गरज पडल्यास दर महिन्याला तुम्ही संस्थेकडून साहित्य मागवू शकता.
जुन्या पुस्तकांचा उपलब्ध साठा संपेपर्यंत संस्थेकडून पुस्तकांचे पुन्हा मुद्रण केले जाणार नाही. तेव्हा, तुम्ही मागवलेले प्रकाशन उपलब्ध नसल्यास, त्याऐवजी कोणते प्रकाशन मिळू शकेल याविषयी पॅकिंग यादीवर संस्थेकडून तुम्हाला सूचित केले जाईल. मग तुम्ही पुढच्या वेळी संस्थेला लिटरेचर रिक्वेस्ट पाठवताना हे प्रकाशन मागवू शकता. येत्या महिन्यांत मंडळ्यांनी जुन्या प्रकाशनांचा चांगला उपयोग करण्याचा खास प्रयत्न करावा अशी विनंती केली जात आहे.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
पे अटेंशन टू डॅनियल्स प्रॉफसी!—हिन्दी