घोषणा
◼ फेब्रुवारीसाठी: साहित्य सादरता: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती. आस्था दाखवणाऱ्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ सचिवाने आणि सेवा पर्यवेक्षकाने सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. त्यांच्यापैकी कोणाला आपले आवश्यक तास भरून काढण्यात काही अडचण असल्यास त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी वडिलांनी काही योजना आखावी. यावरील उपयुक्त सूचनांसाठी संस्थेच्या ऑक्टोबर १ च्या S-201 वार्षिक पत्रांची उजळणी करा. तसेच ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीतील परिच्छेद १२-२० देखील पाहा.
◼ एप्रिल १७, २००० पासून पे अटेन्शन टू डॅनियल्स प्रॉफेसी हे पुस्तक मंडळीच्या पुस्तक अभ्यासात अभ्यासले जाईल.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
पे अटेन्शन टू डॅनियल्स प्रॉफेसी!—इंग्रजी, कन्नड, तमीळ, पंजाबी आणि मल्याळम.
द गाइडन्स ऑफ गॉड—आवर वे टू पॅरडाइज—आसामी, इंग्रजी, कन्नड, तमीळ, बंगाली आणि मल्याळम.
लाइफ—हाउ डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन?—मल्याळम.