घोषणा
◼ जानेवारीसाठी: साहित्य सादरता: मंडळीकडे असलेली १९२ पानांची कोणतीही जुनी पुस्तके. ती नसल्यास लाईफ—हाऊ डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल? ही पुस्तके सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या पुस्तकातून गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल. एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या किरकोळ प्रती. आस्था दाखवणाऱ्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.
◼ जानेवारी १० च्या साप्ताहिक सेवा सभेत उपस्थित असणारे सर्व बाप्तिस्माप्राप्त प्रचारक स्वतःसाठी नो ब्लड कार्ड आणि आपल्या मुलांसाठी आयडेन्टिटी कार्ड घेऊ शकतात.
◼ फेब्रुवारी महिन्यापासून मार्च महिन्याच्या ५ तारखेपर्यंत विभागीय पर्यवेक्षकांच्या नवीन जाहीर भाषणाचा विषय, “खरोखरचे हर्मगिदोन—का? केव्हा?” हा असेल.
◼ या वर्षी बुधवार, एप्रिल १९ रोजी सूर्यास्तानंतर साजरा होणारा स्मारकविधीचा कार्यक्रम सुरळीत पार पडावा म्हणून मंडळ्यांनी सर्वांना सोयीस्कर असतील अशा योजना कराव्यात. स्मारकविधीचे भाषण आधी सुरू केल्यास हरकत नाही, पण स्मारकविधीची बोधचिन्हे सूर्यास्तापूर्वी फिरवली जाऊ नयेत. तुमच्या शहरात किती वाजता सूर्यास्त होतो हे आधीच माहीत करून घ्या. प्रत्येक मंडळीने स्मारकविधी समारोह स्वतंत्रपणे साजरा करणे ही एक चांगली कल्पना असली तरी हे नेहमीच शक्य होते असे नाही. आपल्या नेहमीच्या सभांसाठी दोन किंवा तीन मंडळ्या एकाच राज्य सभागृहाचा वापर करत असतील तर त्यांपैकी एखाददोन मंडळ्यांना स्मारकविधीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी बाहेरचा हॉल बुक करावा लागेल. परंतु, एकापेक्षा जास्त मंडळ्या एकाच सभागृहाचा उपयोग करणार असतील तर दोन कार्यक्रमांमध्ये कमीतकमी ४० मिनिटांचा अवधी असावा; यामुळे लोकांचे स्वागत करण्यासाठी, नवीन लोकांना उत्तेजन देण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि यामुळे एकंदर सर्वांनाच कार्यक्रमाचा पूर्ण फायदा घेता येईल. वाहतूक आणि पार्किंगसंबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून काळजी घ्यावी; तसेच, लोकांना कार्यक्रमासाठी घेऊन येण्याच्या आणि नंतर त्यांना घरी पोहंचवण्याच्या कामातही जातीने लक्ष द्यावे. मंडळीच्या सर्व वडिलांनी मिळून आपल्या मंडळीतील एकंदर सर्वांना सोयीस्कर असतील अशा व्यवस्था कराव्यात.
◼ यावर्षी स्मारक विधीनंतरचे खास जाहीर भाषण रविवारी, एप्रिल १६ रोजी देण्यात येईल. भाषणाचा विषय असेल: “मानवजातीला खंडणीची आवश्यकता का आहे?” भाषणाची रूपरेषा सर्व मंडळ्यांना दिली जाईल. त्या आठवडी ज्या मंडळ्यांमध्ये सर्किट ओव्हरसियरची व्हिझिट चालू असेल किंवा ज्यांचे विभागीय संमेलन अथवा खास संमेलन दिवस असेल अशा मंडळ्यांत हे खास भाषण पुढील आठवडी दिले जावे. परंतु, कोणत्याही मंडळीत एप्रिल १६, १९९९ च्या आधी हे खास भाषण दिले जाऊ नये.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९९८
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
माहितीपत्रके: जीवनाचा उद्देश काय आहे?—कन्नड, मराठी आणि मल्याळम
◼ उपलब्ध असलेली ऑडिओ कॉम्पॅक्ट डिस्क:
गीत: सिंगिंग किंग्डम साँग्स (सिंगल डिस्क)
ऑर्केस्ट्रा संगीत: किंग्डम मेलडिज, क्रमांक १ ते ८ (आठ डिस्कचा सेट) [डिस्कचा क्रमांक सांगून हवी ती डिस्क मागवली जाऊ शकते]