वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९९ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km १२/९९ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

सूचना: आमची राज्य सेवाच्या या अंकापासून सेवा सभेचा आराखडा यात पुढील महिन्याच्या पहिल्या सेवा सभा कार्यक्रमाची एक रूपरेषा दिली जाईल. मंडळ्यांना आमची राज्य सेवा उशिरा मिळण्याची शक्यता असल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.

डिसेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २०७ (१)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: “यहोवाप्रमाणे निःपक्षपाती असा.” एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍नोत्तरांनी लेखाची चर्चा सुरू करा. निःपक्षपाताचा अर्थ काय, यहोवा कशाप्रकारे निःपक्ष आहे आणि आपल्या सेवेत आपणही निःपक्ष कसे होऊ शकतो याचे स्पष्टीकरण द्या.—इन्साईट, खंड १, पृष्ठ ११९२, परिच्छेद ४-७ पाहा.

२० मि: “आपण हे आधीसुद्धा ऐकलंय, नाही का?” भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. पुनरावृत्ती केल्याने अधिक चांगल्याप्रकारे सत्य समजण्यास आणि त्याची कदर करण्यास मदत कशी झाली याबद्दल श्रोत्यांना विचारा.—टेहळणी बुरूज, जुलै १५, १९९५, पृष्ठे २१-२, आणि ऑगस्ट १५, १९९३, पृष्ठे २१-२२, परिच्छेद १०-१२.

गीत २१८ (२९) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६८ (८)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. विविध सणांच्या शुभेच्छांना कुशलतापूर्वक प्रतिसाद कसा देता येईल ते सूचवा. मंडळीकडे सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा थोर शिक्षक ही पुस्तके असल्यास नाताळाच्या सणादरम्यान यांचा उत्तम उपयोग कसा केला जाऊ शकतो ते सांगा.

१५ मि: “साल २००० साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशाला.” ईश्‍वरशासित सेवा प्रशाला अध्यक्षांचे भाषण. नवीन वर्षासाठी केलेल्या पुढील फेरबदलांचा पुनर्विचार करा. नेमणूक क्र. ३ नवे जग भाषांतर बायबल यात दिलेल्या “चर्चेसाठी बायबलचे विषय” यावर आधारित असेल. नेमणूक क्र. ४ नेहमीप्रमाणे इन्साईट ऑन द स्क्रिप्चर्स यातील बायबलच्या व्यक्‍तिरेखांवर आणि शेवटच्या तीन महिन्यांत “चर्चेसाठी बायबलचे विषय” यावर आधारित असेल. या नेमणुकीपुढे जेव्हा (#) असे चिन्ह दिले जाते त्याचा अर्थ हा भाग शक्यतो एखाद्या बांधवाने हाताळावा. पण, कृपया याची नोंद घ्या, मराठी भाषिक मंडळ्यांसाठी नेमणूक क्र. ३  “चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय” या पुस्तिकेवर तर नेमणूक क्र. ४ टेहळणी बुरूज मासिकातील लेखांवर आधारित असेल. सर्वांना नियमितपणे आपले साप्ताहिक बायबल वाचन करण्याचे आणि प्रशालेत नेमून दिलेले भाग परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: “देवावर विश्‍वास नसणाऱ्‍या व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?” प्रश्‍नोत्तरे. अनेकांचा देवावरील विश्‍वास का उडाला आहे यावर चर्चा करा. अशा लोकांशी आपण कशाप्रकारे संभाषण करू शकतो आणि देव अस्तित्वात आहे हे तर्कशुद्धपणे पाहण्यास आपण त्यांना कशी मदत करू शकतो याच्या काही पद्धती सुचवा. यावर एकदोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. अधिक माहितीसाठी रिझनिंग पुस्तक पृष्ठे १४५-५१, आणि मॅनकाईन्ड्‌स सर्च फॉर गॉड, अध्याय १४ पाहा.

गीत २२० (२९) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१९ (६)

१० मि: स्थानिक घोषणा. अलीकडे क्षेत्र सेवेत आलेले चांगले अनुभव संक्षिप्तपणे कथन करण्यास प्रचारकांना सांगा.

१५ मि: संभाषणाला खिळ घालणाऱ्‍या संभाव्य लोकांना कसा प्रतिसाद द्याल? श्रोत्यांसोबत चर्चा आणि प्रात्यक्षिके. पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेतील पृष्ठे ७-८ वरील “विवेचन” वाचा आणि पृष्ठे ८-१२ वरील ‘संभाषणाला खीळ घालणारे’ दोनतीन प्रसंग विचारात घ्या किंवा मग तुमच्या क्षेत्रात सहसा येणारे असे काही प्रसंग विचारात घ्या. वरील पृष्ठांवर सुचवलेल्या प्रतिसादांची उजळणी करा आणि तुमच्या क्षेत्रात ते परिणामकारक का आहेत याचा अभ्यास करा. यांपैकी काहींवर संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. सुचवलेल्या प्रतिसादांचा श्रोत्यांनी यशस्वीपणे कसा उपयोग केला आहे याविषयी त्यांना विचारा.

२० मि: एखाद्या धार्मिक संघटनेचे काम मी करू शकतो का? एप्रिल १५, १९९९, टेहळणी बुरूज, पृष्ठे २८-३० वर आधारित वडिलांचे भाषण. काही लोकांनी असे काम हाती घेतले पण नंतर त्यांच्या लक्षात आले, की ते जे काही करत होते ते बायबल तत्त्वांच्या एकवाक्यतेत नव्हते. एखाद्या धार्मिक संघटनेशी संबंधित असलेली नोकरी पत्करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात याची उजळणी करा. आणि यहोवासमोर शुद्ध विवेक राखण्यास मदत करील असेच पाऊल उचलण्याचे प्रोत्साहन द्या.—२ करिंथ. ६:३, ४, १४-१८.

गीत १०९ (२) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६६ (१५)

१० मि: स्थानिक घोषणा. नवीन वर्षापासून तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळांत काही बदल होणार असल्यास सर्वांना बदललेल्या वेळांनुसार नियमितपणे सभांना उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या. सभांच्या बदललेल्या वेळांविषयी बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईक लोकांना सांगा आणि नवीन वेळ दाखवणारे हॅन्डबिल्स वापरायला सुरवात करा. सर्वांना आपला डिसेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: जानेवारी महिन्यात जुनी पुस्तके कशी सादर करावीत हा भाग सेवा पर्यवेक्षकांनी हाताळावा. भाषण आणि प्रात्यक्षिके. मंडळीकडे असलेली १९२ पृष्ठांची दोनतीन पुस्तके दाखवा आणि यांचा क्षेत्र सेवेत उपयोग करण्यासाठी लिट्रेचर काऊंटरवरून पुस्तके घेण्याचे उत्तेजन द्या. (पुस्तके उपलब्ध नसल्यास जानेवारी महिन्यासाठी असलेल्या पर्यायी सादरतेवर चर्चा करा.) सुलभ साहित्य वितरण योजनेनुसार साहित्य कसे सादर केले जाऊ शकते हे दाखवण्यासाठी एकदोन प्रात्यक्षिके दाखवा. संभाषण सुरू करण्यासाठी कोणत्या मुद्द्‌यांचा आणि चित्रांचा चांगल्याप्रकारे उपयोग केला जाऊ शकतो ते सांगा. मग, यावर एकदोन प्रस्तुती दाखवा. आस्था दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत अभ्यास सुरू करण्यासाठी अपेक्षा माहितीपत्रक द्या.

गीत २२४ (२८) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १० (२१)

८ मि: स्थानिक घोषणा.

१७ मि: कसे उत्तर द्यायचे ते समजून घ्या. (कलस्सै. ४:६) भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. इतरांना बायबलची सत्ये कशी सांगता येतील यासाठी रिझनिंग पुस्तक एक उत्तम मार्गदर्शक आहे. आपल्या एखाद्या विश्‍वासाविषयी घरमालक काही आक्षेप घेतो तेव्हा त्या विश्‍वासासंबंधी असलेल्या माहितीखाली “जेव्हा कोणी म्हणतो” या सदराचा आपण उपयोग करू शकतो. पृष्ठे ६४-६८ वर बायबलविषयी लोक सहसा व्यक्‍त करत असलेली मते विचारात घ्या आणि ही सुचवलेली मते परिणामकारक का ठरू शकतील त्याचा खुलासा करा.

२० मि: “आपल्या साहित्याचा विचारशीलपणे उपयोग करा.” प्रश्‍नोत्तरे आणि चर्चा. परिच्छेद ७ विचारात घेतल्यानंतर परिच्छेद ४-७ मध्ये सुचवलेल्या एकदोन प्रस्तावनांची प्रात्यक्षिके दाखवा.

गीत ५६ (४) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा