देवाचे भविष्यसूचक वचन जरूर पूर्ण होईल!
१ बायबलच्या भविष्यवाण्यांविषयी यहोवाच्या साक्षीदारांना सुरवातीपासूनच खूप उत्सुकता राहिली आहे. त्यामुळे मागच्या वर्षी, आपल्या प्रांतीय अधिवेशनाचे शीर्षक, “देवाचे भविष्यसूचक वचन” असे आहे कळल्यानंतर आपल्याला किती आनंद झाला होता! आध्यात्मिकरित्या “यथाकाळी खावयास देण्यासाठी” यहोवाने आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे हे जाणून घेण्याकरता आपण अगदी उतावीळ झालो होतो. (मत्त. २४:४५) आणि यहोवाने आपला अपेक्षाभंग केला नाही.
२ अधिवेशनाची वैशिष्ट्ये: “देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष द्या” या शुक्रवारच्या मुख्य भाषणात रुपांतराच्या अहवालाची बोधपर चर्चा करण्यात आली होती. (मत्त. १७:१-९) भाषणात या मुद्द्यावर जोर देण्यात आला, की हे दुष्ट व्यवस्थिकरण मावळतीला जाऊन लवकरच नव्या जगाची पहाट होणार आहे! आज आपण नव्या जगाच्या अगदी उंबरठ्यावर उभे आहोत. त्यामुळे आपला हा काळ मानव इतिहासातला सगळ्यात महत्त्वपूर्ण काळ आहे! तेव्हा, देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे लक्ष देणे अत्यंत जरूरीचे आहे. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे देवाचे वचन नियमितपणे वाचणे. हाच विषय पुढील परिसंवादात हाताळण्यात आला. “देवाचे वचन उत्साहाने वाचा” या परिसंवादात, बायबल वाचन अधिक लाभदायक आणि आनंददायक कसे बनवता येईल यावर उपयुक्त सल्ले देण्यात आले.
३ आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे इतक्या ठामपणे आपण का म्हणतो याची कारणे शनिवार दुपारच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत. आठवतात का ती सर्व कारणे तुम्हाला? रविवारी सकाळी आपल्याला समजावण्यात आले, की आपल्या आणि हबक्कूकच्या काळात विलक्षण साम्यता आहे. यहोवा देव दुष्टांचा नाश करील आणि धार्मिकांना तारील तेव्हा अनेक महत्त्वपूर्ण घटना घडतील. या गोष्टींची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर हबक्कूकची भविष्यवाणी जणू पूर्ण होत असल्याचा भास आपल्याला झाला. याकोब आणि एसाव या व्यक्तिरेखांवर आधारित नाटकाचा मुख्य मुद्दा तुमच्या लक्षात आला का? नाटकाचा आशय होता: उदासीन, बेपर्वा वृत्तीचा प्रतिकार करून यहोवाच्या आशीर्वादांसाठी झटून प्रयत्न करा.
४ आकर्षक नवीन पुस्तक: अधिवेशनात पे अटेन्शन टु डॅनियल्स प्रॉफसी हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता! आपल्यापैकी काहींनी हे पुस्तक वाचायलाही सुरवात केली असेल. अधिवेशनात हे पुस्तक प्रकाशित करताना वक्त्याने म्हटले: “केवळ काही गोष्टी वगळता, दानीएलाच्या पुस्तकातील जवळजवळ सर्व भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत.” यावरून, या व्यवस्थिकरणाचा अंत होण्यासाठी किती कमी वेळ राहिला आहे हे आपल्या लक्षात येते.
५ अधिवेशन कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला मनोमन खात्री पटली, की अद्याप पूर्ण न झालेल्या देवाच्या भविष्यवाण्या निश्चितच पूर्ण होतील. याच खात्रीमुळे देवाच्या भविष्यसूचक वचनाविषयी लोकांना सांगण्याची प्रेरणा आपल्याला मिळत राहते!