वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९९ पृ. ४
  • “मुद्द्‌याचं” बोलूया!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मुद्द्‌याचं” बोलूया!
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • जीवन बचावणाऱ्‍या आमच्या कार्यात यशस्वी सहभाग घेणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • इतरांना देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • मासिक सादर करण्याची तयारी कशी कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ७/९९ पृ. ४

“मुद्द्‌याचं” बोलूया!

१ तुम्ही अगदी चांगली तयारी करून जाता आणि त्याप्रमाणे घरमालकाला संदेश सांगत असता. तितक्यात घरमालक तुम्हाला मध्येच थांबवून म्हणतो, “मुद्द्‌याचं बोला हो! काय पाहिजे तुम्हाला?” असा अनुभव तुम्हाला कधी आला आहे का? असल्यास, त्यातून काय शिकता येईल?

२ आजकाल बरेच लोक उतावीळ असतात. आपण कोण, कोठून आणि कशासाठी आलो आहोत हे त्यांना थोडक्यात जाणून घ्यायचे असते. बायबलवर चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत हे कळाल्यावर कदाचित ते पुढे ऐकून घ्यायलाच तयार होणार नाहीत. बायबल वाचन किंवा आध्यात्मिक स्वरूपाच्या गोष्टी बहुतेकांना वायफळ उद्योग वाटतात. मग अशा घरमालकांनी आपल्यासोबत काही मिनिटे बायबलच्या एखाद्या विषयावर बोलावे म्हणून आपण त्यांचे मन कसे वळवू शकतो?

३ सर्वोत्तम उपाय: या समस्येवर मात करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे घरमालकाला हे पटवून देणे की त्याला ज्या गोष्टींची चिंता वाटते त्या समस्यांवर बायबल अगदी व्यवहारोपयोगी उपाय सुचवते; आणि हे कमीत कमी शब्दांत तुम्ही सांगितले पाहिजे. सुवार्ता सादर करण्याची सर्वात परिणामकारक पद्धत म्हणजे, घरमालकाला विचार करायला लावेल असा एक मुद्देसूद प्रश्‍न मांडायचा आणि मग त्या प्रश्‍नाचे उत्तर एखाद्या शास्त्रवचनातून दाखवायचे. खाली सुचवलेल्या काही पद्धती तुम्ही वापरून पाहू शकता. घरमालकाची आस्था वाढवून, वेळ न घालवता “मुद्द्‌याचं” बोलण्यासाठीच खास या तयार करण्यात आल्या आहेत.

४ एखाद्या क्षेत्रातले लोक सहसा आपल्याला ऐकायचे नाही असे म्हणतात, अशांना त्यांच्या व्यक्‍तिगत जीवनाशी संबंधित असलेला प्रश्‍न विचारा:

◼ “नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर उभे असताना, तुम्हाला काय वाटते भविष्य चांगले असेल की वाईट? [उत्तरासाठी थांबा.] आज जी चिंताजनक परिस्थिती आपण पाहतो तिच्याविषयी बायबलमध्ये आधीच भाकीत केले होते, आणि यानंतर काय होईल हे देखील.” २ तीमथ्य ३:१, २, ५ आणि नीतिसूत्रे २:२१, २२ वाचा.

◼ “आपल्या देशात रोगराईबद्दल बरेच लोक चिंताग्रस्त आहेत. पण, देवाने सर्व प्रकारचे आजार कायमचे काढून टाकण्याचे आश्‍वासन दिले आहे हे तुम्हाला माहीत होते का?” प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.

◼ “प्रत्येकजण बायबलच्या तत्त्वांनुसार वागला तर आपल्या समाजाला कोणता फायदा होईल असे तुम्हाला वाटते? मत्तय २२:३७-३९ वाचा.

५ आपल्याला राज्याची सुवार्ता घोषित करण्याचे काम नेमून देण्यात आले असल्यामुळे, शक्य असेल तेथे आपण राज्याच्या आशीर्वादांबद्दलही सांगितले पाहिजे. तुम्ही असे म्हणू शकता:

◼ “जगातल्या सर्वात जुन्या ग्रंथात, अर्थात बायबलमध्ये भाकीत करण्यात आले आहे की एक दिवस असा येईल, जेव्हा सबंध जगात एकच सरकार असेल; तुम्हाला याविषयी माहीत होते का?” दानीएल २:४४ वाचा.

◼ “तुम्हाला काय वाटतं, या पृथ्वीवर येशू ख्रिस्त राज्य करू लागला तर जगाची परिस्थिती कशी असेल?” स्तोत्र ७२:७, ८ वाचा.

६ धार्मिक प्रवृत्तीचे लोक असलेल्या क्षेत्रात तुम्ही खालीलपैकी एखादी प्रस्तावना वापरू शकता:

◼ “स्त्रीपुरुषांत, धर्माधर्मांत किंवा विशिष्ट वर्णाच्या लोकांविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या भेदभावांमुळे कित्येक लोक अन्यायाला बळी पडतात. तुमच्या मते अशाप्रकारच्या भेदभावांविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे?” प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा.

◼ “येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले हे आपल्याला ठाऊक आहे. समजा तुम्हाला संधी मिळाली, तर तुम्ही त्याला कोणता चमत्कार करायला सांगाल?” स्तोत्र ७२:१२-१४, १६ वाचा.

७ घरमालकाला दार उघडण्याची इच्छा नाही असे दिसल्यास, तुम्ही संभाषण सुरू करण्याच्या उद्देशाने असे म्हणू शकता:

◼ “समस्यांबद्दल ऐकून ऐकून लोक कंटाळले आहेत. त्यांना उपाय हवे आहेत. साहजिकच तुम्हालाही असेच वाटत असेल. आपल्या समस्यांचे खरे उपाय कोठे सापडतील?” उत्तरासाठी थांबा. २ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.

८ प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? घरमालकाच्या मनात आस्था निर्माण करण्यासाठी सहसा काय आवश्‍यक असते, तर केवळ एक सरळसोपा, मुद्देसूद प्रश्‍न. पूर्वी साक्षीदारांचा विरोध करणाऱ्‍या एका स्त्रीने, तिच्याकडे आलेल्या दोन बहिणींना घरात घेतले, कारण त्यांपैकी एकीने तिला असा प्रश्‍न विचारला: “प्रभूची प्रार्थना म्हणताना तुम्ही ज्या राज्यासाठी प्रार्थना करता ते राज्य म्हणजे काय, तुम्हाला सांगता येईल का?” हा प्रश्‍न ऐकून ती स्त्री विचारात पडली आणि बायबल अभ्यास करायला तयार झाली. आज ती यहोवाच्या समर्पित सेवकांपैकी एक आहे!

९ घरमालकाशी बोलताना तुमच्या भाषेत, हावभावांत कोणताही नाटकीपणा असू नये. मनापासून बोला. लोकांना जेव्हा जाणीव होते की आपल्याला त्यांच्याबद्दल खरोखर काळजी वाटते, तेव्हा ते सहसा ऐकायला तयार होतात.—प्रे. कृत्ये २:४६, ४७.

१० आजच्या काळात सुवार्तेचा प्रचार करणे सोपे नाही. काहीजण अनोळखी लोक दिसताच शंकेखोर नजरेने बघतात. काहींचे जीवन इतके धकाधकीचे आहे की त्यांना कशासाठीच सवड नसते. तरीसुद्धा, राज्य संदेश ऐकण्यास योग्य असणारे असंख्य लोक अद्याप आहेत याची आपण खातरी बाळगू शकतो. (मत्त. १०:११) त्यांना शोधण्याचे आपले प्रयत्न कदाचित अधिक सफल होतील, जर आपण आपला संदेश थोडक्यात सांगू, अर्थात “मुद्द्‌याचं” बोलू!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा