घोषणा
◼ जूनसाठी साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जुलै आणि ऑगस्ट: पुढीलपैकी कोणतीही ३२-पानी माहितीपत्रके: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान.
◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने जून १ रोजी अथवा त्यानंतर होता होईल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. मग मंडळीत पुढच्या वेळी जमाखर्चाचा अहवाल वाचून दाखवल्यानंतर याची घोषणा करण्यात यावी.
◼ नियतकालिके किंवा इतर साहित्य न मिळाल्याबद्दल, कमी प्रमाणात मिळाल्याबद्दल अथवा खराब स्थितीत पोचल्याबद्दल संस्थेला लिहिताना मंडळ्यांनी साहित्याचा प्रकार, गहाळ किंवा खराब झालेल्या साहित्यांचे प्रमाण तसेच साहित्याची पाकिटे किंवा खोकी सुस्थितीत होती की नव्हती वगैरे पूर्ण तपशील २८ दिवसांत द्यावा अशी विनंती आहे. यामुळे मंडळ्यांना अधिक उत्तम सेवा पुरवण्यात संस्थेला मदत होईल.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
अप्लाय युवरसेल्फ टू रीडिंग ॲण्ड रायटिंग—इंग्रजी
लर्न टू रीड ॲण्ड राइट (ra) या पुस्तिकेऐवजी आता वर उल्लेखित ६४ पानी माहितीपत्रकाचा उपयोग केला जाईल. त्याची किंमत पायनियरांसाठी ८ रुपये तर प्रचारकांसाठी आणि जनतेसाठी १२ रुपये आहे.
कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१) आणि जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२)—ओरिया
◼ पुन्हा एकदा उपलब्ध असलेली प्रकाशने:
चर्चेसाठी बायबलचे विषय—मल्याळम, नेपाळी आणि तामीळ