वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९९ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km १/९९ पृ. ३

घोषणा

◼ जानेवारी: महिन्याकरता साहित्य सादरता: निम्मा दर आणि खास दर यादीतील १९२ पानांचे कोणतेही जुने पुस्तक. वडिलांकरता सूचना: संस्थेकडे कोणकोणत्या जुन्या पुस्तकांचा साठा आहे हे जाणून घेण्यासाठी आमची राज्य सेवा याचा ऑक्टोबर १९९८ अंक पाहावा. पुढेही वापरण्यासाठी तुम्ही ही पुस्तके मागवून करू शकता. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या महिन्यात गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न केला जाईल. एप्रिल: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वार्षिक वर्गण्या. आस्था दाखवणाऱ्‍यांसाठी अपेक्षा माहितीपत्रकही सोबत न्यावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा.

◼ जानेवारी ४ पासून सुरू होणाऱ्‍या आठवड्याच्या सेवा सभेला उपस्थित असणाऱ्‍या आणि बाप्तिस्मा झालेल्या सर्व प्रचारकांना आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड आणि त्यांच्या मुलांसाठी ओळख पत्र देण्यात येईल.

◼ या वर्षी गुरुवार, एप्रिल १ रोजी सूर्यास्त झाल्यानंतर स्मारकविधी पाळण्याच्या व्यवस्था मंडळ्यांनी करून ठेवाव्यात. भाषण आधी सुरू केल्यास हरकत नाही, पण स्मारकविधीची प्रतिके सूर्यास्त होईपर्यंत फिरवली जाऊ नयेत. तुमच्या शहरात सूर्यास्त किती वाजता होतो याविषयी आधीपासून माहिती काढावी. प्रत्येक मंडळीला स्वतंत्र स्मारकविधी समारोह साजरा करणे शक्य असल्यास उत्तम, पण हे नेहमीच शक्य होत नाही. जर दोन तीन मंडळ्या एकाच राज्य सभागृहात सभा घेत असतील, तर त्यांपैकी एखाद दोन मंडळ्यांना बाहेर कुठेतरी व्यवस्था करावी लागेल. जेथे एकापेक्षा जास्त मंडळ्या सभा घेणार असतील अशा ठिकाणी दोन सभांमध्ये कमीतकमी ४० मिनिटांचा अवधी असावा; यामुळे येणाऱ्‍या लोकांना भेटायला, नवीन लोकांना प्रोत्साहन द्यायला पुरेसा वेळ मिळेल आणि अशारितीने या कार्यक्रमाचा पुरेपूर फायदा घेणे शक्य होईल. वाहतुकीच्या आणि पार्किंगच्या समस्या उद्‌भवू नयेत म्हणून काळजी घ्यावी, तसेच लोकांना कार्यक्रमाला आणण्याचे आणि नंतर त्यांना पोचवण्याचे कामही सुरळीत पार पडावे याची काळजी घेण्यात यावी. मंडळीच्या सर्व वडिलांनी मिळून आपल्या मंडळीसाठी सर्वात सोयीस्कर पडणाऱ्‍या व्यवस्था कराव्यात.

◼ यावर्षी स्मारक विधीनंतरचे खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल १८ रोजी देण्यात येईल. यंदाचा विषय आहे, “देवासोबत आणि शेजाऱ्‍यासोबत खरी मैत्री.” या भाषणाची रूपरेषा दिली जाईल. या आठवडी ज्यांची विभागीय पर्यवेक्षकांची भेट, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिन असेल अशा मंडळ्यांत हे खास भाषण त्याच्या पुढच्या आठवडी दिले जावे. एप्रिल १८, १९९९ च्या आधी कोणत्याही मंडळीत हे खास भाषण दिले जाऊ नये.

◼ उपलब्ध असणारी नवी प्रकाशने:

तुमची काळजी वाहणारा एक सृष्टिकर्ता अस्तित्वात आहे का?—इंग्रजी

आपण मरतो तेव्हा आपले काय होते?—इंग्रजी

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे—कन्‍नड, नेपाळी, मराठी आणि हिंदी

सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान—आसामी आणि ओरिया

पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्यात व त्या कशा चालू ठेवाव्यात (रीझनींग पुस्तकातून ९-२४ पृष्ठांवर आधारित) (१६-पृष्ठे)—नेपाळी

◼ नवी ध्वनीफीत:

तुमचा डोळा निर्दोष असू द्या (एक ध्वनीफीत)—इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी

(या ध्वनीफितीची किंमत पायनियरांसाठी ६०.०० रुपये आणि प्रचारकांसाठी ७०.०० रुपये आहे)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा