नोव्हेंबरसाठी सेवा सभा
नोव्हेंबर २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३८ (१६)
१० मि: मंडळीच्या घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशासाठी आणि मंडळीसाठी असलेल्या जुलैच्या क्षेत्र सेवा अहवालाविषयी सांगा.
१५ मि: “सर्वांनी ‘मनापासून वचनाचा स्वीकार केला पाहिजे!’” प्रश्नोत्तरे. जून १९९६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत २१ व्या परिच्छेदात दिलेल्या अधिक सूचना देखील समाविष्ट करा.
२० मि: “मला एक बायबल अभ्यास हवा आहे!” सर्व्हिंस ओवरसियर श्रोत्यांसोबत चर्चा करतात. पुनर्भेटी करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करता यावा म्हणून मंडळीमध्ये कोणत्या योजना आखल्या जातील याचे स्पष्टीकरण द्या. शक्यतो अनुभवी प्रचारकांनी नवीन लोकांसोबत कार्य करावे. मे १९९८ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत परिच्छेद १२ ते १५ मध्ये दिलेल्या उपयोगी सूचनांची उजळणी करा. पुनर्भेटीमध्ये बायबल अभ्यास कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक एका कार्यक्षम प्रचारकाकडून करून घ्या. सर्वांना नवीन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला उत्तेजन द्या.
गीत ३५ (२३) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १८७ (१७)
१३मि: मंडळीच्या घोषणा. अकाउंट्स रिपोर्ट. प्रश्न पेटी.
१५ मि: मंडळीच्या गरजा.
१७ मि: “आपल्या उत्तरांद्वारे एकमेकांची उभारणी करा.” प्रश्नोत्तर. उत्तरांद्वारे आपली आध्यात्मिक प्रगती कशी होते याचे स्पष्टीकरण द्या. (स्कूल गाईडबुक) ३८ व्या अभ्यासातील परिच्छेद ४ पाहा.) उत्तरे देण्याच्या भीतीवर मात कशी केली आणि सभांमध्ये उत्तरे दिल्यामुळे कोणकोणता फायदा झाला याविषयी काहींना विचारा.
गीत ५१ (७) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १८२ (२४)
८ मि: मंडळीच्या घोषणा. “भारतीय भाषांमध्ये सोल” या पेटीची चर्चा करा.
२० मि: “पुढाकार घेणारे ओव्हरसियर—थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल ओव्हरसियर.” स्कूल ओवरसियारचे भाषण. स्कूल गाईडबुक पृष्ठे १० आणि ११ वरील परिच्छेद ६ ते १२ ची उजळणी करा.
१७ मि: “उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्हेने सेवा करा.” पुरवणीतील परिच्छेद १ ते ७ ची प्रश्नोत्तरांद्वारे चर्चा. तुमच्या क्षेत्रात विशेष लागू होणाऱ्या मुद्दांवर जोर द्या.
गीत १६७ (२६) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ८९ (२३)
८ मि: मंडळीच्या घोषणा. ऑगस्ट ८ १९९८ च्या सावध राहा! (इंग्रजी) मासिकाच्या शेवटच्या पानावर दिलेला अनुभव सांगा; सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाने लोकांच्या मनावर किती छाप पाडली आहे याबद्दलचा तो अनुभव आहे. संधी मिळताच हे पुस्तक सादर करण्याचा सर्व प्रचारकांनी प्रयत्न केला पाहिजे.
१७ मि: “उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्हेने सेवा करा.” पुरवणीतील परिच्छेद ८ ते २१ ची प्रश्नोत्तरांद्वारे चर्चा. तुमच्या क्षेत्रात विशेष लागू होणाऱ्या मुद्दांवर जोर द्या.
२० मि: तुमचे बायबल वाचन सुधारण्यासाठी काही उपयोगी सूचना. मे १, १९९५ टेहळणी बुरूज, १६-१७ पानांवर आधारित भाषण. दररोज बायबल वाचल्यामुळे मिळणारे आध्यात्मिक फायदे स्पष्ट करा. दिलेल्या सूचनांची उजळणी करा आणि त्या लागू कशा कराव्यात याची चर्चा करा. देवाच्या वचनाचे नियमितपणे वाचन केल्यामुळे कसा फायदा होतो हे दोन किंवा तीन प्रचारकांना विचारा.
गीत ४६ (५) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६४ (७)
१५ मि: मंडळीच्या घोषणा. सर्वांना आपापला क्षेत्र सेवेचा रिपोर्ट देण्याची आठवण करून द्या. नोव्हेंबर महिन्यात ज्यांना नवीन बायबल अभ्यास सुरू करता आला नाही अशांना डिसेंबर महिन्यातही प्रयत्न करत राहण्याचे उत्तेजन द्या, कारण त्या महिन्यात आपण क्षेत्रात नवीन जग भाषांतर (इंग्रजी) यासोबतच ज्ञान पुस्तक सादर करणार आहोत. ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १९ वर दिलेल्या पेटीचा उपयोग करून पुनर्भेट कशी करावी याचे एका कार्यक्षम प्रचारकाकडून प्रात्यक्षिक करून घ्या; बायबलच्या शिकवणुकींची समज प्राप्त करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे स्पष्टीकरण देऊन प्रचारक अभ्यास सुरू करतो.
१५ मि: यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९९ च्या कॅलेंडरचा चांगला उपयोग करा. भाषण. कॅलेंडरच्या पुढील वैशिष्ट्यांची उजळणी करा (१) बायबलमधल्या महत्त्वपूर्ण घटनांची आकर्षक चित्रे, (२) थियोक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूलच्या दर आठवड्याचा बायबल वाचनाचा आराखडा, (३) स्मारक विधीच्या सप्ताहासाठी असलेला वार्षिक बायबल वाचनाचा आराखडा, (३) पुढे होणाऱ्या रिटन रिव्ह्यूची सूचना, आणि (५) नियमितपणे मासिक सेवेत सहभाग घेण्याची आठवण करून देणाऱ्या सूचना. कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर असलेल्या जागेचा कसा उपयोग करता येईल ते सांगा: कोणकोणत्या दिवशी तुम्ही क्षेत्र सेवेत जाऊ शकता त्या तारखांवर खूण करून ठेवण्यासाठी, क्षेत्र सेवेचा रिपोर्ट लिहिण्यासाठी, कोणासोबत क्षेत्र सेवेत जायचे ठरवले असल्यास ते लिहून ठेवण्यासाठी, सभांमध्ये तुम्हाला मिळालेल्या आसाईन्मेंट्सची नोंद करण्यासाठी, सर्किट ओवरसियरच्या व्हिझिटची तसेच पुढे येणाऱ्या असेंब्लीसच्या तारखा नोंदून ठेवण्यासाठी. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सहज दिसेल अशा ठिकाणी कॅलेंडर लावल्यामुळे बायबलवर चर्चा सुरू करण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. १९९८ इयरबुक यातील पृष्ठ ८ वर दिलेला अनुभव सांगा.
१५ मि: “पुनर्भेटी करण्यासाठी धैर्य एकवटा.” मार्च १९८८ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत दिलेल्या माहितीवर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा. सुवार्तेविषयी थोडीशी गोडी दाखवणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा भेट दिली जावी यावर जोर द्या.
गीत १२१ (२१) व समाप्तीची प्रार्थना.