वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९८ पृ. २
  • सप्टेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २१ पासून सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९८
km ९/९८ पृ. २

सप्टेंबरसाठी सेवा सभा

सप्टेंबर ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २८ (२०)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “एक सूचना” या पेटीवर पुनर्विचार.

१५ मि: “आपण त्यापेक्षा मोठी कार्ये करू शकतो.” प्रश्‍नोत्तरे. नवीन सेवा वर्षासाठी वाजवी ध्येये ठेवायला आणि ती साधण्यासाठी परिश्रम करायला सर्वांना उत्तेजन द्या.—पाहा आपली सेवा, पृष्ठे ११६-१८.

२० मि: “पायनियर साह्‍य कार्यक्रम.” ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणाव्यतिरिक्‍त पायनियरांनी व्यक्‍तिगतपणे इतरांना सेवेत साहाय्य करावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे असे एक वडील सांगतात. या लेखावर आधारित प्रश्‍न ते विचारतात आणि विशेषतः या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्‍या पायनियरांना व प्रचारकांना काही विचार मांडायला सांगतात. त्यातून सर्वोत्तम लाभ कसा मिळवावा यावर विचारविनिमय करा. पायनियरांना हे कसे आवडले आहे तसेच इतरांचे साहाय्य करण्यात त्यांना काय फायदा झाला आहे हे पायनियर सांगू शकतात. या प्रेमळ तरतुदीची कदर कशी वाटते आणि सेवेमध्ये अधिक यश व आनंद कशामुळे मिळाला याबद्दल मदत मिळालेले प्रचारक सांगू शकतात.

गीत १७२ (४) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६० (६)

५ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? भाषण. पुढच्या आठवडी पुस्तक अभ्यासात आपण या माहितीपत्रकाचा अभ्यास सुरू करणार आहोत. त्या माहितीपत्रकाविषयी नीट समजून घ्यावे आणि इतरांसोबत त्याचा अभ्यास करायला शिकावे म्हणून सर्वांना आधी तयारी करायला आणि प्रत्येक अभ्यासाला हजर राहायला उत्तेजन द्या. “या माहितीपत्रकाचा उपयोग कसा करावा” या खालचा परिच्छेद वाचा. शिकवताना माहितीपत्रकातील प्रश्‍ने, शास्त्रवचने आणि चित्रे किती महत्त्वपूर्ण आहेत यावर जोर देण्यासाठी जानेवारी १५, १९९७ टेहळणी बुरूज, पृष्ठे १६-१७ वरील साहित्य उपयोगात आणा. पुस्तक अभ्यास चालकांनी, जास्त न बोलता व फारसे इकडचे तिकडचे तपशील न देता गृह बायबल अभ्यास चालकांसमोर आपले उत्तम उदाहरण मांडावे.—आमची राज्य सेवा, जून १९९६ पृष्ठ ३, परिच्छेद ५ पाहा.

१० मि: मागच्या वर्षी आपण काय केले? सचिव आणि सेवा पर्यवेक्षक मागच्या वर्षाचा मंडळीचा सेवा अहवाल आणि सभांच्या उपस्थितीचे आकडे पाहतात. ते अहवालातील सकारात्मक पैलू दाखवून देतात आणि कोठे प्रगती करता येईल याकडे अधिक लक्ष देतात. ऑगस्टदरम्यान सेवाकार्यात १०० टक्के सहभाग होता का? येत्या महिन्यांमध्ये वडील कोणत्या ध्येयांवर अधिक लक्ष देतील त्याचप्रमाणे सर्वांना नियमित प्रचारक होण्यासही कशी मदत करतील ते सांगा. विभागीय पर्यवेक्षकांच्या मागच्या अहवालातील उचित मुद्दे सांगा.

२० मि: “१९९८ ‘ईश्‍वरी जीवनाचा मार्ग’ प्रांतीय अधिवेशने.” (परिच्छेद १-१६) प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद १० आणि ११ वाचा. आपला सभ्य ख्रिस्ती पेहराव व वागणूक आणि आपल्या मुलांवर नीट लक्ष ठेवणे यांच्या शास्त्रवचनीय महत्त्वावर जोर द्या.

गीत १४४ (४) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २१ पासून सुरू होणारा सप्ताह

गीत १२२ (२३)

५ मि: स्थानिक घोषणा.

२० मि: “बांधवांशी जवळीक साधा.” प्रश्‍नोत्तरे. ऑक्टोबर १, १९९८, टेहळ णी बुरूज, पृष्ठे १०-११ वरील टिपणींचा समावेश करा. सर्वांना एकमेकांशी चांगला परिचय करून घेण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: “१९९८ ‘ईश्‍वरी जीवनाचा मार्ग’ प्रांतीय अधिवेशने.” (परिच्छेद १७-२२) प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद १७ वाचा आणि तेथे उल्लेखलेले शास्त्रवचन सुद्धा. नीटनेटकेपणा आणि इतरांबद्दल विचारशील असण्यावर जोर द्या—विशेषतः बैठकींच्या बाबतीत. “अधिवेशन स्मरणिका” यांची उजळणी करून थोडक्यात समाप्त करा.

गीत ३४ (९) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १७ (७)

१२ मि: स्थानिक घोषणा. सप्टेंबरचे सेवा अहवाल द्यायची प्रचारकांना आठवण करून द्या. ऑक्टोबरमध्ये नियतकालिकांचे जास्त वाटप करण्यासाठी अधिक घरोघरचे कार्य करावे अशी योजना करायला सर्वांना उत्तेजन द्या. सादरता कशा तयार कराव्यात यावरील सल्ला पाहण्यासाठी ऑक्टोबर १९९६, आमची राज्य सेवा, पृष्ठ ८ चा संदर्भ द्या. चालू नियतकालिके वापरून एक सादरता करून दाखवा.

२० मि: “पुढाकार घेणारे पर्यवेक्षक—सेवा पर्यवेक्षक.” सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. त्यांच्या जबाबदाऱ्‍यांविषयी सांगून झाल्यावर, स्थानिकरित्या सेवाकार्याची व्यापकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी मंडळी कोणत्या विशिष्ट मार्गांनी सहकार्य देऊ शकते याविषयी ते सांगतात.

१३ मि: मंडळीत उत्तम प्रचारक कशामुळे होतात? श्रोत्यांचा थोडाफार सहभाग असलेले भाषण. खास क्षमता अथवा कौशल्ये असण्याची गरज नाही; त्याउलट, आपणा सर्वांजवळ प्रीती, नम्रता, आवेश आणि कदर हे गुण असलेली ऐच्छिक मनोवृत्ती असावी हेच सर्वात इष्ट आहे. पुढील गोष्टी आवश्‍यक का आहेत याची कारणे श्रोत्यांना विचारा: (१) आनंदी आत्मा, (२) सभांमध्ये नियमित उपस्थिती आणि सहभाग, (३) नेमणुका स्वीकारून त्या पूर्ण करण्याची तयारी, (४) वडिलांना आणि मंडळीसाठी केल्या जाणाऱ्‍या योजनांना सहकार्य देणे, (५) इतरांना मदत देण्याची मनापासूनची इच्छा आणि (६) क्षेत्र सेवेत नियमित सहभाग आणि दर महिन्याला तत्परतेने अहवाल देणे.

गीत २५ (२) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा