वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९८ पृ. १
  • यहोवाचा आत्मा आपल्या पाठीशी आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा आत्मा आपल्या पाठीशी आहे
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शित—पहिल्या शतकात आणि आज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याद्वारे आपल्या समर्पणाचे वचन पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आज देवाचा आत्मा कसा कार्य करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार का चालावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ५/९८ पृ. १

यहोवाचा आत्मा आपल्या पाठीशी आहे

१ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्यावर एक मोठी कार्यनियुक्‍ती आहे. येशूने म्हटले: “प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) मानवी दृष्टिकोनातून पाहता हे अशक्य वाटत असले, तरी तसे मुळीच नाही. विश्‍वातील सर्वाधिक प्रबळ शक्‍ती—देवाचा आत्मा, आपल्या पाठीशी आहे.—मत्त. १९:२६.

२ पहिल्या शतकातील पुरावा: यशयाची भविष्यवाणी स्वतःस लागू करून येशूने म्हटले: ‘सुवार्ता सांगण्यासाठी यहोवाचा आत्मा माझ्यावर आला आहे.’ (लूक ४:१७, १८) स्वर्गारोहणापूर्वी त्याने आपल्या प्रेषितांना सांगितले की, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्ष देण्यासाठी त्यांना देखील पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्यवान केले जाईल. त्यानंतर, एका कुशी अधिकाऱ्‍याला प्रचार करण्यास पवित्र आत्म्याने फिलिप्पाला निर्देशित केले; याच आत्म्याने पेत्राला एका रोमी शताधिपतीकडे पाठविले, तर विदेशी राष्ट्रांना प्रचार करण्यासाठी पौल व बर्णबाला पाठविले. अशा पार्श्‍वभूमीतील लोक सत्याला प्रतिसाद देतील असा कोणी विचार तरी केला असता का? पण त्यांनी प्रतिसाद दिला.—प्रे. कृत्ये १:८; ८:२९-३८; १०:१९, २०, ४४-४८; १३:२-४, ४६-४८.

३ आधुनिक-दिवसीय पुरावा: प्रकटीकरणाचे पुस्तक, आजच्या प्रचार कार्यामधील पवित्र आत्म्याच्या सहभागावर भर देऊन म्हणते: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. . . . ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटी. २२:१७) या आत्म्याने सर्व लोकांस प्रचार करण्यासाठी ख्रिस्ताच्या वधूवर्गाला आणि त्यांच्या सोबत्यांना अर्थात ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ उत्तेजित केले आहे. (योहा. १०:१६) प्रचार करण्यात आपण निर्भीड असले पाहिजे; सर्व प्रकारच्या लोकांचा संपर्क साधण्यास आपण कदापि कचरू नये आणि असे करत असताना देवाचा आत्मा आपल्याला साह्‍य करील याविषयी नेहमी विश्‍वस्त असावे. देवाचा आत्मा सतत त्याच्या सेवकांच्या पाठीशी असल्याचा खात्रीलायक पुरावा १९९८ वार्षिकपुस्तक देते. पुढील परिणामांचाच विचार करा! मागील दोन सेवा वर्षांदरम्यान, प्रत्येक दिवशी सरासरी १,००० हून अधिकांचा बाप्तिस्मा झाला.

४ यहोवाची इच्छा आहे त्या टोकापर्यंत आपण राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असताना देवाचा आत्मा सतत आपल्या पाठीशी राहील याविषयी विश्‍वस्त असा. हे माहीत असल्याने, सर्वात महत्त्वपूर्ण राज्यकार्यात कसोशीने खटपट करत राहण्याचे आपल्याला प्रोत्साहन व उत्तेजन मिळाले पाहिजे.—१ तीम. ४:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा