ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत जानेवारी ५ ते एप्रिल २०, १९९८ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
लपुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. प्रेषितांची कृत्ये १५:२९ येथील “क्षेमकुशल असो” हे उद्गार, ‘जर तुम्ही रक्त किंवा जारकर्म वर्ज्य केले तर तुमचे बरे होईल,’ याच्या अनुषंगाने लिहिले होते. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ ४/१ पृ. २५ परि. ७ तळटीप.]
२. करिंथमधील ख्रिश्चनांच्या आध्यात्मिक भल्यासाठी असलेल्या गंभीर चिंतेमुळे पौल त्यांना आपले पहिले पत्र लिहिण्यास प्रेरित झाला त्यावेळी तो आपल्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्यावर होता. [si पृ. २१० परि. ३]
३. इजिप्शियन लोकांच्या मते फारो, ससाण्याचे डोके असलेल्या होरस नामक देवतेचा अवतार होता. [w-MR९६ १/१५ पृ. २४ परि. १]
४. प्रेषितांची कृत्ये ८:९-२४ येथे नमूद केलेल्या घटनेमुळे रूढ झालेला “सिमनी” हा इंग्रजी शब्द जादूटोणा करण्यास सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९१ १/१ पृ. १३ परि. ८.]
५. रोमकर ८:६, ७ येथील “देह” या शब्दाचा अर्थ पापिष्ट प्रवृत्त्यांचा वारसा असलेले अपरिपूर्ण मानव या नात्याची आपली पतित स्थिती असा होतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ १/१ पृ. २४ परि. ४.]
६. देवाने नंतर धान्याची व इतर शेतीच्या उत्पन्नाची अर्पणे स्वीकारली, पण त्याने काइनाच्या बलिदानाचा अव्हेर केला याचा अर्थ असा, की त्याच्या अंतःकरणात खोट होती. (उत्प. ४:३-५) [w-MR९६ ६/१५ पृ. ४ परि. ८)
७. एखादा ख्रिस्ती बायबलमधील नैतिक आणि आध्यात्मिक दर्जे स्वतःच्या जीवनात कार्यान्वयित करतो तसे तो यहोवाच्या वचनाद्वारे स्वच्छ होतो आणि यहोवा ज्या चालिरीतींची घृणा करतो त्यांपासून तो ‘धुऊन स्वच्छ’ होतो. (१ करिंथ. ६:९-११) [w-MR९६ १/१ पृ. ३० परि. ४]
८. करिंथमधील स्तेफनाच्या घराण्यातील सदस्यांना स्वतः पौलाने बाप्तिस्मा दिला होता. [w-MR९६ ६/१५ पृ. २९ परि. २]
९. प्रेषितांची कृत्ये २०:२० येथील “घरोघरी” हा शब्द आपल्या समविश्वासू बांधवांच्या घरी ज्या मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्या जातात त्यास सूचित होतो कारण संदर्भ असे दाखवून देतो, की पौल त्या मंडळीतील वडीलजनांचा उल्लेख करत होता. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ २/१ पृ. २३ परि. ५.]
१०. आपण आपल्या अंतःकरणाला आध्यात्मिक गोष्टींची रसिकता बाळगण्याची तालीम दिली, याबद्दल देवाला त्याच्या आत्म्याद्वारे मदत करण्याची विनंती केली, तर आपण “देहाचे चिंतन” करण्याचे टाळू. (रोम. ८:६, ७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९२ १/१ पृ. २४ परि. ५.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. जीवनाच्या मार्गाकडे नेणारे अचूक ज्ञान प्राप्त करण्यासाठी देवाचे वचन सुलभ होणे आणि ते व्यक्तिगतरीत्या वाचणे पुरेसे नाही, हे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील कोणत्याही अहवालावरून दिसून येते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९१ ९/१ पृ. १९ परि. १६.]
१२. आपल्या आध्यात्मिक बांधवांचा टिकात्मक न्याय करण्याचे टाळण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीने मदत करण्यास हवी? [w-MR९६ ३/१५ पृ. २२ परि. ५]
१३. नवे जग भाषांतर (इंग्रजी) प्रेषितांची कृत्ये ११:२६ येथे “ईश्वरी मान्यतेने ख्रिस्ती संबोधणे” ही संज्ञा वापरते, पण इतर बायबल भाषांतरांमध्ये ‘ईश्वरी मान्यता’ या कल्पनेचा समावेश होत नाही ते का? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९१ १/१ पृ. १५ परि. १९]
१४. आपल्या पतीला गाढ आदर देण्यासाठी ख्रिस्ती पत्नीला काय मदत करील? (इफिस. ५:३३) [w-MR९६ ३/१ पृ. २१ परि. ५]
१५. प्रेषितांची कृत्ये १७:११ येथे कोणत्या प्रकारचा व्यक्तिगत अभ्यास करण्याचे उत्तेजन दिले आहे? [si पृ. २०५ परि. ३८]
१६. रोममधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या आपल्या पत्रात पौलाने यहुदी आणि गैरयहुदी यांच्याबद्दल कोणती गोष्ट ठामपणे सांगितली? [si पृ. २०६ परि. २]
१७. रोमकर १२:२ नुसार देवाच्या वचनाद्वारे ख्रिश्चनांचे व्यक्तिमत्त्व केवढ्या प्रमाणात बदलते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० ११/१ पृ. २३ परि. ३.]
१८. रोमकर ११:२५ येथे पौलाने उल्लेखलेले ‘पवित्र रहस्य’ काय आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८३ ८/१५ पृ. १६ परि. १६.]
१९. अपश्चात्तापी पातक्याला मंडळी बहिष्कृत करते तेव्हा ते न्याय्य का असते? (१ करिंथ. ५:११, १३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g-MR९६ १०/८ पृ. २५ परि. २-३.]
२०. मस्तकावर निखाऱ्याची रास करण्याद्वारे वाईटाला जिंकण्यास कशी मदत होईल? (रोम. १२:२०, २१) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g८६ १/२२ पृ. ६ परि. ५.]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. _________________________ येथील भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली हे फिलिप्पाने इथोपियन षंढाला सांगितले आणि ते समजल्यानंतर त्याने नम्रपणे _________________________ विनंती केली. (प्रेषितांची कृत्ये ८:२८-३५) [si पृ. २०४ परि. ३३]
२२. _________________________ विषयावर वादविवाद चालू होता तेव्हा _________________________ असे म्हणून आपल्या निर्णयाचे समर्थन केले: “ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाहि मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे.” (प्रेषितांची कृत्ये १५:१५-१८) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा si पृ. २०४ परि. ३३.]
२३. _________________________ हा गुण ‘इतरांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानण्यास’ आपल्याला मदत करतो तर _________________________ आपल्याला “सहनशील” राहण्यास साहाय्य करते. (फिलिप्पै. २:३; २ तीम. २:२४, २५) [w-MR९६ ५/१५ पृ. २१ परि. ५]
२४. रोमकरांस पत्र याच्या ११ व्या अध्यायात पौलाने दिलेल्या लाक्षणिक जैतूनाच्या झाडाच्या दृष्टान्तानुसार, इस्राएलाचे १२ वंश अब्राहामापासून इसहाकाद्वारे उत्पन्न झाले त्याअर्थी _________________________ १२ लाक्षणिक वंश _________________________ _________________________ उत्पन्न होतात. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८३ ८/१५ पृ. १६ परि. १५.]
२५. _________________________ नामक अरण्यात इस्राएलांनी तळ दिलेला असताना यहोवाने त्यांना सांभाळले, तशाचप्रकारे _________________________ तो आपला सांभाळ करू शकतो. [w-MR९६ ८/१५ पृ. ७ परि. १-२]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२६. प्रेषितांची कृत्ये अध्याय १७ येथे पौल आपल्या भाषणात मोठ्या हुशारीने जिवंत देवाचे (सार्वभौमत्व, धार्मिकता; प्रेम) पटवून देतो. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा si पृ. २०४ परि. ३७.]
२७. (बिरुयातील; मासेदोनियातील; जेरूसलेमेतील) लोकांच्या शास्त्रवचनांतील परिश्रमपूर्वक परीक्षणामुळे (पौलाने; पेत्राने; लूकने) त्यांची प्रशंसा केली. (प्रेषितांची कृत्ये १७:११) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९५ ५/१ पाहा पृ. १४ परि. ३.]
२८. रोमकरास पत्र १:२५ येथे उल्लेख करण्यात आलेली लबाडी किंवा खोटेपणा याचा (मूर्तिपूजा; अशुद्ध लैंगिक आचरण; खोटे बोलण्याची सवय) याजशी संबंध आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w९१ ११/१५ पृ. ६ परि. ६.]
२९. खरे पाहता, काही अनिष्ट घडते तेव्हा त्यासाठी सहसा (लोक; देव आणि ख्रिस्त; सैतान आणि दुरात्मे) जबाबदार असतात. [w-MR९६ पृ. ५ परि. ३]
३०. पौलाने करिंथकरांना आपले पहिले पत्र सा. यु. (५२; ५५; ५६) च्या सुमारास (रोम; इफिस; करिंथ) येथे असताना लिहिले. [si पृ. २१० परि. ३]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
नीति. १७:२७; उप. ९:११; मत्त. १०:१६; प्रे. कृत्ये १०:३४, ३५; २ करिंथ. ४:१८
३१. यहोवाचे सेवक असल्यामुळे आपण भिन्न गटाच्या लोकांना यहोवा जसे पाहतो त्याप्रमाणेच पाहिले पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८९ ८/१ पृ. ८ परि. ६.]
३२. आपण आपल्या विद्यमान परिस्थितींच्या पलीकडे पहावे व ख्रिस्ती मार्गाचे अनुसरण केल्यामुळे उद्भवणाऱ्या आनंदी परिणामावर आपले नेत्र ठेवावे. [w-MR९६ २/१५ पृ. २७ परि. ३-४]
३३. समंजसपणा व बंधुप्रेम हे, अविचारीपणे दुखावणारे शब्द बोलण्याच्या अनावर इच्छेवर ताबा मिळवण्यास आपल्याला मदत करतील. [w-MR९६ ५/१५ पृ. २२ परि. ७]
३४. छळाचा सामना करत असताना इतरांना राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यासाठी खऱ्या ख्रिश्चनांनी दक्षतेची आणि पावित्र्याची सांगड घातली पाहिजे. [w-MR९६ ७/१५ पृ. २२ परि. ४.]
३५. दुर्घटनांमागे निर्माणकर्त्याचा हात असतो किंवा दुर्घटनांना बळी पडणाऱ्यांना कोणत्यातरी प्रकारे शिक्षा दिली जात आहे असे समजण्यासाठी काहीही आधार नाही. [w-MR९६ ९/१ पृ. ५ परि. ४]