मार्चसाठी सेवा सभा
मार्च २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३ (१६)
८ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” वडिलांचे भाषण. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित, या पुस्तकातील पृष्ठे ८०-१ वर विवेचने मांडा; स्मारकविधीला उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
२२ मि: “इतरांच्या मनात सार्वकालिक जीवनाची आशा रुजवा.” श्रोत्यांसोबत लेखाची चर्चा. संभाषण चालू ठेवण्यासाठी प्रश्नांचा प्रभावीपणे उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे संक्षिप्त स्पष्टीकरण द्या. एखाद्या प्रस्तुतीमध्ये वापरता येऊ शकतील अशा सहायक आणि दृष्टिकोनात्मक प्रश्नांची काही उदाहरणे द्या. (पाहा प्रशाला मार्गदर्शन पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे ५१-२, परिच्छेद १०-१२.) एखाद्या कार्यक्षम प्रचारकाकडून, पहिल्याच भेटीसाठी व पुनर्भेटीसाठी सुचवलेल्या एखाद्या प्रस्तुतीचे प्रात्यक्षिक दाखवून बायबल अभ्यास कसा सुरू करावा ते दाखवा.
गीत ८८ (६) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६० (१७)
८ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: १९९८ वार्षिक पुस्तक (इंग्रजी) याचा पुरेपूर लाभ घ्या. एक पिता आपल्या कुटुंबासोबत पृष्ठे ३-६, ३१ ची उजळणी करून मागील वर्षाच्या विश्वभरातील ईश्वरशासित साध्यतांच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधतो. भोजनाच्या वेळी दैनिक वचन आणि वार्षिक पुस्तक याचे वाचन करून त्यावर चर्चा करण्याद्वारे कुटुंबाला अनुभवण्यास मिळणारे लाभ विचारात घ्या; वर्षभर हे करण्याचा निर्धार करा.
२२ मि: “आपण पुन्हा करणार का?” (परिच्छेद १-११) प्रश्नोत्तरे. १९९८ वार्षिक पुस्तक यात दिलेल्या मागील वर्षीच्या सहायक पायनियर मोहिमेचे ठळक मुद्दे सांगा. त्या काळादरम्यान तुमच्या मंडळीत किती लोकांनी सहायक पायनियरींग केले ती संख्या सांगा. पायनियरींग केल्यामुळे मिळणाऱ्या तत्काळ वैयक्तिक लाभांची चर्चा करा आणि हे अतिरिक्त प्रयास मंडळीच्या प्रगतीस कसे योगदान देतात ते दाखवा. एप्रिल आणि मे महिन्यांत, अनेकांना पायनियरींग करण्यास मदत करण्याच्या हेतूने स्थानिकरित्या आयोजित केलेल्या सेवा व्यवस्थांची रूपरेषा सांगा. सभेनंतर प्रचारक पायनियरींगसाठी अर्ज प्राप्त करू शकतात.
गीत १९५ (८) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ (४)
८ मि: स्थानिक घोषणा. सर्व आस्थेवाईकांना, मार्च २९ रोजी होणाऱ्या खास भाषणासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण द्या. भाषणाचे शीर्षक आहे, “तुम्ही बायबलवर भरवसा का ठेवू शकता.”
१५ मि: स्थानिक गरजा.
२२ मि: “आपण पुन्हा करणार का?” (परिच्छेद १२-१९) प्रश्नोत्तरे. आपली सेवा पुस्तकात पृष्ठे ११३-१४ वर दिलेल्या पात्रतांची उजळणी करा. सहायक पायनियरींग, नियमित पायनियरींगसाठी कसे तयार करते त्याचे स्पष्टीकरण द्या. साठ तास भरून काढण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मागच्या उन्हाळ्यात सहायक पायनियरींग केलेल्यांनी वेळेचे कसे काय समायोजन केले, ते सांगण्यास त्यांना आमंत्रित करा. पुरवणीच्या शेवटच्या पृष्ठावरील आराखड्याचा कोणता नमुना त्यांच्यासाठी सर्वात सोईस्कर ठरला? वेळ असल्यास १९८७ वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ४८-९, २४५-६ मधील अनुभव सांगा. प्रचारकांना, सभेनंतर अर्ज प्राप्त करण्याचे उत्तेजन द्या.
गीत २२४ (२८) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९४ (५)
१० मि: स्थानिक घोषणा. एप्रिल ११ रोजी होणाऱ्या स्मारकविधीसाठी आस्थेवाईकांना आमंत्रण द्यायला सुरवात करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. आमंत्रणाची एक प्रत दाखवा आणि याचा साठा प्राप्त करून त्याचे वितरण करण्यास सुरू करण्याचा सगळ्यांना आर्जव करा. एप्रिलमध्ये सहायक पायनियरींग करणाऱ्या सर्वांची नावे घोषित करा. अर्ज देण्यास अजूनही उशीर झालेला नाही याचे स्पष्टीकरण द्या. एप्रिलच्या सेवेसाठी योजिलेल्या सभांच्या संपूर्ण आराखड्याची रूपरेषा सांगा.
२० मि: नवोदितांना क्षेत्र सेवेसाठी तयार करा. भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. ज्ञान पुस्तकातून अभ्यास संचालित करणाऱ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना क्षेत्र सेवेसाठी तयार करण्याचा विचार करावा. ज्ञान पुस्तकात पृष्ठे १०५-६, परिच्छेद १४, आणि पृष्ठ १७९, परिच्छेद २० मध्ये दिलेली माहिती निदर्शनास आणा. बाप्तिस्मा प्राप्त न झालेले प्रचारक म्हणून ओळखले जाण्यासाठी ऑगस्ट १, १९८९ टेहळणी बुरूज पृष्ठे १९-२०, परिच्छेद ७-१० मध्ये दिलेल्या पद्धतीची उजळणी करा. सेवेत रुजू होण्यासाठी बाप्तिस्मा न झालेल्या नवीन प्रचारकांना मदत देण्यासंबंधी जून १९९६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीत, परिच्छेद १९ मध्ये दिलेल्या सूचना विचारात घ्या.
१५ मि: प्रश्न पेटी. प्रश्नोत्तरे. वडील, आपली सेवा पुस्तकातील पृष्ठ १३१ वरील परिच्छेद १ आणि २ मधील माहितीची उजळणी करतात.
गीत ४७ (११) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत २९ (१८)
१२ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना मार्चचा आपला क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नियतकालिकांचे नवीन अंक दाखवा, ते सादर करताना कोणते लेख तुम्ही मुख्यतः दाखवू शकता ते सुचवा आणि काही विशिष्ट बोलण्याजोग्या मुद्द्यांचा उल्लेख करा. “स्मारकविधीच्या स्मरणिका,” याची उजळणी करा आणि स्मारकविधीसाठी स्थानिकरित्या करण्यात आलेल्या व्यवस्थांची रूपरेषा काय आहे ते सांगा. सर्वांनी, बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईकांना उपस्थित राहण्यास मदत करण्याच्या अंतिम योजना आखा. शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे यात एप्रिल ६-११ या तारखांसाठी दिलेल्या स्मारकविधीच्या बायबल वाचन आराखड्याचे पालन करण्याची सर्वांना आठवण करून द्या.
१३ मि: “बालकांनो—तुम्ही आमच्या हर्षाचा स्रोत आहात!” प्रश्नोत्तरे. ऑगस्ट १, १९८७, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ २५ वरील अनुभवाचे कथन करा.
२० मि: आध्यात्मिक थकव्याविरुद्ध लढा देण्याचे मार्ग. दोन वडील, नोव्हेंबर १, १९८६, टेहळणी बुरूज, पृष्ठ २४ वर दिलेल्या पेटीची चर्चा करतात. प्रत्येक ‘थकव्याच्या लक्षणापुढे’ दिलेल्या ‘सहनशीलतेच्या साधनांचा’ एखादी व्यक्ती कसा लाभ घेऊ शकते याचे शास्त्रवचनीय स्पष्टीकरण द्या. आपले आध्यात्मिक सामर्थ्य टिकवून ठेवण्यात अशा मुद्द्यांनी आपली मदत कशी केली त्यावर विवेचन मांडण्यासाठी दोन प्रचारकांची मुलाखत घ्या.
गीत १४० (२६) व समाप्तीची प्रार्थना.