हस्तपत्रिकांचा सदुपयोग करा
१ समाजातील लोकांना राज्य सभागृहाचा पत्ता आणि सभांची अचूक वेळ सांगण्यासाठी मंडळीच्या हस्तपत्रिका उपयोगी पडतात. तुमचा ज्या व्यक्तीशी संपर्क येतो त्या प्रत्येक व्यक्तीला हस्तपत्रिका देणे केव्हाही चांगलेच. या उद्देशास्तव, प्रत्येक मंडळीच्या साठ्यात हस्तपत्रिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. एखाद्या मंडळीच्या सभास्थानात किंवा सभेच्या वेळेत बदल होणार असल्यास तो बदल होण्याआधी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच नवीन हस्तपत्रिकांची मागणी करण्यात यावी जेणेकरून सध्याच्या सभेच्या वेळा दाखवणाऱ्या हस्तपत्रिका नेहमी उपलब्ध असतील. याकरता हॅन्डबिल रिक्वेस्ट फॉर्म वापरण्यात यावा. ४०.०० रुपयांना १,००० या दराने हस्तपत्रिका देण्यात येतात आणि या हस्तपत्रिकांची मागणी १,००० च्या संख्येने करण्यात यावी. तुम्हाला हस्तपत्रिका मिळाल्यानंतर त्यांचा सर्वोत्तम उपयोग कशा प्रकारे करता येईल?
२ अनेक प्रचारकांना असे दिसून येते, की स्वतःची ओळख करून देण्याचा आणि संभाषण सुरू करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे एखाद्या व्यक्तीला हस्तपत्रिका देणे. सभांचे वेळापत्रक किंवा हस्तपत्रिकेच्या मागील बाजूस दिलेला संदेश दाखवण्याद्वारे आपल्या कामाविषयी आणि कामाच्या उद्देशाविषयी चर्चेला सुरवात होऊ शकते. लहान मुलांना घरोघरच्या कार्यात घरमालकाला हस्तपत्रिका देण्यास सांगण्याद्वारे पालक त्यांच्या मुलांना सेवाकार्यात समाविष्ट करू शकतात. पत्राद्वारे साक्ष देणाऱ्या प्रचारकांनी पत्रासोबत एखादी हस्तपत्रिका पाठवून त्या व्यक्तीला सभांना येण्यासाठी आमंत्रण दिले पाहिजे. कोणीही घरात नाही, अशा ठिकाणी हस्तपत्रिका दिली जाऊ शकते; या गोष्टीची काळजी घेण्यात यावी, की हस्तपत्रिका दरवाजातून पूर्णपणे घरात जावी, बाहेरील इतर कोणाला ती दिसता कामा नये.
३ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्याकडे मार्गदर्शित होण्यात हस्तपत्रिका साधनीभूत राहिल्या आहेत. एका स्त्रीला याचा अनुभव आला, तिची पुष्कळ काळापासून बायबल समजावून घेण्याची इच्छा पूर्ण झाली ती हस्तपत्रिकेमुळेच. रात्रभर देवाला प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साक्षीदारांच्या एका जोडप्याने तिच्या दारावरची बेल वाजवली. आपण आता दरवाजा उघडू शकत नाही, असे तिने दरवाजावरील पीपहोलमधून त्यांच्याकडे पाहत म्हटले. साक्षीदारांनी दरवाजाच्या फटीतून हस्तपत्रिका आत टाकली. त्यावर लिहिले होते: “आपले बायबल जाणून घ्या.” आणि हे वाचताच तिने दरवाजा उघडला. लगेच अभ्यास सुरू झाला आणि नंतर या स्त्रीने बाप्तिस्माही घेतला. देवाच्या आत्म्याच्या शक्तीला आपण कधीही कमी लेखू नये, सेवाकार्य पूर्णतः करत असताना आपण नियमितपणे हस्तपत्रिकांचा सदुपयोग करावा.—फेब्रुवारी १९९४ आमची राज्य सेवा, पृष्ठ १ सुद्धा पाहा.