घोषणा
◼साहित्य सादरता जानेवारी: संस्थेद्वारे देण्यात आलेल्या यादीतील निम्म्या किंमतीतील किंवा खास दरांतील कोणतेही जुने १९२-पृष्ठांचे पुस्तक (जुलै १९९७ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ६ आणि संस्थेचे एप्रिल १४, १९९७ चे पत्र पाहा.) जेथे स्थानिक भाषेत अशा प्रकारची पुस्तके उपलब्ध नाहीत तेथे ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना आहे) किंवा संस्थेद्वारे देण्यात आलेल्या यादीतील निम्म्या किंमतीतील किंवा खास दरांतील कोणतेही जुने १९२-पृष्ठांचे पुस्तक. जेथे स्थानिक भाषेत अशा प्रकारची पुस्तके उपलब्ध नाहीत तेथे ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर लक्ष द्या. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या.
◼ जानेवारी ५ च्या सप्ताहाच्या सेवा सभेला उपस्थित असलेल्या सर्व बाप्तिस्माप्राप्त प्रचारकांना आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड आणि त्यांच्या मुलांना ओळखपत्र त्यांच्या साहित्य कक्षातून मिळू शकेल.
◼ या वर्षी शनिवार, एप्रिल ११ रोजी सूर्यास्तानंतर होणारा स्मारकविधी साजरा करण्यासाठी मंडळ्यांनी सोईस्कर व्यवस्था केल्या पाहिजेत. भाषण लवकर सुरू झाले तरी स्मारकविधीची बोधचिन्हे सूर्यास्तापूर्वी फिरविण्यास सुरवात करू नये. तुमच्या ठिकाणी सूर्यास्त केव्हा होतो याची स्थानिक उगमाकडे चौकशी करावी. आपापला स्मारकविधी स्वतंत्रपणे साजरा करावा, अशी प्रत्येक मंडळीची इच्छा असते; परंतु हे नेहमीच शक्य होत नाही. अनेक मंडळ्या एकाच राज्य सभागृहाचा सामान्यपणे उपयोग करतात अशा ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक मंडळ्या त्या संध्याकाळी दुसरी व्यवस्था करू शकतात. आस्थेवाईक नवीन लोकांना येण्यास गैरसोईचे होईल इतक्या उशिरा स्मारकविधीची सुरवात करू नये. तसेच समारंभाआधी किंवा नंतर भेट देणाऱ्यांना भेटण्यास वेळ मिळणार नाही, आस्थेवाईकांना चालू आध्यात्मिक मदत मिळणार नाही किंवा एकमेकांना प्रोत्साहन देता येणार नाही, इतका ओढघस्तीचा आराखडा तयार करू नका. सर्व बाबींचा पूर्णपणे विचार केल्यानंतर स्मारकविधीसाठी उपस्थित राहणाऱ्यांना संपूर्णतः लाभ मिळण्यासाठी कोणती व्यवस्था उत्तम असेल याचा निर्णय वडिलांनी घेतला पाहिजे.
◼ सन १९९८ च्या स्मारकविधी हंगामाकरता असणारे खास जाहीर भाषण रविवार, मार्च २९ रोजी देण्यात येईल. रूपरेषा देण्यात येईल. या सप्ताहांती ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षकांची भेट, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस असेल त्या मंडळ्यांत हे खास भाषण पुढील सप्ताहात देण्यात येईल. कोणत्याही मंडळीत हे खास भाषण मार्च २९ १९९८ आधी दिले जाऊ नये.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१)—कोंकणी (रोमन लिपी), पंजाबी
खिन्न झालेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०)—कोंकणी (रोमन लिपी), पंजाबी
जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२)—कोंकणी (रोमन लिपी), पंजाबी
◼ उपलब्ध नसलेली प्रकाशने:
एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य—तमीळ
“तुझे राज्य येवो”—इंग्रजी, कन्नड, तमीळ
बायबल—देवाचे वचन की मानवाचे?—इंग्रजी
सद्य जीवन एवढेच सर्व काही आहे का?—तेलगू