वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km १२/९७ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता

डिसेंबर: पुढील तीन पुस्तकांपैकी कोणतेही ४५.०० रुपयांच्या अनुदानात: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, (लहान आकाराचे २५.०० रुपयांना), बायबल कथांचं माझं पुस्तक, (इंग्रजी, लहान आकाराचे ३०.०० रुपयांना), किंवा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्याय म्हणून, जुलैची आमची राज्य सेवा यात दिलेल्या खास दर पुस्तक यादीतील कोणतीही पुस्तके प्रत्येकी २.५० रुपयांना सादर केली जाऊ शकतात.

जानेवारी: संस्थेने पुरविलेल्या, अर्ध्या किंवा खास दर पुस्तक यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. स्थानिक भाषेत ही पुस्तके उपलब्ध नसल्यास, ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल, हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना) किंवा मग संस्थेने पुरवलेल्या अर्ध्या अथवा खास दर पुस्तक यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. स्थानिक भाषेत ही पुस्तके उपलब्ध नसल्यास, ज्ञान किंवा कौटुंबिक सौख्यानंद ही पुस्तके प्रत्येकी २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर अधिक लक्ष द्या.

सूचना: वर उल्लेखलेल्या कोणत्याही मोहीम सादरतांची मागणी ज्या मंडळ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी आपल्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर मागणी पाठवावी. पुढील खास दर पुस्तके (प्रचारक, पायनियर आणि जनतेसाठी २.५० रुपये) आमच्याकडे अजूनही उपलब्ध आहेत: एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य—तामीळ, नेपाळी, मराठी; “तुझे राज्य येवो”—गुजराती, मराठी, हिन्दी; तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता—गुजराती; थोर शिक्षकाचे ऐका—मराठी; “देवाला खोटे बोलणे अशक्य आहे अशा गोष्टी”—कन्‍नड; बायबल—देवाचे वचन की मानवाचे—इंग्रजी; ‘शांतीच्या राजकुमाराच्या’ अधिपत्याखाली जागतिक सुरक्षितता—इंग्रजी; सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते—गुजराती; सद्य जीवन एवढेच सर्व काही आहे का?—इंग्रजी.

◼ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी अथवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर मंडळीमध्ये घोषणा करा.

◼ डिसेंबर २६-२८, १९९७, रोजी कलकत्त्यात होणारे प्रांतीय अधिवेशन, रबींद्र सरोबर स्टेडियम हॉल, सदर्न ॲव्हेन्यू, मेनोका सिनेमासमोर, कलकत्ता या ठिकाणी भरविण्यात येईल.

◼ डिसेंबर १२-१४, १९९७, रोजी सिलिगुरी या ठिकाणी होणाऱ्‍या प्रांतीय अधिवेशन मुख्यालयाचा नवीन पत्ता आहे: Mr. Pradip Mondal, c/o G.N. Sarkar, Vidya Nilay, South Deshbondhu Para, Near Himachal Sangha, Siliguri Town P.O., WB 734 404.

◼ प्रत्येक मंडळीला, १९९८ दरम्यान वापरण्यासाठी फॉर्म्सचा पुरेसा साठा पाठवला जात आहे. कृपया यांचा विचारपूर्वक वापर करा. ज्यासाठी ते तयार केलेले आहेत केवळ त्याच कारणासाठी त्यांचा उपयोग केला जावा.

या फॉर्म्सबरोबरच नवीन वॉचटावर पब्लिकेशन्स लिस्टच्या चार प्रती देखील आहेत. याची एक प्रत सचिवाजवळ असावी आणि इतर तीन प्रती साहित्य, नियतकालिक आणि जमाखर्च हाताळणाऱ्‍या बांधवांना दिल्या जाव्यात.

◼ सन १९९८ चे वार्षिक वचन आहे: ‘जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’—रोमकर १०:१३. मंडळ्यांनी नवीन वार्षिक वचनाचा आपला फलक तयार केल्यास उत्तमच होईल, जेणेकरून जानेवारी १, १९९८ रोजी अथवा त्यानंतर लवकरात लवकर तो लावता येईल.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

टेहळणी बुरूज प्रकाशनांची सूची १९९६ —इंग्रजी

या एका वर्षाच्या सूचीचा दर पायनियरांसाठी ८.०० रुपये तर प्रचारकांसाठी आणि जनतेसाठी १२.०० रुपये आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा