डिसेंबरसाठी सेवा सभा
डिसेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५७ (९)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि:“दररोज यहोवाविषयी बोला.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ४ घेताना, प्रशाला मार्गदर्शक पुस्तक, (इंग्रजी) अभ्यास १६, परिच्छेद १४-१६ यातील विवेचनांचा समावेश करा.
२० मि:“बायबल—सर्व लोकांसाठी देवाचे मार्गदर्शक.” बायबलचे परीक्षण करण्यास सर्वजण प्रेरित का झाले पाहिजे याच्या कारणांनिशी वडील लेखाची चर्चा करतात. परिच्छेद ३-८ मध्ये सुचविलेल्या प्रस्तुतींचा उपयोग करण्याची तयारी कशी केली आहे याविषयी दोन प्रचारकांची संक्षिप्त मुलाखत घ्या. यांपैकी एका प्रस्तुतीत, प्रथम भेटीचे व त्याच्याच पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत १६५ (२०) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५८ (२६)
१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
२० मि:जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे? ऑगस्ट १५, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे २६-३०.
१५ मि:“तुमची अनुपस्थिती जाणवते!” श्रोत्यांबरोबर वडिलांची चर्चा. मंडळीच्या सभांमध्ये सरासरी उपस्थिती किती असते ते सांगा. सभांमध्ये एकत्र आल्यामुळे तजेला का मिळतो ते सांगण्यास काहींना आमंत्रित करा.
गीत १७२ (४) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६३ (२२)
१० मि:स्थानिक घोषणा. जगीक सणांच्या शुभेच्छांना व्यवहारकुशलतेने उत्तर कसे द्यावे यावर सूचना द्या. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ साठी आयोजिलेल्या खास क्षेत्र सेवा योजनांची माहिती द्या.
१० मि:स्थानिक गरजा.
२५ मि:“आपण शिक्षक असले पाहिजे, केवळ प्रचारक नव्हे.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ११ घेताना, प्रशाला मार्गदर्शन पुस्तक (इंग्रजी), अभ्यास १५, परिच्छेद ११ वाचा.
गीत १७४ (१८) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३८ (२१)
८ मि:स्थानिक घोषणा.
१७ मि:“१९९८ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. आगामी वर्षादरम्यान सर्वांनाच या प्रशालेपासून पुरेपूर फायदा कसा मिळवता येईल याची उजळणी करा. नवीन “अतिरिक्त बायबल-वाचन आराखडा” याचे प्रत्येक आठवडी अनुसरण करण्याचे प्रोत्साहन द्या.
२० मि:सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा. पुढील प्रश्नांचा उपयोग करून आपली सेवा पुस्तक, पृष्ठे ९२-७ ची श्रोत्यांसोबत चर्चा करा: (१) सुवार्तेचा प्रसार करण्यात आपल्या साहित्याचा उपयोग इतका प्रभावशाली का ठरतो? प्रत्येक प्रसंगी आपण साहित्य का सादर केले पाहिजे? (२) अनौपचारिक साक्षीकार्य करण्याबाबत आपण जागृत का असले पाहिजे? अनौपचारिकरित्या साक्ष देण्याचे काही मार्ग कोणते आहेत? (अनौपचारिकरित्या साक्ष देण्याचे आपले अनुभव सांगण्यास काहींना आमंत्रित करा.) (३) आपल्याला नेमून दिलेले क्षेत्र उरकण्यासाठी मंडळीने शिकस्तीचे प्रयत्न का करावेत? ज्या ठिकाणी विपुल क्षेत्र आहे तेथे आपले वैयक्तिक क्षेत्र असण्याचा फायदा काय आहे? (४) गट साक्षीकार्याच्या व्यवस्थांपासून आपल्याला कसा फायदा होतो? आपण आपल्या वेळेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करत आहोत याची खात्री करण्यासाठी आपल्याला आपल्या साक्षीकार्याचे नियोजन कसे करता येईल?
गीत २२२ (२९) व समाप्तीची प्रार्थना
डिसेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १८१ (१७)
१० मि:स्थानिक घोषणा. सर्वांना क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नवीन वर्षासाठी तुमची मंडळी, सभांच्या वेळांमध्ये फेरबदल करणार असल्यास ठरलेल्या नवीन वेळांनुसार मंडळीत नियमितपणे उपस्थित राहण्याचे सर्वांना प्रेमळ उत्तेजन द्या.
१० मि:“नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम.” श्रोत्यांसोबत लेखाची चर्चा करा व उपस्थित राहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. माहीत असल्यास संमेलनाच्या तारखांचा व ठिकाणाचा उल्लेख करा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला संमेलनास उपस्थित राहता यावे म्हणून कुटुंबे आपल्या घरगुती व्यवहारांची व्यवस्था कशी करू शकतात यावर सूचना द्या. बायबल विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे, त्यांच्याकरता अतिशय प्रतिफळदायक असल्यामुळे उपस्थित राहण्यास त्यांना उत्तेजन व मदत कशी दिली जाऊ शकते यावर चर्चा करा.
२५ मि:जानेवारीच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. मंडळीकडे विपुल साठा असलेली जुनी पुस्तके दाखवा आणि प्रस्तुती तयार करण्यासाठी सहायक ठरतील अशा बोलण्याजोग्या लक्षवेधक मुद्द्यांचा उल्लेख करा. मंडळीत उपलब्ध असलेली पुस्तके कशी सादर केली जाऊ शकतात यांची प्रात्यक्षिके दाखवा. अपेक्षा माहितीपत्रकातून अथवा ज्ञान पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याचे प्रयत्न आपण जारी ठेवले पाहिजेत.
गीत २१५ (२२) व समाप्तीची प्रार्थना.