वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९७ पृ. २
  • ऑगस्टसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑगस्टसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९७
  • उपशिर्षक
  • ऑगस्ट ४ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९७
km ८/९७ पृ. २

ऑगस्टसाठी सेवा सभा

ऑगस्ट ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (२२)

७ मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशासाठी व स्थानिक मंडळीसाठी असलेल्या एप्रिलच्या क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.

१३ मि:“सभा सत्कर्मे करावयास उत्तेजन देतात.” प्रश्‍नोत्तरे. सभांच्या आधी व नंतर उभारणीकारक संभाषण करण्याचे फायदे स्पष्ट करा.—प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठ ८२, परिच्छेद १७-१८.

२५ मि:“वाढ होण्यासाठी यहोवावर विसंबून राहा.” भाषण व प्रात्यक्षिके. जेथे माहितीपत्रकांचा वाटप केला आहे अशा ठिकाणी पुनर्भेटी करण्याच्या गरजेवर जोर द्या. अभ्यास कसे सुरू करावेत हे दाखवण्यास उत्तम तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा. मार्च १९९७ ची आमची राज्य सेवा पुरवणी, परिच्छेद ७-११ यामधील सूचनांचा समावेश करा.

गीत ७८ (२१) व समाप्तीची प्रार्थना

ऑगस्ट ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २० (८)

५ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि:“वडीलधारी माणसे अखंड प्रचार करतात.” प्रश्‍नोत्तरे. जुलै १, १९८८, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठ १३ यातील सहायक पायनियरींग केलेल्या एका वयोवृद्ध आजीचा अनुभवही समाविष्ट करा.

२५ मि:“राज्य सभागृह बांधकामाची गरज पूर्ण करणे.” प्रश्‍नोत्तरे.

गीत ७१ (४) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १४ (१६)

१० मि:स्थानिक घोषणा.

१० मि:स्थानिक गरजा.

२५ मि:तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) या माहितीपत्रकाचा उपयोग करून पुनर्भेटी करा. कशाप्रकारे एखादा प्रश्‍न उपस्थित करायचा व त्याच्या उत्तरासाठी माहितीपत्रकाचा संदर्भ कसा घ्यायचा हे दाखवा. उदाहरणार्थ, हे माहितीपत्रक पुढील प्रश्‍नांची उत्तरे देते: मृतांसाठी काही आशा आहे का? (पृष्ठे ५-६) शोक करणे चुकीचे आहे का? (पृष्ठे ८-९) आपण शोकाचा सामना कसा करू शकतो? (पृष्ठ १८) इतर लोक कशी मदत करू शकतात? (पृष्ठे २०-३) मृत्यूची समज प्राप्त करण्यासाठी मुलांना कशी मदत केली जाऊ शकते? (पृष्ठ २५) बायबल कोणते सांत्वन देते? (पृष्ठ २७) मग, मृत्यूविषयी सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी दोन कार्यक्षम प्रचारकांनी पुनर्भेटीत या माहितीपत्रकाचा उपयोग कसा केला याची त्यांच्यासोबत संक्षिप्तपणे चर्चा करा. पुनर्भेट करताना या माहितीपत्रकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा.

गीत ९४ (५) व समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २३ (२९)

१० मि:स्थानिक घोषणा. सर्वांना आपापला क्षेत्र सेवा अहवाल देण्याचे स्मरण करून द्या. पुढील आठवड्याकरता केलेल्या सेवा योजनेची घोषणा करा.

१५ मि:“शाळेचा सर्वाधिक लाभ घ्या.” एक पिता मुलांसोबत लेखाची चर्चा करतात व डिसेंबर २२, १९९५, सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठे ७-११ यातील मुद्देही समाविष्ट करतात.

२० मि:उद्देश राखून प्रचार करा. आपली सेवा पुस्तक, पृष्ठे ८-१२ याची, एक वडील व दोन किंवा तीन सेवा सेवक उजळणी करतात. आपल्या सेवेसंबंधी आपण सकारात्मक, प्रगतिशील प्रवृत्ती का बाळगावी व संघटनेसोबत निकटचे सहकार्य का करावे याच्या सबळ कारणांवर लक्ष केंद्रित करा.

गीत १०० (६) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा